AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एकाच टप्प्यावर चेंडू टाकण्यासाठी दिवसातून 35 षटकांचा सराव! मानव सुथारचा स्टॉक बॉल आहे तरी काय?

भारतीय संघाकडून फक्त दोन कसोटी सामने खेळलेल्या मानव सुथारची जोरदार चर्चा आहे. अवघ्या दोन कसोटी सामन्यात त्याने आपल्या फिरकीची छाप सोडली आहे. पण यासाठी त्याने मेहनतही तितकीच घेतली आहे. दिवसातून 35 षटकांचा सराव त्याने एकाच टप्प्यावर केला आहे.

एकाच टप्प्यावर चेंडू टाकण्यासाठी दिवसातून 35 षटकांचा सराव! मानव सुथारचा स्टॉक बॉल आहे तरी काय?
एकाच टप्प्यावर चेंडू टाकण्यासाठी दिवसातून 35 षटकांचा सराव! मानव सुथारचा स्टॉक बॉल आहे तरी काय?Image Credit source: BCCI Twitter
| Updated on: Aug 21, 2026 | 6:40 PM
Share

भारतीय कसोटी क्रिकेटमध्ये आता नवख्या मानव सुथारच्या फिरकीची चर्चा होत आहे. त्याचं आंतरराष्ट्रीय कसोटी करिअर फार मोठं नाही. पण अवघ्या दोन सामन्यात त्याने आपल्या फिरकीची छाप सोडली आहे. मानव सुथारने वयाच्या 24व्या वर्षी रेड बॉल क्रिकेटमध्ये आपली वेगली ओळख निर्माण केली आहे. आतापर्यंत खेळलेल्या दोन सामन्यात मानव सुथारने 17 विकेट काढल्या आहेत. अफगाणिस्तानविरुद्धच्या पदार्पणाच्या कसोटी सामन्यातील एका डावात 33 धावा देत 6 विकेट काढल्या होत्या. ही त्याची आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी ठरली. तर श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत दोन्ही डावात मिळून 10 विकेट काढल्या. श्रीलंकेच्या भूमीवर 10 विकेट्स घेणारा हरभजन सिंग आणि आर अश्विननंतर तिसरा फिरकी गोलंदाज ठरला आहे. त्यामुळे त्याच्या गोलंदाजीची चर्चा रंगणं सहाजिकच आहे. श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यातही त्याच्याकडून अशी अपेक्षा आहे. त्यात त्याच्या स्टॉक बॉलबाबत कमालीची उत्सुकता आहे. यासाठी त्याने प्रचंड सराव केला आहे. त्याचंच फळ आता त्याला मिळताना दिसत आहे.

मानव सुथारने एका मुलाखतीत सांगितलं होतं की, वयाच्या 14-15व्या वर्षापासून दररोज 30 ते 35 षटकांचा सराव करायचा. म्हणजेच मानव सुथार दिवसाला 180 ते 210 चेंडू फक्त एकाच टप्प्यावर टाकायचा. एकाच टप्प्यावर वारंवार चेंडू टाकण्याचा सराव केल्याने हा चेंडू टाकताना शरीराचे आणि बोटातून सोडतानाचं गणित अचूक जमतं. त्यामुळे गोलंदाजी करताना फार विचार करावा लागत नाही. मनासारखा चेंडू टप्प्यावर पडतो आणि विकेट मिळते. खरं तर अचूक टप्प्याच्या गोलंदाजीमुळे फलंदाजावर दबाव वाढतो आणि चुका करण्यास भाग पडतो. म्हणूनच स्टॉक बॉलला भरवशाचा आणि नैसर्गिक चेंडू बोललं जातं.

मानव सुथारच्या गोलंदाजीचा वेग 90 किमी प्रतितास इतका आहे. मानव सुथारचा स्टॉक बॉल आधुनिक फिरकीपटूंच्या तुलनेत वेगळा आहे. मानव जेव्हा चेंडू हवेत सोडतो तेव्हा फलंदाजाला वाटतं की पायावर येईल. पण टप्पा पडला की बाहेर निघून जातो. चेंडू जास्त वेगाने न टाकता हवेत फिरवतो आणि टप्पा पडला की वेगाने बाहेर निघतो. त्यामुळे फलंदाज त्याच्या चेंडूचा सामना करताना वेगवान टर्न आणि अचानक मिळालेल्या उसळीमुळे फसतात. मानव सुथारने घेतलेल्या 17 विकेटपैकी 5 क्लिन बोल्ड आहेत. 3 एलबीडब्ल्यू आणि 9 झेल बाद आहेत. यावरून एक स्पष्ट दिसते की बोल्ड आणि एलबीडब्ल्यूतून त्याने 8 विकेट काढल्या आहेत.

Follow Us
मोठी बातमी! CJP च्या दिपके, सौरव दास, रांका यांची सुटका, हमीपत्रावर...
मोठी बातमी! CJP च्या अभिजीत दिपके, सौरव दास, रांका यांची सुटका, हमीपत्रावर लिहून घेतली अट
ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याठी पुन्हा आंदोलन; दिल्लीला छावणीचे...
Ajinkya Shinde : ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याठी पुन्हा आंदोलन; दिल्लीला छावणीचे स्वरूप
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे...
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस ठाण्यात दाखल
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव...
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव नष्ट होण्याच्या मार्गावर
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनाला..
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनालाही मुकणार, कुटुंबिय म्हणाले आता...
अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात...
मोठी बातमी! अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात धरपकड सुरूच
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची...
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची पाहणी, खरीप पिकांचे मोठे नुकसान
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं, मोठं कारण समोर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर वाढणार?