AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रोहित शर्माला मुंबई इंडियन्सचं कर्णधारपद मिळणार! असं नेमकं काय झालं? जाणून घ्या

आयपीएल 2025 स्पर्धेपूर्वी संघांमध्ये उलथापालथ होत असल्याचं दिसून येत आहे. अजूनही दिल्ली कॅपिटल्सने कर्णधारपदाची घोषणा केलेली नाही. दुसरीकडे, मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदी रोहित शर्मा पुन्हा दिसण्याची शक्यता आहे. तसेच प्लेइंग 11 मध्ये अर्जुन तेंडुलकरला संधी मिळू शकते.

रोहित शर्माला मुंबई इंडियन्सचं कर्णधारपद मिळणार! असं नेमकं काय झालं? जाणून घ्या
रोहित शर्मा मुंबई इंडियन्सImage Credit source: BCCI
| Updated on: Mar 12, 2025 | 9:05 PM
Share

आयपीएल 2025 स्पर्धेसाठीचा उत्साह आता वाढू लागला आहे. 22 मार्चला या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. मुंबई इंडियन्सचा पहिला सामना 23 मार्चला चेन्नई सुपर किंग्सशी होणार आहे. पण या सामन्यात वेगळंच चित्र पाहायला मिळणार आहे. संघात असूनही हार्दिक पांड्याला कर्णधारपद भूषवता येणार नाही. मागच्या पर्वात केलेली चूक त्याला पहिल्याच सामन्यात महागात पडणार आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदाची धुरा एका सामन्यासाठी रोहित शर्माला मिळण्याची शक्यता आहे. रोहित शर्माकडून मागच्या पर्वात कर्णधारपद काढून घेतलं होतं. तसेच गुजरात टायटन्सकडून ट्रेड विंडोने हार्दिक पांड्याला संघात घेतलं आणि त्याच्याकडे कर्णधारपद सोपवलं होतं. त्यामुळे चाहत्यांमध्ये नाराजीचा सूर होता. पण टी20 वर्ल्डकप आणि चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्याने हा नाराजीचा सूर आता मावळला आहे. त्यामुळे पहिल्या सामन्यात रोहित शर्माने नेतृत्व केल्यानंतर हार्दिक पांड्यालाही मुंबई इंडियन्सचे चाहते तितकंच प्रेम देतील. विल जॅक्स रोहित शर्मासोबत सलामीला उतरेल. तिसऱ्या क्रमांकावर नमन धीर खेळेल. त्यानंतर तिलक वर्मा आणि सूर्यकुमार यादव खेळतील.

झारखंडचा खेळाडू रॉबिन मिंझ यष्टिरक्षक म्हणून रिंगमध्ये उतरणार आहे. मिचेल सँटनर, कर्ण शर्मा आणि मुजीब उर रहमान हे फिरकी गोलंदाज आणि अष्टपैलू भूमिका बजावतील. तर ट्रेंट बोल्ट वेगवान गोलंदाजीचे नेतृत्व करेल. त्याच्यासोबत दीपक चहर आणि अर्जुन तेंडुलकर असतील. आयपीएल 2025 च्या पहिल्या सामन्यात अर्जुन तेंडुलकर मुंबईसाठी ‘इम्पॅक्ट प्लेयर’ म्हणून मैदानात उतरण्याची शक्यता आहे.

बई इंडियन्सचा संपूर्ण संघ:

फलंदाज: सूर्यकुमार यादव, रोहित शर्मा, तिलक वर्मा, बेव्हॉन जेकब्स

अष्टपैलू खेळाडू: हार्दिक पंड्या, नमन धीर, राज अंगद बावा, दीपक चहर

फिरकी गोलंदाजी अष्टपैलू खेळाडू: विल जॅक्स, मिचेल सँटनर

यष्टीरक्षक: रिकेल्टन, मिंज, कृष्णन श्रीजीत

वेगवान गोलंदाज: जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट, अश्वनी कुमार, रीस टॅप्ले, कॉर्बिन बॉश, सत्यनारायण राजू, अर्जुन तेंडुलकर

फिरकीपटू: कर्ण शर्मा, मुजीब उर रहमान, विघ्नेश पुत्तूर

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.