मध्य प्रदेशात AI सक्षम क्रिकेट लीगचे व्यवस्थापन, देशातील पहिले राज्य – महाआर्यमन सिंधीया

मध्य प्रदेश हे पहिली एआय-सक्षम क्रिकेट लीग संचालित करणारे पहिले राज्य ठरले असून त्यामुळे क्रिकेट प्रशासनात पारदर्शकता येईल असे मध्य प्रदेश क्रिकेट असोसिएशनचे (एमपीसीए) अध्यक्ष आणि मध्य प्रदेश क्रिकेट लीगचे (एमपीएल) संस्थापक महाआर्यमन सिंधिया यांनी म्हटले आहे.

मध्य प्रदेशात AI सक्षम क्रिकेट लीगचे व्यवस्थापन, देशातील पहिले राज्य -  महाआर्यमन सिंधीया
Mahanaryaman Scindia and Mukund Jha
| Updated on: Jun 26, 2026 | 7:30 PM

एआयने सर्व जग व्यापले आहे. आता एआयचा वापर करुन मध्य प्रदेश क्रिकेट लीगचा संचलन केले जाणार आहे. असे करणारे मध्य प्रदेश देशातील पहिले राज्य ठरले आहे. क्रिकेट प्रणाली अधिक पारदर्शक आणि न्याय्य तसेच सुनियोजित करण्यासाठी मध्य प्रदेश क्रिकेट असोसिएशनने (एमपीसीए) एआय आधारित तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी इमर्जेंटएआय ( EmergentAI ) सोबत भागीदारी केली असल्याचे एमपीसीएचे अध्यक्ष आणि मध्य प्रदेश क्रिकेट लीचे महाआर्यमन सिंधीया यांनी सांगितले.

मध्य प्रदेश क्रिकेट असोसिएशनचे (एमपीसीए) अध्यक्ष आणि मध्य प्रदेश क्रिकेट लीगचे ( एमपीएल ) संस्थापक महाआर्यमन सिंधिया यांनी एमपीएल फायनलच्या आधी आज इंदूरमध्ये एका विशेष पत्रकार परिषदेला संबोधित केले. याप्रसंगी, महाआर्यमन सिंधिया यांनी राज्यातील आणि देशातील क्रिकेट प्रशासनातील तंत्रज्ञान-आधारित बदलांची दिशेवर भाष्य केले.

महान आर्यमन सिंधिया यावेळी म्हणाले की, या मागे जिल्हा आणि विभागीय स्तरावर एक पारदर्शक आणि विश्वासार्ह प्रणाली स्थापित करणे हे उद्दिष्ट आहे. एआयच्या वापरामुळे ही प्रक्रिया अधिक न्याय्य आणि पद्धतशीर होईल. त्यांनी स्पष्ट केले की, एमपीएल-एमपीसीएचे वित्त विभाग, खेळाडूंची नोंदणी, पडताळणी आणि खेळाडूंच्या नोंदींचे व्यवस्थापन हे एआय-आधारित होणार आहे. त्यामुळे जिल्हा आणि विभाग स्तरावरील सगळे वाद आणि तंटे समाप्त होतील असेही ते म्हणाले.

त्यांनी सांगितले की, एआय-आधारित डेटा आणि कामगिरीच्या विश्लेषणामुळे निवड प्रक्रियेवर पक्षपाताचा आरोप होणार नाही. खेळाडूंची निवड त्यांच्या कामगिरी आधारेच होईल. तसेच अंतिम निवड प्रक्रिया निवडकर्त्यांकडे राहिल. या शिवाय जिल्हा आणि विभागीय स्तरावरील अनुदान वितरण प्रक्रिया देखील डिजिटल आणि सुव्यवस्थितपणे केली जाईल.

याप्रसंगी, इमर्जेंटएआयचे संस्थापक मुकुंद झा यांनी सांगितले की, त्यांची कंपनी तंत्रज्ञान सर्वसामान्यांसाठी सुलभ करण्यासाठी काम करीत आहे. ते म्हणाले की, आता फक्त हिंदी आणि इंग्रजीमध्ये एक प्रॉम्प्ट टाईप करून किंवा बोलून वेबसाईट्स आणि ॲप्स तयार करता येतात.

एमपीएलसोबतची त्यांची भागीदारी गेल्या सहा महिन्यांपासून सुरू आहे. महाआर्यमन सिंधिया यांचे ध्येय एक अशी एआय प्रणाली विकसित करणे होते, जी संपूर्ण क्रिकेट परिसंस्थेसाठी ऑपरेटिंग सिस्टीम बनू शकेल. सध्या, वित्त आणि प्रशासकीय मॉड्यूल्सवर काम सुरू असून, निवड, अनुदान आणि इतर प्रक्रियांचे डिजिटायझेशन केले जात असल्याचे मुकुंद झा यांनी सांगितले.

महान आर्यमन सिंधिया यांनी सांगितले की, इमर्जेंट हे एक असे व्यासपीठ आहे, जे ॲप्स किंवा वेबसाईट्स तयार करण्यासाठी पारंपरिक विकास प्रक्रियांवर अवलंबून राहण्याची गरज कमी करते. त्यांनी पुढे सांगितले की, पारंपरिक पद्धती वापरून विकसित केली जाणारी ईआरपी प्रणाली अत्यंत खर्चिक ठरली असती, परंतु एआय-आधारित प्रणालीमुळे ही प्रक्रिया अधिक जलद आणि किफायतशीर होत आहे.

मध्य प्रदेश क्रिकेटमधून उदयास येणारे नवे तारे

एमपीएल फायनलच्या निमित्ताने, महान आर्यमन सिंधिया म्हणाले की, या लीगच्या माध्यमातून दरवर्षी नवीन खेळाडूंना ओळख मिळत आहे. ते पुढे म्हणाले की, यावर्षीही खेळाडू विकास कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक प्रतिभावान खेळाडू पुढे आले आहेत. विशेषतः देवेंद्र सिंग कथायत यांचा उल्लेख करीत ते म्हणाले की, वयाच्या ३७ व्या वर्षीही देवेंद्र सिंग कथायत यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

Follow Us