MI vs CSK Score, IPL 2025 : मुंबई इंडियन्सचा विजयी चौकार, चेन्नई सुपर किंग्सला 9 गडी राखून नमवलं

Mumbai Indians vs Chennai Super Kings Score and Highlights In Marathi : मुंबई इंडियन्सने वानखेडे स्टेडियममध्ये झालेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सवर एकतर्फी विजय मिळवला. मुंबईने चेन्नईवर 9 विकेट्सने मात केली आणि या 18 व्या मोसमातील चौथा विजय मिळवला.

MI vs CSK Score, IPL 2025 : मुंबई इंडियन्सचा विजयी चौकार, चेन्नई सुपर किंग्सला 9 गडी राखून नमवलं
Mumbai Indians vs Chennai Super Kings Ipl 2025 Live Score
Image Credit source: TV9
| Updated on: Apr 21, 2025 | 2:31 AM

आयपीएल 2025 मधील 38 व्या सामन्यात मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज हे 2 संघ आमनेसामने होते. हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवण्यात आला. या हंगामात या दोन्ही संघांमधील हा दुसरा सामना होता. मुंबईने हा सामना 9 विकेट्सने जिंकला. चेन्नई संघाने याआधी 23 मार्चला झालेल्या सामन्यात मुंबईवर 4 विकेट्सने विजय मिळवला होता. मात्र मुंबईने 20 एप्रिलला या पराभवाची परतफेड केली.  चेन्नईने विजयासाठी दिलेलं 177 धावांचं आव्हान मुंबईने 15.4 ओव्हरमध्ये पूर्ण केलं. मुंबईचा हा या मोसमातील एकूण चौथा तर सलग तिसरा विजय ठरला. मुंबईने हार्दिक पंड्या याच्या नेतृत्वात ही कामगिरी केली. तर चेन्नई सुपर किंग्सला एकूण सहाव्या पराभवाचा सामना करावा लागला.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 20 Apr 2025 10:52 PM (IST)

    MI vs CSK Live Score, IPL 2025 : मुंबई इंडियन्सने चेन्नई सुपर किंग्सला नमवलं

    मुंबई इंडियन्सने आयपीएल स्पर्धेतील चौथ्या विजयाची नोंद केली आहे. चेन्नई सुपर किंग्सला ९ गडी राखून पराभूत केलं. चेन्नई सुपर किंग्सने १७७ धावांचं आव्हान दिलं होतं.  मुंबई इंडियन्सने १५.४ षटकात दिलेलं आव्हान पूर्ण केलं.

  • 20 Apr 2025 10:43 PM (IST)

    MI vs CSK Live Updates : रोहितनंतर सूर्यकुमार यादवचं अर्धशतक, मुंबई विजयाच्या उंबरठ्यावर

    रोहित शर्मा याच्यानंतर मुंबई इंडियन्सच्या सूर्यकुमार यादव यानेही चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध अर्धशतक झळकावलं आहे. सूर्याने अवघ्या 26 बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण केलं आहे. मुंबई यासह विजयाच्या आणखी जवळ येऊन पोहचली आहे.

  • 20 Apr 2025 10:26 PM (IST)

    MI vs CSK Live Updates : रोहित शर्माचं अर्धशतक, मुंबई विजयाच्या दिशेने

    मुंबईचा अनुभवी फलंदाज रोहित शर्मा याला अखेर सूर गवसला आहे. रोहित शर्मा याने आयपीएलच्या 18 व्या मोसमात चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध घरच्या मैदानात अर्धशतक झळकावलं आहे. रोहितने 177 धावांचं पाठलाग करताना ही खेळी केली आहे.

  • 20 Apr 2025 10:21 PM (IST)

    MI vs CSK Live Updates : रोहित शर्मा-सूर्यकुमार यादव जोडी जमली, मुंबई विजयाच्या दिशेने

    मुंबईने रायन रिकेल्टन याच्या रुपात पहिली विकेट गमावली. त्यानंतर रोहित शर्मा याला साथ देण्यासाठी सूर्यकुमार यादव मैदानात आला.  सूर्यकुमार यादव आणि रोहित शर्मा ही जोडी जमली आहे. त्यामुळे मुंबई आणखी भक्कम स्थितीत पोहचली आहे.

