Hardik-Natasa यांच्या घटास्फोटाची अफवा असताना कृणाल पंड्याची पोस्ट व्हायरल, काय म्हटलं?

Hardik Pandya Natasa Stankovic Divorce Rumors : हार्दिक पंड्या-नताशा स्टॅनकोविक या दोघांमध्ये बिनसल्याची चर्चा असताना कृणाल पंड्याची सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल झाली आहे.

Hardik-Natasa यांच्या घटास्फोटाची अफवा असताना कृणाल पंड्याची पोस्ट व्हायरल, काय म्हटलं?
Natasa Stankovic and Hardik Pandya
Image Credit source: सोशल मीडिया
| Updated on: May 26, 2024 | 5:03 PM

मुंबई इंडियन्सचा कर्णधार आणि टीम इंडियाचा उपकर्णधार हार्दिक पंड्या गेल्या काही दिवसांपासून सातत्याने सोशल मीडियावर चर्चित राहिला आहे. हार्दिक आधी मुंबई इंडियन्सची कॅप्टन्सी मिळाल्याने नेटकऱ्यांकडून ट्रोल केला गेला. तर आता त्याच्या वैयक्तिक आयुष्यात वादळ उठल्याचं चित्र सोशल मीडियावर पाहायला मिळतंय. हार्दिक आणि त्याची पत्नी नताशा स्टॅनकोविक या दोघांच्या घटस्फोटाच्या चर्राच रंगल्या आहेत. सोशल मीडियवर प्रत्येक जण आपल्या पद्धतीने या विषयावर व्यक्त होताना दिसत आहे. अशात आता हार्दिकचा भाऊ आणि नताशाचा दीर क्रिकेट कृणाल पंड्या याची इंस्टा पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. कृणालच्या या पोस्टवर नतााने कमेंटही केली आहे. कृणालची इंस्टा पोस्ट नक्की काय आणि नताशाने काय कमेंट केलीय? हे जाणून घेऊयात.

कृणाल पंड्याच्या इंस्टा पोस्टमध्ये काय?

कृणालने इंस्टावर त्याचा मुलगा कवीर आणि हार्दिकचा मुलगा अगस्त्य या दोघांना उचलून घेतल्याचा फोटो पोस्ट केला आहे. कृणालने पोस्ट केलेल्या या फोटोवर नताशाने कमेंट केली आहे. नताशाने लव इमोजी शेअर केली आहे. नताशाच्या कमेंटवर नेटकऱ्यांनी आपलं मतं मांडली आहत. नताशाच्या या कमेंटमुळे नेटकऱ्यांकडून विविध कमेंट्स पाहायला मिळत आहेत. काहींचं म्हणणं असंकी हार्दिक-नताशामध्ये सर्व आलबेल आहे. तर काही अजून म्हणतायत की हार्दिक-नताशा या दोघांमध्ये बिघडलंय.

तसेच सोशल मीडियानुसार, नताशा आणि हार्दिक या दोघांमध्ये काहीही नीट नसल्याचं दिसून येत आहे. सोशल मीडियावर दोघही विभक्त झाल्याचं वृत्त आलं होतं. नताशाने सोशल मीडियावरुन हार्दिकसोबतचा फोटो हटवला होता. त्यामुळे या दोघांमध्ये खटके उडाल्याचे म्हटलं जात होतं. तसेच नताशा यंदा हार्दिकला सपोर्ट करण्यासाठीही आयपीएल सामन्यात उपस्थित नसल्याचाही दावा केला जात आहे. अशा आणि अनेक उलटसुलट चर्चा रंगलेल्या पाहायला मिळत आहेत.

कृणालच्या इंस्टा पोस्टवर नताशाची कमेंट

नताशाने इंस्टावर हार्दिकसोबतचा एक फोटो असल्याचं दिसत आहे. या फोटोमध्ये त्यांचा मुलगाही आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हार्दिकला त्याच्या संपत्तीतील 70 टक्के वाटा नताशाला द्यावा लागणार असल्याचं म्हटलं जात आहे. मात्र याबाबत नताशा आणि हार्दिक या दोघांकडून कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही.