
मुंबई : मुंबई इंडिअन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यातील सामन्यात मुंबईने 27 धावांनी विजय मिळवला आहे. प्रथम फलंदाजी करताना सूर्याच्या नाबाद 103 धावांच्या शतकी खेळीच्या जोरावर मुंबईने 218 धावांचां डोंगर उभा केला होता. या लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरात संघाला 20 षटकात 191-8 धावाच करता आल्या. या विजयासह मुंबईने पॉइंट टेबलमध्ये तिसऱ्या स्थानी झेप घेतली आहे.
सूर्याने 49 चेंडूत नाबाद 103 धावा केल्या. त्याने 11 चौकार आणि 6 षटकार मारले. त्यासोबतच ईशान किशन 30 आणि रोहित शर्माने 29 धावा केल्या. गुजरातच्या राशिद खानने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या आणि 79 धावांची नाबाद खेळीसुद्धा केली.
गुजरात टायटन्स (प्लेइंग इलेव्हन): रिद्धिमान साहा, विजय शंकर, हार्दिक पांड्या (C), डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, अभिनव मनोहर, मोहित शर्मा, राशिद खान, मोहम्मद शमी, अल्झारी जोसेफ, नूर अहमद
मुंबई इंडियन्स (प्लेइंग इलेव्हन): इशान किशन (W), रोहित शर्मा (C), कॅमेरॉन ग्रीन, सूर्यकुमार यादव, नेहल वढेरा, टिम डेव्हिड, ख्रिस जॉर्डन, विष्णू विनोद, पीयूष चावला, जेसन बेहरेनडॉर्फ, कुमार कार्तिकेय
मुंबई इंडियन्सने गुजरात टायटन्सवर 27 धावांनी विजय मिळवला. गुजरातकडून राशीद खानने नाबाद 79 धावा केल्या. त्याने 32 चेंडूंचा सामना करत 10 षटकार आणि 3 चौकार लगावले. राशदने फलंदाजीबरोबरच गोलंदाजीतही अप्रतिम कामगिरी केली. त्याने 4 विकेट घेतल्या. डेव्हिड मिलरने 41 धावांचे योगदान दिले. प्रथम फलंदाजी करताना मुंबईने 219 धावांचे लक्ष्य दिले होते. याला प्रत्युत्तर देताना गुजरातचा संघ केवळ 191 धावाच करू शकला.
गुजरात टायटन्सने 16 षटकांत 8 गडी गमावून 136 धावा केल्या. संघाला विजयासाठी 24 चेंडूत 83 धावांची गरज आहे. राशिद खान 12 चेंडूत 26 धावा करून खेळत आहे. जोसेफ 7 धावा करून खेळत आहे.
गुजरात टायटन्सची सहावी विकेट गेली आहे. डेव्हिड मिलर 26 चेंडूत 41 धावा करून बाद झाला. आकाशने त्यांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. संघाने 12 षटकांत 6 गडी गमावून 100 धावा केल्या. त्यानंतर चावलाने राहुल तेवतियाला आऊट केलं आहे. त्यानंतर कुमारने नूर अहमदला आऊट करत आठवा धक्का दिला आहे.
गुजरात टायटन्सची पडली चौथी विकेट. विजय शंकर 14 चेंडूत 29 धावा करून बाद झाला. पियुष चावलाने त्याला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. गुजरातने 6.2 षटकांत 4 गडी गमावून 49 धावा केल्या. आता डेव्हिड मिलर आणि अभिनव मनोहर फलंदाजी करत आहेत.
मुंबईने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना गुजरात संघाची सुरूवात खराब झाली आहे. गुजरातच्या 3 विकेट्स गेल्या असून रिद्धिमान साहा, हार्दिक पंड्या आणि शुबमन गिल तंबूत परतले आहेत.
मुंबई इंडियन्सने गुजरात टायटन्सला विजयासाठी 219 धावांचं लक्ष्य दिले आहे. सूर्यकुमार यादवने स्फोटक फलंदाजी करताना शतक झळकावले. सूर्याने 49 चेंडूत नाबाद 103 धावा केल्या. त्याने 11 चौकार आणि 6 षटकार मारले. इशान किशनने 31 आणि रोहित शर्माने 29 धावा केल्या. गुजरातकडून राशिद खानने 4 षटकात 30 धावा देत 4 बळी घेतले.
मुंबई इंडियन्सची चौथी विकेट पडली. विष्णू विनोद 20 चेंडूत 30 धावा करून बाद झाला. मोहित शर्माने त्याला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. संघाने 16 षटकांत 4 गडी गमावून 153 धावा केल्या. सूर्यकुमार 47 धावा करून खेळत आहे.