  • 20 Apr 2025 10:02 PM (IST)

    MI vs CSK Live Updates : मुंबईला पहिला झटका, रायन रिकेल्टन आऊट, रवींद्र जडेजाला विकेट

    रवींद्र जडेजा याने रोहित शर्मा-रायन रिकेल्टन ही सलामी जोडी अखेर फोडली आहे. रवींद्र जडेजा याने रायन रिकेल्टन याला आयुष म्हात्रे याला आयुष म्हात्रे याच्या हाती कॅच आऊट केलं. रायनने 19 बॉलमध्ये 24 रन्स केल्या.

  • 20 Apr 2025 09:56 PM (IST)

    MI vs CSK Live Updates : रोहित-रायन सलामी जोडीची अर्धशतकी भागीदारी, चेन्नई बॅकफुटवर

    रोहित शर्मा आणि रायन रिकेल्टन या जोडीने सलामी अर्धशतकी भागीदारी केली आहे. या मोसमात मुंबईकडून सलामी अर्धशतकी भागीदारी करण्याची ही पहिली वेळ ठरली आहे. मुंबईने 5 ओव्हरमध्ये 56 धावा केल्या आहेत.  रोहितची अर्धशतकाच्या दिशेने वाटचाल सुरु आहे. तर रायनही रोहितला अप्रतिम साथ देत आहे.

  • 20 Apr 2025 09:51 PM (IST)

    MI vs CSK Live Updates : रोहित-रायनची फटकेबाजी, मुंबईची कडक सुरुवात, 4 ओव्हरनंतर 38 धावा

    रोहित शर्मा आणि रायन रिकेल्टन या मुंबईच्या सलामी जोडीने चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध 177 धावांचा पाठलाग करताना अप्रतिम सुरुवात केली आहे. मुंबईने 4 ओव्हरमध्ये बिनबाद 38 धावा केल्या आहेत. रोहित 23 रायन 12 रन्सवर नॉट आहेत.

  • 20 Apr 2025 09:32 PM (IST)

    MI vs CSK Live Updates : मुंबईच्या बॅटिंगला सुरुवात, रोहित-रायन मैदानात

    मुंबई इंडियन्सकडून चेन्नई सुपर किंग्सने विजयासाठी दिलेल्या 177 धावांचा पाठलाग करण्यासाठी रोहित शर्मा आणि रायन रिकेल्टन सलामी जोडी मैदानात आली आहे.  चेन्नईने 20 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 176 धावा केल्या.

  • 20 Apr 2025 09:18 PM (IST)

    MI vs CSK Live Updates : चेन्नईकडून मुंबईला 177 धावांचं आव्हान

    चेन्नई सुपर किंग्सने मुंबई इंडियन्ससमोर विजयासाठी 177 धावांचं आव्हान ठेवलं आहे. चेन्नईने 20 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 176 धावा केल्या. चेन्नईसाठी रवींद्र जडेजा आणि शिवम दुबे या दोघांनी अर्धशतकी खेळी केली. तर डेब्यूटंट आयुष म्हात्रे याने 32 धावांची खेळी केली.  तर शेख राशीद याने 19 धावांचं योगदान दिलं. मुंबईकडून जसप्रीत बुमराह याने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या.

  • 20 Apr 2025 09:11 PM (IST)

    MI vs CSK Live Updates : चेन्नईला पाचवा झटका, कॅप्टन महेंद्रसिंह धोनी आऊट

    जसप्रीत बुमराह याने चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी याला आऊट केलं आहे. चेन्नईने यासह पाचवी विकेट गमावली आहे. बुमराहने धोनीला तिलक वर्माच्या हाती कॅच आऊट केलं.  धोनीने 6 बॉलमध्ये 4 रन्स केल्या.

  • 20 Apr 2025 08:57 PM (IST)

    MI vs CSK Live Updates : चेन्नईला चौथा झटका, शिवम दुबे झंझावाती अर्धशतकानंतर आऊट

    मुंबई इंडियन्सने चेन्नईला चौथा झटका दिला आहे. जसप्रीत बुमराह याने शिवम दुबे आणि रवींद्र जडेजा ही सेट जोडी फोडली आहे. बुमराहने शिवम दुबे याला विल जॅक्स याच्या हाती कॅच आऊट केलं. दुबेने 32 बॉलमध्ये 50 रन्स केल्या.

