MI vs RR Score Updates and Highlights, IPL 2026 : राजस्थानला प्लेऑफचं तिकीट, मुंबईवर 30 धावांनी मात
Mumbai Indians vs Rajasthan Royals Indian Premier League 2026 Score Updates and Highlights In Marathi : राजस्थान रॉयल्सला आयपीएल 2026 स्पर्धेतील प्लेऑफमध्ये पोहचणारी चौथी टीम ठरली. राजस्थानला मुंबई इंडियन्सला घरच्या मैदानात पराभूत करुन ही कामगिरी केली.

आयपीएल 2026 स्पर्धेतील (IPL 2026) 69 व्या सामन्यात मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स आमनेासामने होते. मुंबई आणि राजस्थान दोन्ही संघांचा हा 19 व्या हंगामातील साखळी फेरीतील 14 वा आणि शेवटचा सामना होता. राजस्थान रॉयल्सने रियान पराग याच्या नेतृत्वात हार्दिक पंड्या याच्या कॅप्टन्सीतील मुंबई इंडियन्सला पराभूत करुन प्लेऑफचं तिकीट मिळवलं. राजस्थानने मुंबई इंडियन्ससमोर वानखेडे स्टेडियममध्ये 206 रन्सचं आव्हान ठेवलं होतं. मात्र मुंबईला 20 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 175 रन्सच करता आल्या. राजस्थानने यासह विजयासह प्लेऑफमध्ये धडक दिली. राजस्थानचा हा साखळी फेरीतील मुंबई विरुद्धचा दुसरा आणि एकूण आठवा विजय ठरला. तर मुंबईचा हा दहावा पराभव ठरला. मुंबई यासह आपल्या मोहिमेचा शेवट विजयाने करण्यात अपयशी ठरली.
LIVE Cricket Score & Updates
-
IPL 2026 MI vs RR Live Score Updates : राजस्थानला प्लेऑफचं तिकीट, मुंबईवर 30 धावांनी मात
राजस्थान रॉयल्सने प्लेऑफमध्ये धडक दिली आहे. राजस्थानने मुंबईसमोर 206 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र मुंबईला 20 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 175 धावांपर्यंतच पोहचता आलं. राजस्थान अशाप्रकारे प्लेऑफमध्ये पोहचणारी चौथी आणि शेवटची टीम ठरली आहे.
-
IPL 2026 MI vs RR Live Score Updates : सूर्यकुमार यादव आऊट, मुंबई इंडियन्सला आठवा झटका, राजस्थान विजयाच्या दिशेने
नांद्रे बर्गर याने आपल्या बॉलिंगवर सूर्यकुमार यादव याला कॅच आऊट केलं आहे. राजस्थानने यासह मुंबईला आठवा झटका दिला आहे. सूर्याने मुंबईसाठी सर्वाधिक 60 रन्स केल्या.
-
-
IPL 2026 MI vs RR Live Score Updates : मुंबई इंडियन्सला सातवा झटका, कॉर्बिन बॉश आऊट
राजस्थान रॉयल्सने मुंबई इंडियन्सला सातवा झटका दिला आहे. यश राज पुंजाने आपल्या बॉलिंगवर कॉर्बिन बॉश याला डोनोवन फेरेरा याच्या हाती कॅच आऊट केलं. कॉर्बिनने 2 रन्स केल्या.
-
IPL 2026 MI vs RR Live Score Updates : कॅप्टन हार्दिक पंड्या आऊट, मुंबई इंडियन्सला सहावा झटका
राजस्थान रॉयल्सने मुंबई इंडियन्सला सहावा झटका दिला आहे. जोफ्रा आर्चर याने आपल्या बॉलिंगवर मुंबईचा कॅप्टन हार्दिक पंड्या याला नांद्रे बर्गर याच्या हाती कॅच आऊट केलं. हार्दिकने 15 बॉलमध्ये 34 रन्स केल्या.
