कसोटी मालिकेत मानवने मॅजिक बॉलवर काढली प्रभात जयसूर्याची विकेट, सुथारच्या चेंडूचं सत्य काय?
भारतीय संघात मानव सुथारच्या आगमनानंतर फिरकी गोलंदाीजीला धार चढली आहे. श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत विकेट घेण्यात आघाडीवर आहे. या मालिकेत त्याने टाकलेल्या मॅजिक बॉलचीही चर्चा आहे. या चेंडूवर त्याला विकेटही मिळाली आहे. चला जाणून घेऊयात सत्य...

मानव सुथारने श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात आपल्या गोलंदाजीची छाप सोडली. त्यानंतर दुसऱ्या कसोटीतही त्याच्या गोलंदाजीची चर्चा होत आहे. कोलंबो कसोटीच्या पहिल्या डावात त्याने प्रभात जयसूर्याची विकेट काढली. खरं तर प्रभातला मानवने टाकलेला चेंडू कळलाच नाही. काही कळायच्या आता आणि चेंडूला बॅट लावण्यापूर्वी पॅडवर चेंडू आदळला. त्यानंतर जोरदार एलबीडब्ल्यूसाठी अपील करण्यात आणि विकेटही मिळाली. प्रभात जयसूर्याची विकेट काढली त्या चेंडूचा आता चर्चा होत आहे. कारण मानव सुथारने टाकलेला हा चेंडू श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतील सर्वात वेगवान चेंडू होता. त्यामुळे मानव सुथारने टाकलेल्या चेंडूचा वेग तरी काय? असा प्रश्न पडल्याशिवाय राहणार नाही. मानव सुथार फिरकी गोलंदाज असल्याने त्याने इतक्या वेगाने चेंडू टाकला का? असाही प्रश्न आहे.
फिरकी गोलंदाजांच्या 1958 चेंडूमधील सर्वात वेगवान चेंडू
मानव सुथारने प्रभात जयसूर्याला टाकलेल्या वेगवान चेंडूची चर्चा होणं सहाजिकच आहे. कारण सध्याच्या कसोटी मालिकेतील फिरकी गोलंदाजाने टाकलेला हा सर्वात वेगवान चेंडू ठरला आहे. गॉल कसोटी सामन्यानंतर कोलंबो कसोटीतील दुसऱ्या सामन्यापर्यंत फिरकी गोलंदाजांनी एकूण 1958 चेंडू टाकले. म्हणजेच फिरकी गोलंदाजांनी एकूण 326.2 षटकं टाकली. त्यात फिरकी गोलंदाज मानव सुथारने टाकलेला चेंडू हा सर्वात वेगवान ठरला आहे. त्याने या चेंडूवर प्रभात जयसूर्याला पायचीत केलं. मानव सुथारच्या चेंडूचा वेग हा 98.85 प्रतितास इतका होता. त्यामुळे या मालिकेतील सर्वात वेगवान चेंडू ठरला.
Nightwatchman sent packing! 🚶➡️
Manav Suthar strikes to pick up the wicket of Prabath Jayasuriya and wrap up the day on a high! 💥
Watch #SLvIND, 2nd Test, Day 3, Tomorrow, 9 AM onwards, LIVE on Sony Sports Network TV channels & Sony LIV.#SonySportsNetwork #SonyLIV… pic.twitter.com/pAKsoOncyK
— Sony Sports Network (@SonySportsNetwk) August 24, 2026
मानव सुथारने श्रीलंकेच्या पहिल्या डावातील तिसऱ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर प्रभात जयसूर्याची विकेट काढली. या षटकात त्याने टाकलेला तिसरा चेंडू हा 98.17 किमी प्रती तास वेगाने टाकला होता. या मालिकेतील फिरकी गोलंदाजाने टाकलेला तिसरा वेगवान चेंडू ठरला आहे. दुसरीकडे, मानव सुथारने या मालिकेत 95 किमी किंवा त्याहून अधिक वेगाने खूपच कमी चेंडू टाकले आहे. कोलंबो कसोटीच्या दुसऱ्या दिवसानंतर त्याने टाकलेल्या चेंडूंची संख्या फक्त 2.5 टक्के आहे. त्याने 62 टक्के चेंडू हे 85 ते 90 किमी प्रतितास वेगाने टाकले.