
आशिया कप 2025 स्पर्धेचं बिगूल वाजलं आहे. या स्पर्धेला 9 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. यूएईकडे या स्पर्धेचं यजमानपद आहे. अबुधाबी आणि दुबईतील क्रिकेट स्टेडियममध्येच या स्पर्धेतील सर्व सामने खेळवण्यात येणार आहेत. तसेच यंदा या स्पर्धेत एकूण 8 संघ सहभागी होणार आहेत. एका गटात 4 यानुसार 2 गटात 8 संघांचा समावेश आहे. या 8 पैकी स्पर्धेसाठी 4 संघांची घोषणा करण्यात आली आहे. भारत, पाकिस्तान, ओमान आणि यूएई ए ग्रुपमध्ये आहेत. यूएई आणि ओमानने संघ जाहीर केलेला नाही. तर दुसऱ्या बाजूला हाँगकाँग आणि बांगलादेशने संघ जाहीर केलाय. तर इतर 4 संघ अजूनही वेट अँड वॉचच्या भूमिकेतच आहेत. यंदा टी 20 फॉर्मेटने ही स्पर्धा होणार आहे. 9 ते 19 सप्टेंबर दरम्यान प्रत्येक संघ आपल्या गटातील 3 संघांविरुद्ध प्रत्येकी 1-1 सामना खेळणार आहे. त्यानंतर 20 ते 26 सप्टेंबर दरम्यान सुपर 4 चा थरार पाहायला मिळणार...