
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचवा कसोटी सामना रंगतदार वळणावर आला आहे. प्रत्येक विकेटनंतर आणि धाव घेतल्यानंतर सामन्याचं पारडं इकडेतिकडे झुकत आहे. अशा स्थितीत दोन्ही बाजूच्या खेळाडूंचा कस लागला आहे. काहीही झालं तर या सामन्याचा निकाल लागणार हे स्पष्ट आहे. कारण दोन दिवसांचा खेळ शिल्लक आहे. त्यात इंग्लंडने लंच ब्रेकपर्यंत 3 गडी गमवून 164 धावा केल्या आहेत. अजूनही इंग्लंडला विजयासाठी 210 धावांची गरज आहे. हॅरी ब्रूक आणि जो रूट मैदानात आहेत. त्यामुळे हा सामना इंग्लंडच्या पारड्यात झुकलेला आहे. या दोन विकेट घेण्याचं मोठं आव्हान टीम इंडियाच्या गोलंदाजांसमोर आहे. भारताला लंच ब्रेकपूर्वी ही जोडी फोडण्याची संधी मिळाली होती. मात्र ही संधी मोहम्मद सिराजच्या एका चुकीमुळे गमावली. कदाचित या चुकीचा फटका सामन्याच्या निकालावर पडू शकतो.
कर्णधार शुबमन गिलने संघाचं 35वं षटक प्रसिद्ध कृष्णाकडे सोपवलं होतं. तेव्हा जो रूट 20 आणि हेन्री ब्रूक हा 19 धावांवर खेळत होते. ही जोडी फोडली की विजयाचा मार्ग सुकर होईल याचा अंदाज शुबमन गिलला होता. त्यामुळेच त्याने चेंडू प्रसिद्ध कृष्णाकडे सोपवला. पहिल्याच चेंडूवर ब्रूकने जोरदार प्रहार केला. चेंडू वर चढला आणि थेट सिराजच्या हातात गेला. पण सिराजने झेल घेतल्यानंतर एक चूक केली आणि थेट सीमारेषेबाहेर गेला. खरं तर चेंडू सीमारेषेच्या आताच होता. इथे सीमारेषेबाहेरचा झेल खेळाडू पकडतात. पण सिराजने ती चूक केली. त्याचा फटका टीम इंडियाला बसला. एक तर झेल गेला आणि फुकटच्या सहा धावाही मिळाल्या.
Lifeline for Harry Brook!
English batter hits one to fine leg and Siraj, who came back on the field after a break, takes the catch but steps on the boundary#ENGvIND 5th Test 4th Day live⬇️https://t.co/XzsmIcd948pic.twitter.com/59EF4wWNeT
— Sportstar (@sportstarweb) August 3, 2025
लंच ब्रेकपर्यंत हेन्री ब्रूकने 30 चेंडूत 4 चौकार आणि 2 षटकार मारत 38 धावा केल्या. त्यामुळे ब्रूकची प्रत्येक धाव ही इंग्लंडसाठी बोनस असणार आहे. तसेच भारतासाठी डोकेदुखी ठरणार आहे. त्यामुळे आता ही जोडी फोडण्याचं मोठं आव्हान असणार आहे. जर ही जोडी फोडण्यात अपयश आलं तर भारताचा विजयाचं स्वप्न लांबणार आहे. भारताने हा सामना जिंकला तर मालिका बरोबरीत सुटेल. अन्यथा ही मालिका 3-1 ने इंग्लंड जिंकेल. त्यामुळे या सामन्याची रंगत आणखी वाढणार आहे.