दहा ओव्हरनंतर मुंबईची धावसंख्या 96-3 असून मैदानात सूर्यकुमार यादव 18 धावांवर आणि विष्णू विनोद 1 धाव काढून खेळत आहे. गुजरातच्या फक्त राशिद खान यालाच तिन्ही विकेट मिळाल्या आहेत.
रोहित शर्माला राशिद खानने आऊट केलं आहे. 29 धावांवर रोहित आऊट झाला आहे. आयपीएलमध्ये चौथ्यांदा राशिदने त्याला आऊट केलं आहे. त्याच ओव्हरमध्ये आक्रमक ईशान किशनलाही राशिदने आऊट करत मुंबईला दोन धक्के दिले आहेत. किशन 31 धावांवर आऊट झाला आहे.
रोहित शर्मा आणि ईशान किशन यांच्यात अर्धशतकी भागीदारी झाली आहे. मुंबईने 6 ओव्हरमध्ये 61 धावा केल्या. रोहित 17 चेंडूत 29 धावा करून खेळत आहे. इशान किशनने 19 चेंडूत 31 धावा केल्या आहेत.
मुंबई इंडियन्सकडून रोहित शर्मा आणि ईशान किशन सलामीला आहेत. गुजरात टायटन्सकडून पहिली मोहम्मद शमी टाकत आहे. रोहित शर्मा आणि ईशान किशन यांनी दमदार सुरूवात केली आहे. महत्त्वाचं म्हणजे कर्णधार रोहित शर्माने मोहित शर्माला दुसऱ्या ओव्हरमध्ये सिक्स चौकार मारत 2 ओव्हरमध्ये 20 धावा वसूल केल्या आहेत.
मुंबई बॅटींग करणार असल्याने आता रोहित शर्मा, ईशान किशन, सूर्यकुमार यादव, टीम डेव्हिड यांच्यावर मोठा स्कोर करण्याची मोठी जबाबदारी आहे.
रोहितने टॉस हरला असला तरी मुंबईसाठी सकारात्मक बाजू म्हणजे मुंबईने धावांचा पाठलाग करतान सामने जिंकले आहेत. 200 पेक्षा जास्त धावांचा मुंबईने पाठलाग केला आहे. आज आव्हान थोडं कडवं असणार असून फॉर्ममध्ये असलेल्या गुजरात संघामधील राशिद खान, नूर अहमद, मोहम्मद शमी, हार्दिक पंड्या असणार आहेत.
मुंबईने मागील सामन्यामधीलच संघ कायम ठेवल्याने या सामन्यातही तिलक वर्मा खेळताना दिसणार नाही.
गुजरात टायटन्स (प्लेइंग इलेव्हन): रिद्धिमान साहा, विजय शंकर, हार्दिक पांड्या (C), डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, अभिनव मनोहर, मोहित शर्मा, राशिद खान, मोहम्मद शमी, अल्झारी जोसेफ, नूर अहमद
मुंबई इंडियन्स (प्लेइंग इलेव्हन): इशान किशन (W), रोहित शर्मा (C), कॅमेरॉन ग्रीन, सूर्यकुमार यादव, नेहल वढेरा, टिम डेव्हिड, ख्रिस जॉर्डन, विष्णू विनोद, पीयूष चावला, जेसन बेहरेनडॉर्फ, कुमार कार्तिकेय
गुजरात टायटन्स संघाचा कर्णधार हार्दिक पंड्या याने टॉस जिंकला आहे. हार्दिकने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही संघाने आपल्या अंतिम 11 खेळाडूंमध्ये कोणताही बदल केलेला नाही.
Hello from Wankhede ??️@mipaltan take on @gujarat_titans in Match 5️⃣7️⃣
Who are you supporting? ?#TATAIPL | #MIvGT pic.twitter.com/EbWK0YC8t9
— IndianPremierLeague (@IPL) May 12, 2023
मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा, इशान किशन, सूर्यकुमार यादव, नेहल वढेरा, कॅमेरून ग्रीन, टिम डेव्हिड, पियुष चावला, ख्रिस जॉर्डन, आकाश मधवाल, कुमार कार्तिकेय, जेसन बेहरेनडॉर्फ
गुजरात टायटन्स : ऋद्धिमान साहा, शुभमन गिल, हार्दिक पंड्या, विजय शंकर, डेव्हिड मिलर, अभिनव मनोहर, राहुल तेवतिया, रशीद खान, मोहित शर्मा, नूर अहमद, मोहम्मद शमी