WPL 2023 Eliminator, MUW vs UPW | यूपी वॉरियर्स टीमचा निर्णायक सामन्यात टॉस जिंकून मोठा निर्णय

वूमन्स प्रीमिअर लीग स्पर्धेतील एलिमिनेटर सामन्यात मुंबई इंडियन्स विरुद्ध यूपी वॉरियर्स यांच्यात सामना होत आहे. हा सामना जिंकणारा संघ अंतिम फेरीत दिल्ली विरुद्ध दोन हात करेल.

WPL 2023 Eliminator, MUW vs UPW | यूपी वॉरियर्स टीमचा निर्णायक सामन्यात टॉस जिंकून मोठा निर्णय
Follow us
| Updated on: Mar 24, 2023 | 8:18 PM

नवी मुंबई | वूमन्स प्रीमिअर लीग 2023 स्पर्धा ही शेवटच्या टप्प्यात पोहचली आहे. दिल्ली कॅपिट्ल्सने आधीच फायनलमध्ये पोहचली आहे. तर आता दुसरी फायनलिस्ट टीम कोण हे अवघ्या काही तासांमध्ये ठरणार आहे. वूमन्स प्रीमिअर लीग स्पर्धेतील एलिमिनेटर सामन्याचं आयोजन हे नवी मुंबईतील डी वाय पाटील स्पोर्ट्स एकेडमीत करण्यात आलं आहे. यूपी वॉरियर्जने टॉस जिंकून पहिले फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे मुंबई इंडियन्सला बॅटिंग करत मोठी धावसंख्या उभारण्याची संधी मिळाली आहे.

या मोसमात मुंबई विरुद्ध यूपी यांच्यात एकूण 2 वेळा आमनेसामने आले. यातील पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने युपीचा धुव्वा उडवला. तर दुसऱ्या सामन्यात युपीने विजय मिळवत मागील पराभवाचा वचपा घेतला.  मुंबई विरुद्ध यूपी यांच्यात पहिला सामना हा 12 मार्च रोजी खेळवण्यात आला होता.  मुंबईने या सामन्यात कॅप्टन हरमनप्रीत कौर हीच्या अर्धशतकाच्या जोरावर  यूपीवर 8 विकेट्सने विजय मिळवला होता.

तर यानंतर 18 मार्च रोजी दोन्ही संघ पुन्हा भिडले.  या लो स्कोअरिंग सामन्यात चांगलीच लढत झाली होती.  मंबईने बॅटिंग करत  यूपीला विजयासाठी 128 धावांचं आव्हान दिलं होतं. मुंबईच्या गोलंदाजांनी कमी धावांचं चांगल्या पद्धतीने अखेरपर्यंत बचाव केला होता.  यूपीच्या हातात विकेट्स होत्या. मात्र मुंबईच्या गोलंदाजांनी यूपीला चांगलंच बांधून ठेवलं होतं.  पण अखेरीस यूपीने  18 व्या ओव्हरमध्येच हे आव्हान पूर्ण करत विजय मिळवला होता.  यासह यूपीने पहिल्या पराभवाचा वचपा घेतला.

यूपी वॉरियर्सने टॉस जिंकला

तिसऱ्या सामन्यात कोण जिंकणार?

दरम्यान हे दोन्ही संघ एलिमिनेटरच्या निमित्ताने या स्पर्धेत तिसऱ्यांदा आमनेसामने आले आहेत. आता हा सामना जिंकून अंतिम फेरीत पोहचण्यासाठी दोन्ही संघात झुंज पाहायला मिळणार आहे. त्यामुळे या सामन्यात नक्की कोणती टीम जिंकून दिल्ली विरुद्ध विजेतेपदसाठी दोन हात करणार, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

मुंबई इंडियन्स प्लेइंग इलेव्हन | हरमनप्रीत कौर (कॅप्टन), हेली मॅथ्यूज, यास्तिका भाटिया (विकेटकीपर), नॅट सायव्हर-ब्रंट, मेली केर, पूजा वस्त्राकर, इस्सी वाँग, अमनजोत कौर, हुमैरा काझी, जिंतिमनी कलिता आणि सायका इशाक.

यूपी वॉरियर्स | अलिसा हिली (विकेटकीपर आणि कॅप्टन), श्वेता सेहरावत, सिमरन शेख, ताहलिया मॅकग्रा, ग्रेस हॅरिस, किरण नवगिरे, दीप्ती शर्मा, सोफी एक्लेस्टोन, अंजली सरवाणी, पार्श्वी चोप्रा आणि राजेश्वरी गायकवाड.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.