
दिल्ली कॅपिटल्सची आयपीएल 2025 स्पर्धेत विजयी घोडदौड अखेर थांबली आहे. सलग चार विजयानंतर पाचव्या सामन्यात मुंबई इंडियन्स दिल्ली कॅपिटल्सचा 12 धावांनी पराभव केला आहे. तर मुंबई इंडियन्सने या विजयानंतर पुन्हा एकदा स्पर्धेत कमबॅक केलं आहे. मुंबईचा या स्पर्धेतील हा दुसरा विजय आहे. मुंबईने गुणतालिकेत आता सातव्या स्थानी झेप घेतली आहे. तर दिल्ली कॅपिटल्सची पहिल्या स्थानावरून दुसऱ्या स्थानी घसरण झाली आहे.
मुंबई इंडियन्सने अखेर कमबॅक केलं आहे. सलग पराभवानंतर पुन्हा एकदा विजयी ट्रॅक पकडला आहे. दुसरीकडे, दिल्लीचं सलग पाचव्या विजयाचं स्वप्न भंगलं आहे. मुंबई इंडियन्सने विजयासाठी 205 धावांचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान गाठताना दिल्ली कॅपिटल्सचा संघ 19व्या षटकात 193 धावांवर बाद झाला आणि 12 धावांनी पराभूत झाला.
दिल्ली कॅपिटल्सला आठवा धक्का बसला आहे. आशुतोष शर्मा 17 धावा करून बाद झाला.
दिल्ली कॅपिटल्सला विप्रजच्या रुपाने सातवा धक्का बसला. दिल्ली 14 चेंडूत 26 धावांची गरज आहे.
केएल राहुल 15 धावा करून तंबूत परतला आहे. कर्णच्या गोलंदाजीवर फटका मारताना चुकला आणि विकेट देऊन बसला.
दिल्ली कॅपिटल्सला ट्रिस्टन स्टब्सच्या रुपाने पाचवा धक्का बसला आहे. फक्त 4 चेंडूत 1 धाव करून बाद झाला.
दिल्ली कॅपिटल्सला अक्षर पटेलच्या रुपाने चौथा धक्का बसला आहे.
दिल्ली कॅपिटल्सला करूण नायरच्या रुपाने तिसरा धक्का बसला आहे. करूण नायर 89 धावा करून तंबूत परतला आहे.
अभिषेक पोरेल 25 चेंडूत 33 धावा करून बाद झाला आहे. या खेळीत त्याने 3 चौकार आणि 1 षटकार मारला.
करुण नायरने जोरदार कमबॅक केलं आहे. तीन वर्षानंतर आयपीएलमध्ये परतला आणि दमदार खेळी केली. त्याने 22 चेंडूत 50 धावा केल्या.
अभिषेक पोरेल आणि करूण नायर ही जोडी जमली आहे. इम्पॅक्ट प्लेयर म्हणून मैदानात उतरलेला करूण नायरने जोरदार फटकेबाजी केली. दोघांनी मिळून 50 धावांची भागीदारी केली.
दिल्ली कॅपिटल्सला पहिल्याच चेंडूवर धक्का बसला आहे. फ्रेझर मॅकबर्क खातं न खोलता तंबूत परतला आहे.
मुंबई इंडियन्सने 20 षटकात 5 गडी गमवून 204 धावा केल्या आणि विजयासाठी 205 धावांचं आव्हान ठेवलं आहे. आता हे आव्हान दिल्ली गाठते की नाही हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
तिलक वर्मा 59 धावा करून बाद झाला आहे. मुकेश कुमारच्या षटकात पोरेलने त्याचा झेल पकडला.
तिलक वर्माने 26 चेंडूत 50 धावांची खेळी केली आहे.
सूर्यकुमार यादवनंतर हार्दिक पांड्याची विकेट पडली आहे. हार्दिक पांड्या फक्त 2 धावा करून बाद झाला आहे.
सूर्यकुमार यादव 28 चेंडूत 40 धावा करून बाद झाला आहे.
मुंबई इंडियन्सला रिकल्टनच्या रुपाने दुसरा धक्का बसला. 41 धावा करून बाद झाला.
मुंबई इंडियन्सने पॉवर प्लेच्या सहा षटकात रोहित शर्माची विकेट गमावली आमि 61 धावा केल्या.
मुंबई इंडियन्स सलामीचा फलंदाज रोहित शर्मा पुन्हा एकदा स्वस्तात बाद झाला आहे. त्याने 18 धावा केल्या आणि बाद झाला.
रोहित शर्मा आणि रिकल्टन या जोडीने सावध सुरुवात केली आहे. स्टार्कच्या गोलंदाजीवेळी रोहित शर्मा सावध पवित्र्यात दिसला. रिकल्टनने दोन चौकार मारले.
दिल्ली कॅपिटल्स (प्लेइंग इलेव्हन): जेक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, केएल राहुल (विकेटकीपर), ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल (कर्णधार), आशुतोष शर्मा, विप्रज निगम, मिचेल स्टार्क, मोहित शर्मा, कुलदीप यादव, मुकेश कुमार.
मुंबई इंडियन्स (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा, रायन रिकेल्टन (विकेटकीपर), विल जॅक्स, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), नमन धीर, मिचेल सँटनर, दीपक चहर, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह.
दिल्ली कॅपटिल्सने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबई इंडियन्स संघ: विल जॅक्स, रायन रिकेल्टन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, टिळक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), नमन धीर, मिशेल सँटनर, दीपक चहर, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह, विघ्नेश पुथूर, रोहित शर्मा, कॉर्बिन बॉश, अश्वनी कुमार, राज्य कुमार, बेल्या राज्य बावा, बेल्या राज्य, रोहित शर्मा, कॉर्बिन बॉश. अर्जुन तेंडुलकर, कृष्णन श्रीजीत, मुजीब उर रहमान, रीस टोपली, कर्ण शर्मा.
दिल्ली कॅपिटल्स संघ: फाफ डू प्लेसिस, जेक फ्रेझर-मॅकगर्क, केएल राहुल (विकेटकीपर), ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल (कर्णधार), आशुतोष शर्मा, विपराज निगम, मिचेल स्टार्क, मोहित शर्मा, कुलदीप यादव, मुकेश कुमार, अभिषेक पोरेल, करुण नायर, दुष्मंता जैव, तृष्णा दास, नॅशनल चॅम्पियन्स, नॅशनल ऑफ इंडिया. नळकांडे, समीर रिझवी, डोनोवन फरेरा, त्रिपुराण विजय, मानवंथ कुमार एल, माधव तिवारी
इंडियन प्रीमियर लीगच्या इतिहासात 35 सामन्यांपैकी मुंबईने 19 तर दिल्लीने 16 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे.