
टीम इंडिया आणि क्रिकेट चाहत्यांसाठी 8 मार्च ही तारीख अविस्मरणीय ठरली. भारताने आयसीसी टी 20i वर्ल्ड कप ट्रॉफी जिंकून इतिहास घडवला. भारताने या स्पर्धेच्या 10 व्या पर्वातील अंतिम सामन्यात न्यूझीलंडवर मात करत सलग दुसऱ्यांदा वर्ल्ड चॅम्पियन होण्याचा मान मिळवला. भारताने 96 धावांच्या मोठ्या फरकाने हा सामना जिंकला आणि वर्ल्ड कप आपल्या नावावर केला. या विजयानंतर भारतीय खेळाडूंचे कुटुंबिय आणि नातेवाईक मैदानात आले आणि एकच जल्लोष केला.
तर दुसऱ्या बाजूला टीम इंडियाचा फिनिशिर रिंकु सिंह एकटाच खांद्यावर तिरंगा घेऊन दिसला. रिंकूच्या चेहऱ्यावर या विजयाचा आनंद तर होता. मात्र हा ऐतिहासिक विजय पाहण्यासाठी आपले वडील हयात नाहीत ही खंतही त्याच्या चेहऱ्यावर दिसत होती. रिंकूचे वडील खानचंद्र सिंह यांचं 27 फेब्रुवारीला निधन झालं. त्यामुळे सिंह कुटुंबिय दु:खात आहेत. त्यामुळे वर्ल्ड कप विजयावेळी रिंकूच मनोबल वाढवण्यासाठी त्याची भावी पत्नी आणि खासदार प्रिया सरोज तिथे असायला हव्या होत्या, असं नेटकऱ्यांनी बोलून दाखवलं. त्यानंतर आता या विजयाच्या जवळपास 20 तासांनतर प्रिया सरोज यांनी भारताच्या विजयासाठी एक सविस्तर पोस्ट केली आहे.
प्रिया सरोज यांनी एक्स पोस्टमध्ये रिंकूचे वर्ल्ड कप ट्रॉफीसोबतचे 2 फोटो शेअर केले आहेत. तसेच या पोस्टमध्ये भारताच्या विजयाचा आणि रिंकूच्या धैर्याचा उल्लेख केला आहे.
भारताने 8 मार्चला वर्ल्ड कप जिंकला. या तारखेची इतिहासात नोंद केली जाईल.या विजयामुळे प्रत्येक देशवासियाची छाती अभिमानाने भरुन आली आहे. हा क्षण येत्या पिढ्यानपिढ्या लक्षात ठेवला जाईल, असं प्रिया सरोज यांनी आपल्या पोस्टमध्ये भारताच्या विजयाबाबत नमूद केलं आहे
रिंकूसाठी पोस्टमध्ये काय म्हटंल?
कुछ दिन स्याही से लिखे जाते हैं, लेकिन 8 मार्च जैसे दिन इतिहास में हमेशा के लिए दर्ज हो जाते हैं। यह वह दिन है जब टीम इंडिया ने ICC Men’s T20 World Cup जीतकर हर भारतीय के दिल को गर्व से भर दिया, एक ऐसा पल जिसे यह राष्ट्र पीढ़ियों तक याद रखेगा और मनाता रहेगा। 🏆
इस ऐतिहासिक जीत… pic.twitter.com/qqEAgwuAK2
— Priya Saroj (@PriyaSarojMP) March 9, 2026
“मी भारताच्या या ऐतिहासिक विजयादरम्यान एका मुलाची ताकद पाहिली जो देशासाठी, संघासाठी आणि त्याच्या वडिलांसाठी खंबीरपणे उभा राहिला. आयुष्यात अशा अवघड प्रसंगी मैदानात उतरुन विजेता होणं हे खरंच धाडसीपणाचं लक्षण आहे”, असं प्रिया सरोज यांनी रिंकूला उद्देशून म्हटलं आहे. तसेच प्रिया सरोज यांनी या ऐतिहासिक विजयासाठी भारतीय संघाचं आणि रिंकूचं अभिनंदनही केलं.
दरम्यान नेटकऱ्यांनी प्रिया सरोज यांच्यावर निशाणा साधला आहे. वर्ल्ड कप विजयाच्या अनेक तासांनंतर अभिनंदन करणारी पोस्ट केल्याने नेटकऱ्यांनी प्रिया सरोज यांच्यावर टीका केली आहे.