WPL 2026 : मुंबई इंडियन्सने लिलावात या खेळाडूंवर लावली बोली, सर्वात महागडा खेळाडू कोण?

वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेत मुंबई इंडियन्सचा दबदबा राहिला आहे. आतापर्यंत खेळलेल्या तीन पैकी दोन स्पर्धेत मुंबई इंडियन्सने जेतेपद मिळवलं आहे. आता तिसऱ्यांदा जेतेपद मिळवण्यासाठी मुंबई इंडियन्सने नव्याने संघ बांधला आहे.

WPL 2026 : मुंबई इंडियन्सने लिलावात या खेळाडूंवर लावली बोली, सर्वात महागडा खेळाडू कोण?
WPL 2026 : मुंबई इंडियन्सने लिलावात या खेळाडूंवर लावली बोली, सर्वात महागडा खेळाडू कोण?
Image Credit source: Mumbai Indians Twitter
| Updated on: Nov 27, 2025 | 9:54 PM

वुमन्स प्रीमियर लीग 2026 स्पर्धेत मुंबई इंडियन्स संघ हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात चौथ्यांदा उतरणार यात काही शंका नाही. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सने दोनदा जेतेपदावर नाव कोरलं आहे. मुंबई इंडियन्सने मेगा लिलावापूर्वी 5 खेळाडूंना रिटेन केलं होतं. त्यामुळे मुंबईचा संघ 5.75 कोटी रुपयांसह मेगा लिलावात उतरला होता. फ्रेंचायझींना 15 कोटी खर्च करण्याची मुभा आहे. पण रिटेने केल्या खेळाडूंवरच मुंबई इंडियन्सने 9.25 कोटी खर्च केले होते. पण असं असूनही मुंबई इंडियन्सने मेगा लिलावात स्मार्ट बोली लावली आणि चांगला संघ बांधला आहे. मुंबई इंडियन्सने नेहमीप्रमाणे जुन्या खेळाडूंवरच बोली लावली. या बोलीत न्यूझीलंडची अष्टपैलू एमेलिया करसाठी 3 कोटी खर्च केले. तर दक्षिण अफ्रिकेची वेगवान गोलंदाज शबनिम इस्माईलसाठी 60 लख खर्च केले.

मुंबई इंडियन्सने सायका इशाकला पुन्हा एकदा लिलावात खरेदी केलं आहे. इतकंच देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंवरही बोली लावली आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्सच्या पर्समध्ये काहीच शिल्लक नाही. मुंबई इंडियन्सने 15 कोटी खर्च केले. रिटेन केलेल्या 5 खेळाडूंसह16 जणांचा संघा बांधला आहे.

लिलावापूर्वी रिटेन केलेले खेळाडू

  • हरमनप्रीत कौर – 2.5 कोटी
  • नॅट सायव्हर ब्रंट- 3.5 कोटी
  • अमनजोत कौर- 1 कोटी
  • हिली मॅथ्यूज- 1.75 कोटी
  • जी कमलिनी (अनकॅप्ड) – 50 लाख

लिलावात या खेळाडूंवर लावली बोली

  • एमेलिया कर-3 करोड़
  • शबनिम इस्‍माइल- 60 लाख
  • संस्‍कृति गुप्‍ता- 20 लाख
  • संजीवन सजना-75 लाख
  • राहिला फिरदौस-10 लाख
  • निकोल कॅरी- 30 लाख
  • पूनम खेमनार-10 लाख
  • गुनालन कमलिनी- 50 लाख
  • सायका इशाक- 30 लाख
  • नाला रेड्डी- 10 लाख
  • त्रिवेणी वशिष्ठ- 20 लाख


मुंबई इंडियन्सच्या पर्समध्ये 2027 मिनी लिलावासाठी एकही पैसा शिल्लक नाही.  त्यामुळे पुढच्या पर्वात कामगिरीच्या आधारावर काही खेळाडूंना रिलीज केलं जाऊ शकतं. अजूनही मुंबईकडे दोन जागा रिक्त आहेत. मुंबई इंडियन्सने या स्पर्धेच्या पहिल्याच पर्वात जेतेपदावर नाव कोरलं होतं. 2023 स्पर्धेचं जेतेपद मिळवल्यानंतर 2025 पुन्हा एकदा जेतेपद नावावर केलं होतं. आता चौथ्या पर्वात पुन्हा एकदा जेतेपदासाठी कंबर कसली आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात तिसऱ्यांदा जेतेपद मिळवणार का? याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे.