WTC Final 2023 : फक्त देशाकडून टेस्ट खेळण्यासाठी एका ऑस्ट्रेलियन प्लेयरने IPL चे कोट्यावधी रुपये धुडकावले

WTC Final 2023 : बहुतांश क्रिकेटपटू हे देशाकडून खेळण्याऐवजी आयपीएलला प्राधान्य देतात. दिवसेंदिवस लीग क्रिकेट खेळणाऱ्या प्लेयर्सची संख्या वाढत चाललीय.

WTC Final 2023 : फक्त देशाकडून टेस्ट खेळण्यासाठी एका ऑस्ट्रेलियन प्लेयरने IPL चे कोट्यावधी रुपये धुडकावले
टीम इंडियासाठी ही एकदिवसीय मालिका फार महत्वाची आहे. या मालिकेत टीम इंडियाचं प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या दोन्ही संघात वनडे क्रिकेटमधील एक नंबर होण्यासाठी कडवी झुंज पाहायला मिळत आहे. ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेतील पराभवाचा वचपा घेण्यासाठी सज्ज आहे. तर टीम इंडियासमोर अव्वल स्थान कायम ठेवण्याचं आव्हान आहे.
| Updated on: Jun 06, 2023 | 3:35 PM

लंडन : इंडियन प्रीमियर लीगमध्ये अनेक क्रिकेटपटूंना खेळण्याची इच्छा असते. आयपीएलमध्ये खेळण्याची एक संधी मिळावी, यासाठी देश-विदेशातील क्रिकेटपटू प्रयत्न करतात. ऑक्शनमध्ये आपलं नाव नोंदवतात. पण फार कमी जणांना आयपीएलमध्ये संधी मिळते. शेकडो प्लेयर्स अनसोल्ड राहतात. आयपीएलमध्ये एक संधी मिळावी यासाठी इतकी धडपड का असते? यामागे कारण आहे, तिथे मिळणारा पैसा.

बहुतांश क्रिकेटपटू हे देशाकडून खेळण्याऐवजी आयपीएलला प्राधान्य देतात. दिवसेंदिवस लीग क्रिकेट खेळणाऱ्या प्लेयर्सची संख्या वाढत चाललीय. हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच क्रिकेटपटू देशाला पहिलं प्राधान्य देतात.

ऑस्ट्रेलियाचा एक अव्वल खेळाडू आयपीएलला अपवाद

ऑस्ट्रेलियाचा एक अव्वल खेळाडू अशाच क्रिकेटर्समध्ये मोडतो. ऑस्ट्रेलियाचा डावखुरा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क अपवाद आहे. स्टार्क आयपीएलचे फक्त दोन सीजन खेळलाय. 2014-15 मध्ये तो रॉयल चॅलेंजर्स बँगलोरकडून खेळला होता. पण त्यानंतर तो या लीगमध्ये दिसला नाही.

गोलंदाजी आक्रमणाच मुख्य अस्त्र

पुढच्या सीजनमध्ये सुद्धा आयपीएलमध्ये खेळणार नाही, हे स्टार्कने स्पष्ट केलय. टेस्ट क्रिकेटमध्ये दीर्घकाळ खेळण्याची त्याची रणनिती आहे. स्टार्क सध्या लंडनमध्ये आहे. तो आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची तयारी करतोय. फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाचा सामना भारताविरुद्ध होणार आहे. उद्या म्हणजे 7 जूनपासून फायनल मॅच सुरु होईल. इंग्लंडच्या द ओव्हल मैदानात फायनल होणार आहे. मिचेल स्टार्क ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजी आक्रमणाच मुख्य अस्त्र आहे.


‘मी तिथपर्यंत पोहोचीन की, नाही मला माहित नाही’

आयपीएलपेक्षा पण माझ्यासाठी 100 टेस्ट मॅच खेळणं जास्त महत्वाच आहे, असं स्टार्कने सांगितलं. स्टार्क क्रिकेट ऑस्ट्रेलियाशी बोलताना म्हणाला की, “आयपीएलमध्ये चांगला पैसा मिळतो. पण 100 टेस्ट मॅच खेळणं मला जास्त आवडेल. मी तिथपर्यंत पोहोचीन की, नाही मला माहित नाही. पण 100 टेस्ट मॅचच्या बॉक्सला टिक करणं चांगलं असेल”

स्टार्क या दरम्यान स्वत:च्या निवृत्तीबद्दल सुद्धा बोलला. “10 वर्ष तिन्ही फॉर्मेटमध्ये खेळणं कठीण आहे. ऑस्ट्रेलियन टीममध्ये नवीन डावखुरा वेगवान गोलंदाज येईल, तेव्हा माझ्या निवृत्तीची वेळ जवळ आलेली असेल”