AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2023 Points Table | सूर्याच्या शानदार शतकाच्या जोरावर मिळवलेल्या विजयानंतर पॉइंट टेबलमध्ये पलटणचा टॉप गिअर, आता थेट…

IPL 2023 Points Table Purple Cap and Orange Cap : मुंबईने महत्त्वाच्या सामन्यामध्ये 27 धावांनी विजय मिळवला आहे. या विजयासह पलटणने प्ले ऑफधील आपलं स्थान पक्क करण्याच्या दिशेने एक मोठं पाऊल टाकलं आहे.

IPL 2023 Points Table | सूर्याच्या शानदार शतकाच्या जोरावर मिळवलेल्या विजयानंतर पॉइंट टेबलमध्ये पलटणचा टॉप गिअर, आता थेट...
| Updated on: May 13, 2023 | 12:51 AM
Share

मुंबई : आयपीएलमधील 57 व्या मुंबई इंडिअन्स आणि गुजरात टायटन्स या संघांमधील सामन्यामध्ये मुंबई संघाने विजय मिळवला आहे. स्टार खेळाडू सूर्यकुमार यादव याने केलेल्या शतकाच्या जोरावर मुंबई संघाने पहिल्यांदा बॅटींग करताना 218 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. मात्र या लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरात टायटन्स संघाला काही यश आलं नाही. गुजराते 20 षटकात 191 धावा केल्या आणि मुंबईने महत्त्वाच्या सामन्यामध्ये 27 धावांनी विजय मिळवला आहे. या विजयासह पलटणने प्ले ऑफधील आपलं स्थान पक्क करण्याच्या दिशेने एक मोठं पाऊल टाकलं आहे.

संघमॅचविजय पराभवगुणएनआरआर
गुजरात टायटन्स1410420+0.820
चेन्नई सुपर किंग्स148517+0.652
लखनऊ सुपर जायंट्स 148517+0.284
मुंबई इंडियन्स 148616-0.044
राजस्थान रॉयल्स147714+0.148
आरसीबी 137614-0.128
केकेआर146812-0.229
पंजाब किंग्स146812-0.304
दिल्ली कॅपिटल्स145910-0.808
सनरायजर्स हैदराबाद 134908-0.558

मुंबई इंडिअन्सन संघाने या विजयासह पॉइंट टेबलमध्ये तिसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. मुंबईला आता प्ले-ऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी दोन विजय मिळवणं गरजेचं आहे. मात्र आतासुद्धा सर्व काही गणित स्पष्ट झालेली नाहीत. गुजरात 16 गुण आणि प्लस 0. 761 रनरेटसह पहिल्या स्थानावर कायम आहे. दुसऱ्या स्थानी 15 गुणांसह +0.493 च्या रनरेटने सीएसके आहे. मुंबई आता तिसऱ्या स्थानी आली असून मुंबईचे 14 गुण झाले आहेत. चौथ्या स्थानी राजस्थान रॉयल्स 12 गुणांसह आहे.

पाचव्या क्रमांकावर लखनऊ सुपर जायंट्स 11 गुणांसह आहे. सहाव्या, सातव्या आणि आठव्या स्थानी अनुक्रने आरसीबी, केकेआर आणि पंजाब हे संघ 10 गुणांसह आहेत. त्यामुळे आता शेवटचे दोन-चार सामने सर्व संघांसाठी फक्त जिंकणं नाहीतर रनरेटकडेही लक्ष देऊन खेळावे लागणार आहेत.

सूर्याने 49 चेंडूत नाबाद 103 धावा केल्या. त्याने 11 चौकार आणि 6 षटकार मारले. त्यासोबतच ईशान किशन 30 आणि रोहित शर्माने 29 धावा केल्या. गुजरातच्या राशिद खानने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या आणि 79 धावांची नाबाद खेळीसुद्धा केली.

गुजरात टायटन्स (प्लेइंग इलेव्हन): रिद्धिमान साहा, विजय शंकर, हार्दिक पांड्या (C), डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, अभिनव मनोहर, मोहित शर्मा, राशिद खान, मोहम्मद शमी, अल्झारी जोसेफ, नूर अहमद

मुंबई इंडियन्स (प्लेइंग इलेव्हन): इशान किशन (W), रोहित शर्मा (C), कॅमेरॉन ग्रीन, सूर्यकुमार यादव, नेहल वढेरा, टिम डेव्हिड, ख्रिस जॉर्डन, विष्णू विनोद, पीयूष चावला, जेसन बेहरेनडॉर्फ, कुमार कार्तिकेय

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.