CSK IPL 2023 Winner : IPL मध्ये टीम्स कसा पैसा कमावतात? त्यांच्या कमाईच इकोनॉमिक्स एकदा समजून घ्या

CSK IPL 2023 Winner : आयपीएलमध्ये सर्व टीम्स अव्वल राहण्यासाठी जीवाच रान का करतात? सेंट्रल रेवेन्यू पॅक्टमधील पैसा हे त्यामागच मुख्य कारण आहे. कुठल्या टीमला कसा पैसा मिळतो, ते गणित जाणून घ्या.

CSK IPL 2023 Winner : IPL मध्ये टीम्स कसा पैसा कमावतात? त्यांच्या कमाईच इकोनॉमिक्स एकदा समजून घ्या
IPL 2023 Captains
Follow us
| Updated on: May 30, 2023 | 10:20 AM

अहमदाबाद : कॅप्टन कूल एमएस धोनीची टीम चेन्नई सुपर किंग्सने IPL 2023 चा किताब जिंकला. विजेतेपदासह CSK टीम आणि प्लेयर्सवर पैशांचा पाऊस पडतोय. पण तुम्हाला ही गोष्ट माहित आहे का? आयपीएल टीम्सची कमाई कशी होते? या मागच इकोनॉमिक्स काय आहे? आयपीएल फक्त भारतातच नाही, तर जगातील एक महागडा आणि प्रॉफिटेबल स्पोर्ट्स इवेंट आहे. म्हणूनच देश-विदेशातील क्रिकेपटू आयपीएलमध्ये खेळण्यासाठी एका पायावर तयार होतात.

चेन्नई सुपर किंग्सने IPL 2023 ची फायनल जिंकली आहे. विजेतेपदाचे प्राइज मनी म्हणून 20 कोटी रुपये थेट चेन्नई सुपर किंग्सच्या खात्यात जमा होतील.

IPL मधली सर्वाधिक वॅल्यु असलेली फ्रेंचायजी कुठली?

हे सुद्धा वाचा

चेन्नई सुपर किंग्स आय़पीएलमधील सर्वाधिक वॅल्यु असलेली फ्रेंचायजी आहे. 2022 मध्ये या टीमच वॅल्युएशन 1.15 अब्ज डॉलर होतं. ही भारताची पहिली यूनिकॉर्न स्पोर्ट कंपनी आहे.

काय आहे सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट रेवेन्यू पूल शेयरिंग पॅक्ट?

प्राइज मनीशिवाय चेन्नई सुपर किंग्सला आयपीएल आयोजित करणाऱ्या बीसीसीआयच्या कमाईमधला हिस्सा मिळणार. बीसीसीआयचा सर्वच फ्रेंचायजी टीमसोबत एक सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट रेवेन्यू पूल शेयरिंग पॅक्ट आहे. बीसीसीआय टायटल स्पॉन्सर, ब्रॉडकास्टिंग राइट्स, ओटीटी स्ट्रीमिंग राइट्स विकून पैसा कमावते.

48,000 कोटी रुपयांच्या सेंट्रल रेवेन्यू

बीसीसीआयच्या कमाईतील मोठा हिस्सा जवळपास 50 टक्के सर्व फ्रेंचायजींमध्ये वाटला जातो. चेन्नई सुपर किंग्स आयपीएल 2023 मध्ये विनर बनली आहे. त्यांना बीसीसीआयच्या 48,000 कोटी रुपयांच्या सेंट्रल रेवेन्यूमधील सर्वाधिक शेयर मिळणार.

ब्रांड स्पॉन्सरशिपमधून टीमला किती पैसा मिळतो?

बीसीसीआयकडून मिळणाऱ्या पैशाशिवाय चेन्नई सुपर किंग्स असो किंवा अन्य दुसरी टीम त्यांचे स्वत:चे सुद्धा कमाईचे मार्ग असतात. यात ब्रांड स्पॉन्सरशिपचा पैसा असतो. त्यातून कुठल्याही टीमचा 20 ते 30 टक्के रेवेन्यू जनरेट होतो. चेन्नई सुपर किंग्सच उदहारण घेऊया. या टीमची टायटल स्पॉन्सर टीवीएस आहे.

टीमची ब्रँड वॅल्यु जास्तच हवी

रिलायन्स जियो, एस्ट्रल पाइप्स आणि निप्पॉन पेंट्सच्या स्पॉन्सरशिपमधूनही टीम्सची कमाई होते. रेडियो पार्टनरशिप आणि सोशल मीडिया पार्टनरशिपमधून इनकम जनरेट होतो. टीमची जर्सी आणि अन्य इवेंटमध्ये ज्या ब्रांडचा जितका मोठो लोगो, तितका रेवेन्यू टीमला मिळतो. कुठल्या टीम्सची ब्रँड वॅल्यु किती आहे, त्यावरुन ब्रांड स्पॉन्सरशिप डीलची प्राइस ठरते. तिकीट विक्रीतून किती कमाई?

आयपीएल टीम्स आपल्या मर्चेंडाइजची सुद्धा विक्री करतात. यात टीमची जर्सी, कॅप, स्पोर्ट एसेसरीजचा सेल होतो. यातून टीमला थेट फायदा मिळतो. प्रत्येक टीमकडे स्वत:च एक होमग्राऊंड आहे. जिथे मॅचच्या तिकीट विक्रीतून होणारी कमाई सुद्धा खात्यात जमा होते. तिकीट विक्रीचा एक हिस्सा राज्य क्रिकेट असोशिएशनला सुद्धा मिळतो. आयपीएल टीम्सची 10 ते 20 टक्के कमाई या दोन्ही सेगमेंटमधून होते.

Non Stop LIVE Update
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु.
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव.
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका.
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा.
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर.
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर.
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?.
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना....
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना.....
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?.
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या.