BCCIच्या कुटुंबातील कोणी गेलं नाही म्हणून…, IND-PAK सामन्यापूर्वी शुभम द्विवेदींच्या पत्नीचा संताप

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानसोबतचे सर्व संबंध मोडले आहेत. इतकंच काय तर पाकिस्तानला जाणारं पाणीही अडवलं आहे. त्यामुळे भारताचा रोष स्पष्ट आहे. पण असं असूनही भारतीय संघ आशिया कप स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध सामना खेळणार आहे. त्यामुळे हल्ल्यात पती गमावलेल्या ऐशान्य द्विवेदी यांनी संताप व्यक्त केला आहे.

BCCIच्या कुटुंबातील कोणी गेलं नाही म्हणून..., IND-PAK सामन्यापूर्वी शुभम द्विवेदींच्या पत्नीचा संताप
भारत पाकिस्तान सामना खेळायचा की नााही? पहलगाम हल्ल्यात पती गमावल्यानंतर ऐशान्य द्विवेदी म्हणाली की...
Image Credit source: TV9 Network/Hindi
| Updated on: Sep 13, 2025 | 10:21 PM

आशिया कप 2025 स्पर्धेतील भारत पाकिस्तान सामन्याची जोरदार चर्चा रंगली आहे. कारण दोन्ही संघ पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच आमनेसामने येणार आहेत. त्यामुळे या सामन्यावरून बऱ्याच वाद निर्माण झाला आहे. भारतीय संघ पाकिस्तानविरुद्ध कसा काय सामना खेळू शकतो? असे प्रश्न विचारले जात आहेत. आशिया कपमधील भारत-पाकिस्तान सामन्याबाबत फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईजनेही आक्षेप घेतला आहे. सोनी टीव्ही आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून मागणी केली की, सामना प्रसारित करू नये. पहलगाम हल्ल्यात शुभम द्विवेदी यांनीही जीव गमावला होता.पत्नी ऐशान्या द्विवेदी यांच्या डोळ्यादेखत त्यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या. आजही हा प्रसंग त्यांच्या डोळ्यासमोरून काही केला जात नाही. असं असताना भारत पाकिस्तान सामन्यावर त्यांनी परखड मत व्यक्त केलं आहे.

ऐशान्या द्विवेदी यांनी सांगितलं की, मला वाटतं की बीसीसीआयने या सामन्याला मंजुरी द्यायला नको होती. मला असं वाटतं की बीसीसीआय 26 कुटुंबाप्रति संवेदनशील नाही. आमचे क्रिकेटपटू काय करत आहेत? आमचे क्रिकेटपटू ज्यांना आम्ही राष्ट्रवादी मानतो, त्यांनी यावर आवाज उचलला पाहीजे होता. क्रिकेट आपला राष्ट्रीय खेळ आहे, पण दुर्दैवाने 1-2 क्रिकेटपटू सोडले तर यावर चर्चा करण्या कोणीही पुढे आलं नाही. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाकावा असं सांगितलं नाही.

ऐशान्या द्विवेदी यांनी खेळाडूंबाबत परखड मत मांडत सांगितलं की, बीसीसीआय कोणालाही बंदुकीच्या धाकावर खेळण्यास भाग पाडू शकत नाही. त्यांनी त्यांच्या देशाप्रती असलेली त्यांची जबाबदारी समजून घेतली पाहीजे. त्यासाठी उभं राहिले पाहीजे. पण दुर्दैवाने ते तसं करताना दिसत नाही. मी प्रायोजक आणि प्रसारकांना थेट विचारते की, जर त्या 26 कुटुंबियांप्रती संवेदना आहेत की नाही? असा प्रश्नही विचारलं. इतकंच काय बीसीसीआयच्या सदस्यांच्या कुटुंबातील कोणी यात गेलं नाही म्हणून त्यांना तसं वाटत नसावं अशी तिखट प्रतिक्रियाही दिली.

ऐशान्य द्विवेदी यांनी प्रश्न केला की, सामन्यातून येणारा महसूल कुठे वापरला जाणार? पाकिस्तान दहशतवादासाठी खर्च करेल. कारण तो दहशतवादी देश आहे. तुम्ही त्यांना महसूल गोळा करण्यास मदत करत आहात. ते पुन्हा आपल्यावर हल्ला करण्यास तयार होतील. मी जनतेला यावर बहिष्कार घालण्याचे आव्हान करते. हे सामने पाहण्यासाठी जाऊ नका, तुमचा टीव्हा बंद ठेवा.