
मुंबई इंडियन्सला आयपीएल स्पर्धेतील चौथ्या पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर मुंबईने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण आरसीबीने या मैदानात 221 धावा केल्या आणि विजयासाठी 222 धावांचं आव्हान दिलं. हे खडतर वाटणारं आव्हान मुंबईने गाठते की काय अशी स्थिती होती. पण शेवटच्या षटकात कृणाल पांड्याने 3 विकेट घेतल्या आणि 12 धावांनी पराभवाला सामोरं जावं लागलं.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने मुंबई इंडियन्सला वानखेडेवर 10 वर्षांनी पराभूत केलं. आरसीबीने 20 षटकात 5 गडी गमवून 221 धावा केल्या होत्या आणि विजयासाठी 222 धावांचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान मुंबई इंडियन्सला काही गाठता आलं नाही. मुंबईचा संघ 20 षटकात 9 गडी गमवून 209 धावा करू शकला आणि 12 धावांनी पराभव सहन करावा लागला.
कृणाल पांड्याने शेवटचं षटक एकदम जबरदस्त टाकलं. तीन विकेट घेत फक्त 7 धावा दिल्या आणि 12 धावांनी विजय मिळवला.
मुंबई इंडियन्सला सहावा धक्का बसला आहे. हार्दिक पांड्या बाद झाला.
तिलक वर्मा 29 चेंडूत 56 धावा केल्या. त्याने 4 चौकार आणि 4 षटकार मारले.
मुंबई इंडियन्सला विजय मिळवून देण्यासाठी हार्दिक पांड्या आणि तिलक वर्माची फटकेबाजी सुरु आहे.
सूर्यकुमार यादव 28 धावा करून बाद झाला आहे. मोठे फटके मारण्यात त्याला अपयश आलं.
विल जॅक्सच्या रुपाने मुंबई इंडियन्सला तिसरा धक्का बसला आहे.
रिकल्टनचा खेळ 17 धावांवर बाद झाला. हेझलवूडने बाद केलं.
रोहित शर्मा पुन्हा एकदा फेल गेला आहे. 9 चेंडूत 17 धावा करून बाद झाला आहे. यश दयालने त्याची विकेट काढली.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने दिलेलं 222 धावांचं आव्हान गाठण्यासाठी रोहित शर्मा आणि रिकल्टन जोडी मैदानात उतरली आहे. या जोडीने आक्रमक सुरुवात केली आहे. पण विजयी आव्हान खूपच आहे. पहिल्याच षटकात 13 धावा आल्या.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या फलंदाजांनी तडाखेदार खेळी करत मुंबईच्या गोलंदाजांची धुलाई केली आहे. आरसीबीने मुंबईला विजयासाठी 222 धावांचं आव्हान दिलं आहे. आरसीबीने 20 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 221 धावा केल्या.
मुंबईने आरसीबीला चौथा झटका दिला आहे. हार्दिकने विराट कोहली याच्यानंतर लियाम लिविंगस्टोन याला आऊट केलं आहे. लियामला भोपळाही फोडता आला नाही.
कर्णधार हार्दिक पंड्या याने विराट कोहली याला नमन धीर याच्या हाती कॅच आऊट करत आरसीबीला तिसरा झटका दिला आहे. विराटने 8 फोर आणि 2 सिक्ससह 42 बॉलमध्ये 67 रन्स केल्या.
विघ्नेश पुथुर याने विराट कोहली-देवदत्त पडीक्कल ही जोडी फोडली आहे. विघ्नेशने देवदत्त पडीक्कल याला 37 धावांवर विल जॅक्स याच्या हाती कॅच आऊट केलं. विराट आणि देवदत्त या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 91 धावांची भागीदारी केली.
ट्रेन्ट बोल्ट याने आरसीबीला डावातील पहिल्या ओव्हरमध्येच पहिला झटका दिला आहे. बोल्टने फिल सॉल्ट याला 4 धावांवर क्लिन बोल्ड केलं. सॉल्टने आरसीबीला चौकार ठोकून अप्रतिम सुरुवात करुन दिली. मात्र बोल्टने दुसऱ्या बॉलवर कमबॅक करत मुंबईला पहिली विकेट मिळवून दिली.
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू प्लेइंग ईलेव्हन : फिलिप सॉल्ट, विराट कोहली, देवदत्त पडिक्कल, रजत पाटीदार (कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (विकेटकीपर), टिम डेव्हिड, क्रुणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, जोश हेजलवुड आणि यश दयाल.
मुंबई इंडियन्स प्लेइंग ईलेव्हन : विल जॅक्स, रायन रिकेल्टन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), नमन धीर, मिचेल सँटनर, दीपक चहर, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह आणि विघ्नेश पुथूर.
मुंबई इंडियन्सने टॉस जिंकला आहे. कर्णधार हार्दक पंड्या याने आरसीबीविरुद्ध फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू टीम: फिलिप सॉल्ट, विराट कोहली, देवदत्त पडिक्कल, रजत पाटीदार (कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (विकेटकीपर), टिम डेव्हिड, क्रुणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, जोश हेजलवुड, यश दयाल, सुयश शर्मा, रसिक दार सलाम, मनोज भंडागे, जेकब बेथेल, स्वप्नील सिंग, अभिनंदन सिंग, रोमॅरियो शेफर्ड, लुंगी एनगिडी, नुवान तुषारा, मोहित राठी आणि स्वस्तिक चिकारा.
मुंबई इंडियन्स टीम : रोहित शर्मा, रायन रिकेल्टन (विकेटकीपर), विल जॅक्स, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या (कर्णधार), तिलक वर्मा, रॉबिन मिन्झ, नमन धीर, मिचेल सँटनर, दीपक चहर, ट्रेंट बोल्ट, सत्यनारायण राजू, विघ्नेश पुथूर, राज बावा, अश्वनी कुमार, कॉर्बिन बॉश, कर्ण शर्मा, जसप्रीत बुमराह, रीस टोपले, मुजीब उर रहमान, बेव्हॉन जेकब्स, अर्जुन तेंडुलकर आणि कृष्णन श्रीजीथ.
आयपीएलच्या 18 व्या मोसमात आज 7 एप्रिलला वानखेडे स्टेडिममध्ये मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात लढत होणार आहे. या सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे.