PAK vs ENG: चांगलं खेळूनही पाकिस्तानच्या विजयानंतर मोहम्मद रिजवानला का ठरवलं मतलबी?

| Updated on: Sep 29, 2022 | 2:19 PM

PAK vs ENG: पाकिस्तानी क्रिकेटप्रेमींचा मोहम्मद रिजवानवर इतका राग का?

PAK vs ENG: चांगलं खेळूनही पाकिस्तानच्या विजयानंतर मोहम्मद रिजवानला का ठरवलं मतलबी?
Mohammed rizwan
Image Credit source: PTI
Follow us on

मुंबई: पाकिस्तान आणि इंग्लंडच्या टीममध्ये लाहोर येथे पाचवा T20 सामना खेळला गेला. पाकिस्तानच्या टीमने इंग्लंडला या मॅचमध्ये 6 धावांनी हरवलं. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 145 धावा केल्या. पाकिस्तानी टीम संपूर्ण 20 ओव्हर सुद्धा खेळू शकली नाही. 19 व्या ओव्हरमध्येच त्यांचा डाव आटोपला. फक्त मोहम्मद रिजवानने एकबाजू लावून धरली होती.

करुनही रिजवानला नाव ठेवतायत

त्याने 46 चेंडूत 63 धावा फटकावल्या. रिजवानशिवाय पाकिस्तानचा दुसरा कुठला फलंदाज खेळपट्टीवर टिकू शकला नाही. सगळेच हजेरीवीर ठरले. बाबर असो किंवा हैदर अली किंवा आसिफ अली सगळ्यांनीच पॅव्हेलियनची वाट पकडली. पण हैराण करणारी बाब म्हणजे काही जण मोहम्मद रिजवानला सुद्धा नाव ठेवतायत.

मोहम्मद रिजवानला म्हटलं मतलबी

इंग्लंडकड दर्जेदार गोलंदाज आहेत. मोहम्मद रिजवानने त्या बॉलिंगसमोर 46 चेंडूत 63 धावा केल्या. त्याने 37 चेंडूत अर्धशतक फटकावलं. आपल्या डावात त्याने 3 षटकार आणि 2 चौकार लगावले. रिजवानचा स्ट्राइक रेट पीचच्य हिशोबाने चांगला होता.

त्याने 136 पेक्षा जास्त स्ट्राइक रेटने धावा केल्या. पण फॅन्सनी सोशल मीडियावर त्याच्यावर सुद्धा टीका केली. फॅन्सनी रिजवानला मतलबी खेळाडू म्हटलं. फक्त तो आकड्यांसाठी खेळतो असं त्यांचं म्हणणं होतं.

रिजवानच दमदार प्रदर्शन

मोहम्मद रिजवान सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. त्याने मागच्या 5 पैकी 4 सामन्यात 50 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. पण त्याचा स्ट्राइक रेट नेहमीच चर्चेचा विषय राहिलाय. सध्या सुरु असलेल्या टी 20 सीरीजमध्ये त्याने 78 पेक्षा जास्त सरासरीने 315 धावा केल्या आहेत. त्याचा स्ट्राइक रेट 140 पेक्षाही जास्त आहे.