-
IPL 2026 MI vs RR Live Score Updates : सूर्यकुमार यादवचं अर्धशतक, सामना रंगतदार स्थितीत
लोकल बॉय आणि मुंबई इंडियन्सचा प्रमुख फलंदाज सूर्यकुमार यादव याने राजस्थान रॉयल्स विरुद्ध अर्धशतक झळकावलं आहे. सूर्याने 32 बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण केलं आहे. सूर्याने या खेळीत 4 सिक्स आणि 2 फोर लगावले. त्यामुळे सामना रंगतदार स्थितीत पोहचला आहे.
-
IPL 2026 MI vs RR Live Score Updates : मुंबईला पाचवा धक्का, विल जॅक्स आऊट
यश राज पुंजा याने सूर्यकुमार यादव आणि विल जॅक्स ही सेट जोडी फोडून राजस्थानला पाचवी विकेट मिळवून दिली आहे. यशने विल जॅक्स याला विकेटकीपर ध्रुव जुरेल याच्या हाती कॅच आऊट केलं. विलने 18 बॉलमध्ये 33 रन्स केल्या.
-
IPL 2026 MI vs RR Live Score Updates : सूर्यकुमार यादव आणि विल जॅक्स जोडी जमली, पाचव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी
सूर्यकुमार यादव याने 10 व्या ओव्हरमधील दुसऱ्या बॉलवर सिक्स ठोकला. यासह सूर्यकुमार यादव आणि विल जॅक्स या जोडीने पाचव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. सूर्या-विलने 26 बॉलमध्ये 50 रन्स जोडल्या. त्यामुळे मुंबईचा स्कोअर 9.2 ओव्हरमध्ये 4 आऊट 88 असा झाला आहे.
-
मालेगावात मुसळधार पावसामुळे मोठी दुर्घटना, तरुणाचा मृत्यू
नाशिकच्या मालेगावात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे मोठी दुर्घटना घडली आहे.
पवारवाडी शिवारात तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पावसापासून बचावासाठी शेडच्या आडोशाला हा तरुण उभा राहिला होता. फैज मोहम्मद अनिस अहमद (वय ३२) असे मृत तरुणाचे नाव आहे. वादळी वाऱ्यामुळे विजेचा कमकुवत खांब आणि पत्रे अंगावर पडल्याने त्याचा मृत्यू झाल आहे. -
IPL 2026 MI vs RR Live Score Updates : तिलक वर्मा बोल्ड, मुंबईला चौथा धक्का
राजस्थान रॉयल्सने मुंबई इंडियन्सला चौथा झटका दिला आहे. ब्रिजेश शर्मा याने तिलक वर्मा याला क्लिन बोल्ड केलं. तिलकने 7 बॉलमध्ये 3 धावा केल्या.
-
IPL 2026 MI vs RR Live Score Updates : रायन रिकेल्टन आऊट, मुंबईला तिसरा झटका
राजस्थान रॉयल्सने मुंबई इंडियन्सला पावर प्लेमध्ये तिसरा आणि मोठा झटका दिला आहे. नांद्रे बर्गर याने वैभव सूर्यवंशी याच्या हाती रायन रिकेल्टन याला कॅच आऊट केलं. रायनने 7 बॉलमध्ये 12 रन्स केल्या.
-
IPL 2026 MI vs RR Live Score Updates : नमन धीर आऊट, जोफ्रा आर्चरकडून नमन धीरची शिकार
जोफ्रा आर्चर याने रोहित शर्मा याच्यानंतर नमन धीर याची शिकार करुन मुंबई इंडियन्सला दुसरा झटका दिला आहे. नमन धीर याने 5 बॉलमध्ये 6 रन्स केल्या. त्यामुळे मुंबईचा स्कोअर 2.3 ओव्हरमध्ये 2 आऊट 18 असा स्कोअर झाला आहे.
-
IPL 2026 MI vs RR Live Score Updates : रोहित शर्मा झिरोवर आऊट, मुंबईला शून्यावर पहिला झटका
जोफ्रा आर्चर याने राजस्थान रॉयल्सला जबरदस्त सुुरवात करुन दिली आहे. जोफ्राने डावातील पहिल्याच ओव्हरमध्ये रोहित शर्मा याला झिरोवर आऊट केलं आहे. जोफ्राने रोहितला आऊट करण्याची ही चौथी वेळ ठरली.