  • 20 Apr 2025 08:54 PM (IST)

    MI vs CSK Live Updates : शिवम दुबेचं झंझावाती अर्धशतक, चेन्नईचं कमबॅक

    लोकल बॉय शिवम दुबे याने घरच्या मैदानात मुंबई इंडियन्स विरुद्ध धमाकेदार अर्धशतकी खेळी केली आहे. शिवमने चेन्नई अडचणीत असताना रवींद्र जडेजा याच्यासह भागीदारी करत डावा सावरला. तसेच त्यानंतर संधी मिळेल तशी फटकेबाजी केली आणि अर्धशतक पूर्ण केलं.  शिवमने 30 बॉलमध्ये त्याच्या कारकीर्दीतील 10 वं अर्धशतक पूर्ण केलं.

  • 20 Apr 2025 08:48 PM (IST)

    MI vs CSK Live Updates : चेन्नईच्या 15 ओव्हरनंतर 3 आऊट 118 रन्स, जडेजा-दुबे मैदानात

    चेन्नई सुपर किंग्सने मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात च्या 15 ओव्हरनंतर 3 विकेट्स गमावून 118 रन्स केल्या आहेत. रवींद्र जडेजा आणि  शिवम दुबे ही जोडी नाबाद खेळत आहे. शिवम दुबे 37 धावांवर नाबाद खेळत आहे. तर रवींद्र जडेजा याने 19 बॉलमध्ये 19 रन्स केल्या आहेत.

  • 20 Apr 2025 08:38 PM (IST)

    MI vs CSK Live Updates : जडेजा-शिवम दुबे मैदानात असूनही धावांसाठी संघर्ष, यलो आर्मी अडचणीत

    चेन्नई सुपर किंग्सला मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांसमोर वानखेडे स्टेडियममध्ये धावांसाठी संघर्ष करावा लागत आहे. चेन्नईकडून रवींद्र जडेजा आणि शिवम दुबे जोडी मैदानात आहे. मात्र त्यानंतरही चेन्नईला मोठे फटके मारण्यात अपयश येत आहे. त्यामुळे चेन्नईची डोकेदुखी वाढली आहे.

  • 20 Apr 2025 08:13 PM (IST)

    MI vs CSK Live Updates : शेख रशीद आऊट, यलो आर्मीला तिसरा झटका

    मुंबई इंडियन्सने चेन्नई सुपर किंग्सला तिसरा झटका दिला आहे. मिचेल सँटनर याने आपल्या शेख राशिदला आऊट केलं.  विकेटकीपर रायन रिकेल्टन याने शेख राशिदला स्टंपिंग आऊट केलं. शेखने 20 बॉलमध्ये 19 रन्स केल्या.

  • 20 Apr 2025 08:07 PM (IST)

    MI vs CSK Live Updates : आयुष म्हात्रे 32 धावा करुन आऊट

    चेन्नई सुपर किंग्सचा डेब्यूटंट आयुष म्हात्रे आऊट झाला आहे. चेन्नईने यासह दुसरी विकेट गमावली आहे. आयुषने 15 बॉलमध्ये 2 सिक्स आणि 4 फोरसह 32 रन्स केल्या. आयुषला दीपक चाहर याने मिचेल सँटनर याच्या हाती कॅच आऊट केलं आणि मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. आयुषने पदार्पणात 32 धावा करत आपली छाप सोडली.

  • 20 Apr 2025 07:56 PM (IST)

    MI vs CSK Live Updates : 4,6,6,आयुष म्हात्रेकडून कडक सुरुवात, अश्वनी कुमारला झोडला

    चेन्नई सुपर किंग्सचा 17 वर्षीय पदार्पणवीर आयुष म्हात्रे याने मुंबई इंडियन्स विरुद्ध धमाक्यात सुरुवात केली आहे.  आयुषने अश्वनी कुमार याच्या बॉलिंगवर चौथ्या ओव्हरमधील शेवटच्या 3 चेंडूत 4,6,6 ठोकत एकूण 16 धावा केल्या.

