
पहिल्या कसोटी सामन्यात भारताची बाजू भक्कम असतानाही पराभवाचं तोंड पाहावं लागलं. खरं तर चौथ्या दिवसापर्यंत भारत हा सामना जिंकेल असं वाटत होतं. पण पाचव्या दिवशी बेजबॉल रणनितीने भारताच्या गोलंदाजांची पिसं काढली आणि 5 गडी राखून विजय मिळवला. असं असताना मैदानाबाहेरही भारत आणि इंग्लंड यांच्यात खडाजंगी सुरु झाली आहे. सोशल मीडियावर दोन्ही देशाचे माजी खेळाडू भिडले आहेत. मायकल वॉन आणि वसिम जाफर हे दोन्ही खेळाडू भारत-इंग्लंड सामना असला की भिडतात. एकमेकांची खिल्ली उडवण्याची एकही संधी सोडत नाहीत. लीड्स कसोटी विजयानंतर मायकल वॉनला वसिम जाफर डिवचण्याची संधी मिळाली आहे. इंग्लंडचा माजी कर्णधार वसिम जाफर याचं ट्वीट रिट्वीट करत पोस्ट केली. तसेच मालिका 4-0 जिंकू असं भाकीतही केलं.
भारताने सामना गमावल्यानंतर वॉनने लिहिलं की, ‘संध्याकाळ वसिम जाफर… आशा आहे की तू ठीक आहे.’ असं ट्वीट करत हॅशटॅग 1-0 असं केलं. त्यावर वसिम जाफरने मायकल वॉनचा एक फोटो पोस्ट केला. यात मायकल वॉन रागाच्या भरात समालोचन करताना दिसत आहे. ‘भारताच्या युवा संघाने अशा पद्धतीने चिंतेत टाकल्याचं पाहून आनंद झाला. हा विजय मायकल आनंदाने साजरा करतोय. आम्ही परत येऊ.’ असं ट्वीट वसिम जाफरने केलं होतं. त्याच ट्वीटला रिट्वीट करत मायकल वॉनने लिहिलं की, ‘वसीम आम्ही 4-0 होऊ शकतो.’
Could be 4-0 now Wasim .. 😜 https://t.co/RXsmxGdZYd
— Michael Vaughan (@MichaelVaughan) June 24, 2025
दुसरीकडे, मायकल वॉनने या विजयाचं श्रेय बेन डकेटला दिलं. यासाठी त्याला सामनावीराच्या पुरस्काराने गौरविण्यात आलं. वॉनने टेलिग्राफसाठी लिहिलेल्या लेखात म्हंटलं की, ‘या विजयाचा केंद्रबिंदु बेन डकेट होता. त्याला या टीममध्ये ते श्रेय मिळालं नाही. त्याचा तो हक्क आहे.’ मायकल वॉनने पुढे सांगितलं की, ‘माझ्या मते तो सध्याच्या घडीतील आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्व फॉर्मेटमधील सर्वोत्कृष्ट फलंदाज आहे. काही खेळाडू एका फॉर्मेटमध्ये चांगले असू शकतात, पण त्यापैकी कोणही तिन्ही फॉर्मेटमध्ये चांगला नाही. ट्रेव्हिस हेड आणि एडन मार्करम असू शकतात. पण त्यांच्यापेक्षा बेन चांगला आहे. खासरून तिन्ही फॉर्मेटमध्ये तो कठीण परिस्थितीत ओपनिंग करतो.’