-
IPL 2026 MI vs RR Live Score Updates : मुंबईच्या बॅटिंगला सुरुवात, रोहित-रिकेल्टन मैदानात, 206 धावांचं आव्हान
मुंबई इंडियन्सच्या बॅटिंगला सुरुवात झाली आहे. मुंबईकडून रोहित शर्मा आणि रायन रिकेल्टन सलामी जोडी मैदानात आली आहे. राजस्थानने मुंबईसमोर 206 धावांचं आव्हान ठेवलं आहे.
-
IPL 2026 MI vs RR Live Score Updates : राजस्थानचं द्विशतक, मुंबईसमोर 206 धावांचं आव्हान
राजस्थान रॉयल्सने निर्णायक सामन्यात मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये द्विशतक झळकावलं आहे. राजस्थानने मुंबईसमोर 206 धावांचं आव्हान ठेवलं आहे. राजस्थानने 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 205 धावा केल्या. त्यामुळे आता मुंबई 206 धावा करुन मोहिमेचा शेवट करणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
-
IPL 2026 MI vs RR Live Score Updates : जोफ्राच्या स्फोटक खेळीचा शेवट, शार्दुलकडून राजस्थानला एका ओव्हरमध्ये 2 झटके
शार्दूल ठाकुर याने आपल्या बॉलिंगवर जोफ्रा आर्चर याच्या स्फोटक खेळीचा शेवट करुन धावांना ब्रेक लावला आहे. शार्दुलने जोफ्राला नमन धीर याच्या हाती कॅच आऊट केलं. शार्दूलने अशाप्रकारे एकाच ओव्हरमध्ये राजस्थानला 2 झटके दिले. शार्दुलने जोफ्राआधी शुभम दुबे याला आऊट केलं.
-
IPL 2026 MI vs RR Live Score Updates : राजस्थानला सातवा झटका, शुभम दुबे आऊट
नमन धीर याने शार्दुल ठाकुर याच्या बॉलिंगवर शुभम दुबे याला कॅच आऊट केलं आहे. राजस्थानने यासह सातवी विकेट गमावली. शुभमने 6 बॉलमध्ये 5 रन्स केल्या.
-
IPL 2026 MI vs RR Live Score Updates : राजस्थानला सहावा झटका, डोनोवन फरेरा आऊट
दीपक चाहर याने डोनोवन फरेरा याला आऊट केलं आहे. कॉर्बिन बॉश याने डोनोवन फरेरा याचा कॅच घेतला. डोनोवन याने 15 बॉलमध्ये 18 रन्स केल्या. राजस्थानाने अशाप्रकारे सहावी विकेट गमावली.
-
IPL 2026 MI vs RR Live Score Updates : राजस्थानचा धावांसाठी संघर्ष, मुंबईची चिवट बॉलिंग
मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांनी चिवट बॉलिंग करत राजस्थानच्या फलंदाजांना नियंत्रणात ठेवलं आहे. मुंबईच्या गोलंदाजांसमोर राजस्थानला 15 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 132 धावांपर्यंत पोहचता आलं आहे. जोफ्रा आर्चर 3 आणि डोनोवन फरेरा 12 धावांवर नाबाद खेळत आहेत.
-
IPL 2026 MI vs RR Live Score Updates : ध्रुव जुरेल क्लिन बोल्ड, राजस्थानला पाचवा झटका
कॉर्बिन बॉश याने ध्रुव जुरेल याला कडक यॉर्करवर क्लिन बोल्ड केलं आहे. यासह मुंबईने राजस्थानला पाचवा झटका दिला आहे. ध्रुवने 26 बॉलमध्ये 38 रन्स केल्या.
-
IPL 2026 MI vs RR Live Score Updates : दासून शनाका रन आऊट, राजस्थानला चौथा झटका
मुंबईने 11 ओव्हरमध्ये राजस्थान रॉयल्सला चौथा झटका दिला आहे. ध्रुव जुरेल याच्या चुकीच्या कॉलमुळे दासुन शनाका नॉन स्ट्राईक एंडवर रनआऊट झाला. दासुनने 15 बॉलमध्ये 29 रन्स केल्या.