    आयुष म्हात्रेकडून कडक सुरुवात, अश्वनी कुमारची धुलाई

  • 20 Apr 2025 07:48 PM (IST)

    MI vs CSK Live Updates : रचीन रवींद्र आऊट, चेन्नईला पहिला झटका

    अश्वनी कुमार याने त्याच्या पहिल्याच ओव्हरमधील पहिल्याच बॉलवर रचीन रवींद्र याला आऊट करत चेन्नईला पहिला धक्का दिला आहे. अश्वनीने रचीन रवींद्र याला विकेटकीपर रायन रिकेल्टन याच्या हाती कॅच आऊट केलं. रचीनने 9 बॉलमध्ये 5 रन्स केल्या.

  • 20 Apr 2025 07:33 PM (IST)

    MI vs CSK Live Updates : सामन्याला सुरुवात, चेन्नईकडून रशीद-रचीन सलामी जोडी मैदानात

    मुंबई विरुद्ध चेन्नई सामन्याला सुरुवात झाली आहे. मुंबईने टॉस जिंकून चेन्नईला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे. चेन्नईकडून रचीन रवींद्र आणि शेख रशीद ही सलामी जोडी मैदानात आली आहे. तर मुंबईकडून दीपक चाहर हा पहिली ओव्हर टाकत आहे.

  • 20 Apr 2025 07:31 PM (IST)

    MI vs CSK Live Updates : आयुष म्हात्रेचं आयपीएल पदार्पण

    चेन्नई सुपर किंग्सने 17 वर्षीय युवा आणि लोकल बॉय असलेल्या आयुष म्हात्रे याला मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यातून पदार्पणाची संधी दिली आहे. आयुषला राहुल त्रिपाठी याच्या जागी संधी देण्यात आली आहे. आयुष चेन्नईकडून पदार्पण करणारा सर्वात युवा खेळाडू ठरला आहे.

  • 20 Apr 2025 07:24 PM (IST)

    MI vs CSK Live Updates : चेन्नई सुपर किंग्ज प्लेइंग ईलेव्हन 

    चेन्नई सुपर किंग्ज प्लेइंग ईलेव्हन : शेख रशीद, रचिन रवींद्र, आयुष म्हात्रे, रवींद्र जडेजा, शिवम दुबे, विजय शंकर, जेमी ओव्हरटन, महेंद्रसिंह धोनी (कर्णधार आणि विकेटकीपर), नूर अहमद, खलील अहमद आणि मथीशा पाथिराना.

  • 20 Apr 2025 07:23 PM (IST)

    MI vs CSK Live Updates : मुंबई इंडियन्स प्लेइंग ईलेव्हन

    मुंबई इंडियन्स प्लेइंग ईलेव्हन : रायन रिकेल्टन (विकेटकीपर), विल जॅक्स, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), नमन धीर, मिचेल सँटनर, दीपक चहर, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह आणि अश्विनी कुमार.

  • 20 Apr 2025 07:02 PM (IST)

    MI vs CSK Live Updates : मुंबईचा वानखेडे स्टेडियममध्ये बॉलिंगचा निर्णय, चेन्नईची पहिले बॅटिंग

    मुंबई इंडियन्सने घरच्या मैदानात वानखेडे स्टेडियममध्ये चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध टॉस जिंकला आहे. कर्णधार हार्दिक पंड्या याने सीएसकेविरुद्ध फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मुंबईच्या गोलंदाजांसमोर चेन्नईला मोठी धावसंख्या करण्यापासून रोखण्याचं आव्हान असणार आहे. मुंबईने प्लेइंग ईलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही.

  • 20 Apr 2025 06:51 PM (IST)

    MI vs CSK Live Updates : 7 वाजता टॉस होणार, क्रिकेट चाहत्यांचं लक्ष

    मुंबई विरुद्ध चेन्नई सामन्याआधी 7 वाजता टॉस होणार आहे.  वानखेडे स्टेडियममध्ये टॉस जिंकणाऱ्या टीमची फिल्डिंग घेण्यास पहिली पसंती असते. त्यामुळे वानखेडेत चेन्नई की मुंबई? टॉसचा बॉस कोण होणार? याकडे दोन्ही संघांच्या चाहत्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.

