Mitchell santner on india vs new zealand odi series : भारताने मालिका जिंकली, पण सँटनरचा तोरा कायम; पराभवानंतर म्हणाला…

India vs new zealand odi series : भारताविरुद्ध वनडे मालिकेत न्यूझीलंडला 1-3 असा पराभव स्वीकारावा लागला. मात्र, मालिकेतील सामने एकतर्फी नव्हते, असं न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनरने म्हटलं आहे. अनेक महत्त्वाच्या क्षणी संधी गमावल्याची कबुलीही त्याने दिली. शेवटच्या वनडेत 210 धावांचं लक्ष्य गाठता आलं असतं, असंही सँटनरने सांगितलं.

Mitchell santner on india vs new zealand odi series : भारताने मालिका जिंकली, पण सँटनरचा तोरा कायम; पराभवानंतर म्हणाला...
mitchell santner on india vs new zealand odi series
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Nov 15, 2026 | 10:56 PM

भारताविरुद्ध पाचव्या आणि शेवटच्या वनडे सामन्यात न्यूझीलंडला 22 रनने पराभव स्वीकारावा लागला. या पराभवासह न्यूझीलंडला 3-1 अशा फरकाने मालिका गमवावी लागली. बे ओव्हल येथे झालेल्या या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करत 209 रन केले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा संघ अपयशी ठरला. सामना गमावल्यानंतर न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनर याने पराभवाची कारणे सांगितली. फलंदाजांनी भागीदारी अधिक काळ टिकवली असती आणि परिस्थितीनुसार खेळ केला असता, तर सामन्याचा निकाल वेगळा लागला असता, असे त्याने म्हटले.

सँटनर नेमकं काय म्हणाला?

सामना गमावल्यानंतर मिचेल सँटनरने भारतीय बॉलर्सचे कौतुक केले. तो म्हणाला, “आज भारताची बॉलिंग खूप चांगली होती. त्यांचे चारही फास्ट बॉलर्स उत्कृष्ट खेळले. श्रेयसने त्यांना योग्य पद्धतीने आलटून-पालटून बॉलिंग दिली. त्यांनी अक्षरला रोखून धरले, कारण त्यांचे फास्ट बॉलर्स चांगल्या फॉर्ममध्ये होते. मिडल ओव्हर्समध्ये त्यांनी सातत्याने विकेट्स घेतल्या. आम्ही प्रत्येक पार्टनरशिप थोडा अधिक काळ टिकवू शकलो असतो, तर सामना जिंकण्याची संधी होती. मात्र, काही काळ बॅटिंग करणे कठीण जात होते. त्यांनी अर्शदीप आणि सिराजला योग्य वेळी पुन्हा बॉलिंगसाठी आणले. एकंदरीत, भारतीय बॉलर्सनी उत्कृष्ट कामगिरी केली. पिच कधी चांगली तर कधी संथ वाटत होती. त्यामुळे आमच्यावरील दबाव वाढला. भारतीय बॉलर्सनी बाऊन्सचाही चांगला उपयोग केला.”

Loading...

पुढे बोलताना सँटनर म्हणाला, “अर्ध्या टप्प्यावर मी खूप समाधानी होतो. पिचकडून आम्हाला अपेक्षेप्रमाणे मदत मिळाली नाही. आमच्या खेळाडूंनी परिस्थितीनुसार स्वतःला चांगल्या प्रकारे जुळवून घेतले. पिच थोडी संथ होती. मिडल ओव्हर्समध्ये ‘बीस्ट’ने (मायकेल ब्रेसवेल) ज्या प्रकारे बॉलिंग केली, ती उत्कृष्ट होती. आम्ही नियमित अंतराने विकेट्स घेत राहिलो. 209 रनच्या स्कोअरवर मी खूप आनंदी होतो. मालिकेचा निकाल 3-1 असा दिसत असला, तरी प्रत्यक्षात सामने यापेक्षा कितीतरी अधिक चुरशीचे झाले.”

मालिकेतून सकारात्मक बाबीही समोर

संपूर्ण मालिकेत न्यूझीलंडच्या संघाने चांगले क्रिकेट खेळल्याचेही सँटनरने सांगितले. तो म्हणाला, “आम्ही चांगले क्रिकेट खेळलो. अर्थात, काही वेळा पाऊस आला आणि आम्ही काही टॉसही गमावले. मात्र, या सर्व गोष्टींनंतरही अनेक सकारात्मक बाबी समोर आल्या. आजच्या आणि मागील सामन्यात आम्ही खेळ आणखी थोडा पुढे नेऊ शकलो असतो, तर ते अधिक चांगले झाले असते. 50 ओव्हरच्या क्रिकेटमध्ये, विशेषतः बॅटिंग करताना, तुमच्याकडे पुरेसा वेळ असतो. याशिवाय, वेगवेगळ्या खेळाडूंना संधी देणे हा एक चांगला अनुभव होता. खेळाडूंनीही जबाबदारी स्वीकारली, ही आमच्यासाठी सकारात्मक बाब आहे.”

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us