-
IPL 2026 MI vs RR Live Score Updates : ध्रुव जुरेल-दासुन शनाका जोडीवर मोठी जबाबदारी
मुंबईने राजस्थानला ठराविक अंतराने 3 झटके देत बॅकफुटवर ढकललं. त्यामुळे आता ध्रुव जुरेल आणि दासुन शनाका या जोडीवर राजस्थानला मोठी भागीदारी मिळवून देण्याची जबाबदारी असणार आहे. या दोघांनी राजस्थानला 9 ओव्हरमध्ये 3 आऊट 84 रन्सपर्यंत पोहचवलं आहे. ध्रुव जुरेल 14 आणि दासुन शनाका 20 रन्सवर नॉट आऊट खेळत आहेत.
-
IPL 2026 MI vs RR Live Score Updates : तिलक वर्माकडून बाउंड्री लाईनवर जबरदस्त कॅच, कॅप्टन रियान पराग आऊट, राजस्थानला तिसरा झटका
तिलक वर्मा याने बाउंड्री लाईनवर राजस्थानचा कॅप्टन रियान पराग याचा जबरदस्त कॅच घेतला आहे. अशाप्रकारे रियानच्या खेळीचा शेवट झाला आहे. रियानने 8 बॉलमध्ये 14 रन्स केल्या. अल्लाह गझनफर याने तिलकला मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला.
-
IPL 2026 MI vs RR Live Score Updates : वैभव सूर्यवंशी स्वस्तात आऊट, राजस्थानची सलामी जोडी माघारी, मुंबईला दुसरं यश
दीपक चाहर याने मुंबईला सर्वात मोठी विकेट मिळवून दिली आहे. दीपकने ओपनर वैभव सूर्यवंशी याला नमन धीर याच्या हाती कॅच आऊट केंलं. वैभवने 6 बॉलमध्ये 4 रन्स केल्या. त्यामुळे राजस्थानचा स्कोअर 4.1 ओव्हरमध्ये 2 आऊट 33 असा झाला आहे.
-
IPL 2026 MI vs RR Live Score Updates : मुंबई राजस्थानला पहिला झटका देण्यात यशस्वी, जैस्वाल आऊट
मुंबई इंडियन्से राजस्थान रॉयल्सला पहिला झटका दिला आहे. विल जॅक्स याने लोकल बॉय यशस्वी जैस्वाल याला कॉर्बिन बॉश याच्या हाती कॅच आऊट केलं. यशस्वीने 17 बॉलमध्ये 27 रन्स केल्या.
-
IPL 2026 MI vs RR Live Score Updates : वैभव-जैस्वालची यशस्वी सुरुवात, मुंबई पहिल्या विकेटच्या शोधात
वैभव सूर्यवंशी आणि यशस्वी जैस्वाल या सलामी जोडीने राजस्थान रॉयल्सला मुंबई इंडियन्स विरुद्ध संयमी सुरुवात मिळवून दिली आहे. दोघांनी पहिल्या 3 ओव्हरमध्ये बिनबाद 25 धावा जोडल्या आहेत. यशस्वी 21 आणि वैभव 3 धावांवर नॉट आऊट खेळत आहेत.
-
IPL 2026 MI vs RR Live Updates : सामन्याला सुरुवात, राजस्थानची बॅटिंग, वैभव-यशस्वी मैदानात
मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामन्याला सुरुवात झाली आहे. मुंबईने राजस्थानला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे. राजस्थानकडून वानखेडे स्टेडियममध्ये वैभव सूर्यवंशी आणि यशस्वी जैस्वाल ही सलामी जोडी मैदानात आली आहे. तर दीपक चाहर पहिली ओव्हर टाकत आहे.
