
आयपीएल 2025 स्पर्धेत पाच वेळा जेतेपद मिळवलेल्या चेन्नई सुपर किंग्सची स्थिती एकदम नाजूक आहे. आतापर्यंत खेळलेल्या सात पैकी फक्त दोन सामन्यात विजय मिळवला आहे. त्यामुळे गुणतालिकेत एकदम तळाशी आहे. आता प्लेऑफमध्ये स्थान मिळवायचं तर चेन्नई सुपर किंग्सला प्रत्येक सामन्यात विजयाची चव चाखावी लागणार आहे. कारण दोन सामन्यात पराभवाचं तोंड पाहीलं तर सर्व गणित जर तर वर येऊन ठेपेल. त्यात ऋतुराज गायकवाड दुखापग्रस्त झाल्याने संपूर्ण स्पर्धेला मुकला आहे. त्यामुळे कर्णधारपदाची धुरा महेंद्रसिंह धोनीच्या खांद्यावर सोपवली आहे. चाहत्यांना त्याच्याकडून बऱ्याच अपेक्षा आहेत. पहिल्या सामन्यात पराभव झाल्यानंतर दुसऱ्या सामन्यात कमबॅक केलं आहे. असं असताना महेंद्रसिंह धोनी आणि चाहत्याच्या संभाषणाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. खरं तर हे हलकंफुलकं संभाषण आहे. पण धोनीच्या पारखी नजरेची दाद द्यावी लागेल.
चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी ऑटोग्राफ मागणाऱ्या एका चाहत्याला खडसावताना दिसला. धोनी चाहत्यांना ऑटोग्राफ देत होता. पण त्याच्या बाजूला असलेला एक चाहता वारंवार ऑटोग्राफची विनंती करत होता. तेव्हा महेंद्रसिंह धोनी म्हणाली की, “मी त्या बाजूला येत आहे. मी येईन. हा तुमचा दुसरा ऑटोग्राफ आहे.” महेंद्रसिंह धोनीला त्याने या आधी ऑटोग्राफ घेतल्याचं माहिती होतं. पण चाहत्यांचा क्रेझ त्यालाही माहिती आहे. त्यामुळे त्यांना नाराज करत नाही.
Dhoni : ” That’s ur second autograph” 😭 pic.twitter.com/m99FFQdciW
— Mr. Villaaww’ (@OkayAchaa) April 16, 2025
महेंद्रसिंह धोनीने 2008 ते 2023 पर्यंत चेन्नई सुपर किंग्सचं नेतृत्व केलं आहे. या दरम्यान त्याने पाचवेळा जेतेपद मिळवून दिलं आहे. पण 2024 पर्व सुरु होण्यापूर्वी त्याने कर्णधारपद ऋतुराज गायकवाडकडे सोपवलं. या हंगामातही ऋतुराज गायकवाड संघाचं नेतृत्व करत होता. पण राजस्थान रॉयल्स विरूद्धच्या सामन्यात जोफ्रा आर्चरच्या शॉर्ट बॉलमुळे दुखापत झाली. त्यानंतर संपूर्ण स्पर्धेला मुकला.
“एक सामना जिंकणे चांगले आहे. जेव्हा तुम्ही अशी स्पर्धा खेळता तेव्हा तुम्हाला सामने जिंकायचे असतात. दुर्दैवाने, काही सामने काही कारणास्तव आमच्या मनासारखे गेले नाहीत. याची अनेक कारणे असू शकतात. आमच्या बाजूने विजय असणे चांगले आहे,” असं धोनीने मागच्या विजयानंतर सांगितलं होतं.