अभिमानास्पद! मुंबईच्या टेनिस क्रिकेटमधील स्टार कृष्णा सातपुते बनला टीम इंडियाचा कॅप्टन

| Updated on: Aug 22, 2022 | 12:44 PM

आपल्या फलंदाजीच्या बळावर कृष्णाने अनेक सामने एकहाती फिरवले आहेत. याच कृष्णा सातपुतेची आता भारतीय टेनिस संघाच्या कर्णधारपदी निवड झाली आहे.

अभिमानास्पद! मुंबईच्या टेनिस क्रिकेटमधील स्टार कृष्णा सातपुते बनला टीम इंडियाचा कॅप्टन
krishna satpute
Follow us on

मुंबई: मुंबई आणि महाराष्ट्रातील टेनिस बॉल क्रिकेट (Tennis Ball Cricket) मधील स्टार कृष्णा सातपुतेची (krishna Satpute) भारतीय टेनिस क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी निवड झाली आहे. कृष्णा सातपुते हे मुंबईच्या टेनिस क्रिकेट वर्तुळातील एक मोठ नाव आहे. आपल्या फलंदाजीच्या बळावर कृष्णाने अनेक सामने एकहाती फिरवले आहेत. याच कृष्णा सातपुतेची आता भारतीय टेनिस संघाच्या कर्णधारपदी निवड झाली आहे. कृष्णाचा प्रवास खूपच कष्टप्रद, जिद्दीने भरलेला आहे. सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील कुर्डूवाडी सारख्या छोट्याशा गावातून आलेल्या या मुलाची आज भारतीय संघाच कर्णधारपदी निवड झाली आहे. या खेळाडूच करावं तेवढ कौतुक कमी आहे. कृष्णा सातपुतेचा प्रवास ही एका संघर्षाची, जिद्दीची गोष्ट आहे. आई-वडिलांचे कॅन्सरच्या दुर्धर आजाराने निधन झाल्यानंतर त्याने क्रिकेटच्या बळावर कुटुंबाचा डोलारा सावरला.

मोठ्या जिद्दीने क्रिकेटचा छंद जोपासला

आयुष्याच्या खडतर वाटेवरुन प्रवास करताना कृष्णाने मोठ्या जिद्दीने क्रिकेटचा छंद जोपासला. आज त्याची भारताच्या टेनिस संघाच्या कर्णधार पदी निवड झालीय. लहान असताना दुसऱ्यामुलांना सोबत क्रिकेट खेळण्यासाठी बोलवताना भीती वाटायची. त्यावरुन बोलणी सुद्धा ऐकली आहेत. पण आज मी गाठलेला टप्पा पाहिल्यानंतर त्या मुलांच्या पालकांनाही अभिमान वाटतो, असं कृष्णाने सांगितलं.

माढा तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला

टेनिसची चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेत भारतीय संघालाच विजेतेपद मिळणार असल्याचा ठोस आत्मविश्वास कृष्णा सातपुते यांनी व्यक्त केला आहे. दुंबई मध्येही टेनिस बॉल चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा रंगणार आहे. या स्पर्धेत भारत, पाकिस्तान, श्रीलंका, यूएई, ओमान, कॅनडा हे सहा देश सामील होणार आहेत. टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत भारतातर्फे खेळताना कृष्णाने आता पर्यंत २३ शतकाची नोंद केली आहे. तो उजव्या हाताचा आक्रमक फलंदाज म्हणुन परिचित आहे. कृष्णाच्या भारतीय संघाच्या कर्णधार पदाच्या निवडीने सोलापूर जिल्ह्यास माढा तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून त्यांची मान अभिमानाने उंचावली गेली आहे.