-
IPL 2026 MI vs RR Live Updates : मुंबई इंडियन्स प्लेइंग ईलेव्हन
मुंबई इंडियन्स प्लेइंग ईलेव्हन: रायन रिकेल्टन (विकेटकीपर), नमन धीर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कॅप्टन), विल जॅक्स, कॉर्बिन बॉश, दीपक चहर, शार्दूल ठाकुर, अल्लाह गझनफर आणि रघु शर्मा.
-
IPL 2026 MI vs RR Live Updates : राजस्थान रॉयल्स प्लेइंग ईलेव्हन
राजस्थान रॉयल्स प्लेइंग ईलेव्हन : यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशी, ध्रुव जुरेल, रियान पराग (कर्णधार), डोनोवन फरेरा, शुभम दुबे, दासून शनाका, जोफ्रा आर्चर, नांद्रे बर्गर, यशराज पुंजा आणि ब्रिजेश शर्मा.
-
IPL 2026 MI vs RR Live Updates : मुंबईने टॉस जिकंला, राजस्थान विरुद्ध फिल्डिंगचा निर्णय
मुंबई इंडियन्सने आपल्या शेवटच्या सामन्यात टॉस जिंकला आहे. कर्णधार हार्दिक पंड्या याने राजस्थान रॉयल्स विरुद्ध फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता राजस्थान किती धावा करणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
-
IPL 2026 MI vs RR Live Updates : रियान पराग-रवींद्र जडेजाचं कमबॅक फिक्स!
राजस्थान रॉयल्स टीममध्ये नियमित कर्णधार रियान पराग आणि रवींद्र जडेजा या दोघांचं कमबॅक होणार असल्याचं निश्चित आहे. रियानच्या अनुपस्थितीत गेल्या सामन्यात यशस्वी जैस्वाल याने नेतृत्व केलं होतं. तर रवींद जडेजा याला दुखापतीमुळे काही सामन्यांना मुकावं लागलं होतं.
-
IPL 2026 MI vs RR Live Updates : मुंबई इंडियन्स टीम
रायन रिकेल्टन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या (कर्णधार) रोहित शर्मा, नमन धीर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, विल जॅक्स, कॉर्बिन बॉश, दीपक चहर, जसप्रीत बुमराह, रघु शर्मा, अल्लाह गझनफर,
शार्दुल ठाकूर, मयंक रावत, रॉबिन मिन्झ, क्रिश भगत, ट्रेंट बोल्ट, केशव महाराज, शेर्फेन रदरफोर्ड, मोहम्मद सलाहुद्दीन इझार, दानिश मलेवार, मयंक मार्कंडे आणि अश्वनी कुमार. -
IPL 2026 MI vs RR Live Updates : राजस्थान रॉयल्स टीम
यशस्वी जैस्वाल (कॅप्टन), ध्रुव जुरेल (विकेटकीपर) वैभव सूर्यवंशी, लुआन-ड्रे प्रिटोरियस, डोनोव्हन फरेरा, शुभम दुबे, दासुन शनाका, जोफ्रा आर्चर, सुशांत मिश्रा, संदीप शर्मा, ब्रिजेश शर्मा,
यशराज पुंजा, युधवीर सिंग चरक, अमन राव पराला, रवी बिश्नोई, रियान पराग, रवींद्र जडेजा, ॲडम मिल्ने, शिमरॉन हेटमायर, नांद्रे बर्गर, क्वेना मफाका, तुषार देशपांडे, कुलदीप सेन, विघ्नेश पुथूर आणि रवी सिंग. -
IPL 2026 MI vs RR Live Updates : राजस्थान प्लेऑफमध्ये पोहचणार की मुंबई रस्ता अडवणार?
आयपीएल 2026 स्पर्धेत 24 मे रोजी शेवटच्या डबल हेडरचं आयोजन करण्यात आलं आहे. या डबल हेडरमधील पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स आमनेसामने आहेत. सामन्याला दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये सुरुवात होणार आहे. राजस्थानला प्लेऑफमध्ये पोहचायचं असेल तर कोणत्याही स्थितीत हा सामना जिंकावा लागणार आहे. त्यामुळे मुंबई हा सामना जिंकून राजस्थानचं गेम ओव्हर करणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.