  • 20 Apr 2025 06:23 PM (IST)

    MI vs CSK Live Updates : मुंबई इंडियन्सची संभाव्य प्लेइंग ईलेव्हन

    मुंबई इंडियन्स संभाव्य प्लेइंग ईलेव्हन : रयान रिकल्टन, रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, विल जॅक्स, नमन धीर, हार्दिक पंड्या (कर्णधार), मिचेल सँटनर, जसप्रीत बुमराह, ट्रेन्ट बोल्ट आणि दीपक चाहर.

  • 20 Apr 2025 06:17 PM (IST)

    MI vs CSK Live Updates : सीएसकेची संभाव्य प्लेइंग ईलेव्हन

    चेन्नई सुपर किंग्स संभाव्य प्लेइंग ईलेव्हन : महेंद्रसिंह धोनी (कर्णधार), शिवम दुबे, शेख रशीद, राहुल त्रिपाठी, जेमी ओवरटन, रचिन रवींद्र, रवींद्र जडेजा, विजय शंकर, अंशुल कंबोज, नूर अहमद आणि खलील अहमद.

  • 20 Apr 2025 06:15 PM (IST)

    MI vs CSK Live Updates : आयुष म्हात्रेला डेब्यू करण्याची संधी मिळणार?

    चेन्नई सुपर किंग्सने दुखापतग्रस्त कर्णधार ऋतुराज गायकवाड याच्या जागी युवा 17 वर्षीय आयुष म्हात्रे याला संधी दिली आहे. आयुष देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबईचं प्रतिनिधित्व करतो. त्यामुळे सीएसके मॅनेजमेंट लोकल बॉय आयुषला घरच्या मैदानात वानखेडे स्टेडियममध्ये पदार्पणाची संधी देणार का? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष आहे.

  • 20 Apr 2025 06:06 PM (IST)

    MI vs CSK Live Updates : हेड टु हेड रेकॉर्ड्स

    मुंबई आणि चेन्नई या दोन्ही संघांत आयपीएलमध्ये 38 सामने खेळवण्यात आले आहेत. मुंबईने चेन्नईवर यापैकी सर्वाधिक सामन्यात कुरघोडी केली आहे. मुंबईचा 38 पैकी 20 वेळा विजय झाला आहे. तर चेन्नईने 18 वेळा पलटवार केला आहे.

  • 20 Apr 2025 05:48 PM (IST)

    MI vs CSK Live Updates : मुंबई इंडियन्स टीम

    मुंबई इंडियन्स टीम: रोहित शर्मा, विल जॅक्स, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, नमन धीर, रायन रिकेल्टन, रॉबिन मिन्झ (विकेटकीपर), मिचेल सँटनर, जसप्रीत बुमराह, रीस टोपली, ट्रेन्ट बोल्ट, दीपक चहर, मुजीब उर रहमान, कृष्णन श्रीजीत, कर्ण शर्मा, कॉर्बिन बॉश, राजा बावा, अर्जुन तेंडुलकर, बेव्हॉन जेकब्स, अश्वनी कुमार, सत्यनारायण राजू आणि विघ्नेश पुथूर.

  • 20 Apr 2025 05:46 PM (IST)

    MI vs CSK Live Updates : चेन्नई सुपर किंग्ज टीम

    चेन्नई सुपर किंग्ज टीम : महेंद्रसिंह धोनी (कर्णधार आणि विकेटकीपर), आयुष म्हात्रे, डेव्हॉन कॉनव्हे, रचिन रवींद्र, विजय शंकर, रवींद्र जडेजा, शिवम दुबे, सॅम करन, आर अश्विन, मथीशा पाथिराना, कमलेश नागरकोटी, नॅथन एलिस, मुकेश चौधरी, राहुल त्रिपाठी, दीपक हुड्डा, खलील अहमद, जेमी ओव्हरटन, शेख रशीद, अंशुल कंबोज, श्रेयस गोपाल, नूर अहमद, डेवाल्ड ब्रेव्हीस, रामकृष्ण घोष, आंद्रे सिद्धार्थ सी आणि वंश बेदी.

  • 20 Apr 2025 05:40 PM (IST)

    MI vs CSK Live Updates : मुंबई विरुद्ध चेन्नई महामुकाबला

    आयपीएलच्या 18 व्या मोसमातील 38 व्या सामन्यात मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स भिडणार आहेत. सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. तर 7 वाजता टॉस होणार आहे. सामना वानखेडे स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे.