Cricket Retirement | स्टार गोलंदाजाचा क्रिकेट विश्वाला अलविदा, निवृत्ती जाहीर करताना खेळाडू भावूक

| Updated on: Mar 23, 2023 | 6:57 PM

या स्टार स्पिनरने क्रिकेट विश्वाला रामराम ठोकण्याचा निर्णय घेतला आहे. या स्पिनरने आपल्या पदार्पणातील सामन्यात प्रतिस्पर्धी संघाची दाणदाण उडवून 7 विकेट्स घेतल्या होत्या. यासह या स्पिनरने टीमच्या विजयात मोठी भूमिका निभावली होती.

Cricket Retirement | स्टार गोलंदाजाचा क्रिकेट विश्वाला अलविदा, निवृत्ती जाहीर करताना खेळाडू भावूक
Follow us on

मुंबई | क्रिकेट विश्वातून मोठी बातमी समोर आली आहे. माजी फिरकीपटूने क्रिकेटला रामराम करण्याचा निर्णय घेतला आहे. हा खेळाडू आपला अखेरचा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये खेळला होता. एकाएकी क्रिकेट सोडण्याचा निर्णय घेतल्याने चाहत्यांमध्ये नाराजी आहे. तसेच या निर्णयामुळे टीमलाही झटका बसला आहे. या फिरकी गोलंदाजाने आपल्या गोलंदाजीने भल्या भल्या फलंदाजांच्या दांड्या गुल केल्या होत्या. या फिरकी गोलंदाजाने आपल्या टीमच्या विजयात अनेकदा निर्णायक भूमिका बजावली होती.

न्यूझीलंडचा माजी स्पिनर विल सोमरविले याने डोमेस्टिक सीजन संपल्यानंतर व्यावसायिक क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. सोमरविले याने न्यूझीलंड टीमसाठी 2018 ते 2021 या कालावधीत एकूण 6 सामन्यात प्रतिनिधित्व केलं होतं. या 6 कसोटीत त्याने 15 विकेट्स घेतल्या होत्या. सोमरविले याने सर्वोत्तम कामगिरी ही पाकिस्तान विरुद्ध केली होती.

सोमरविले याने अबुधाबीत पाकिस्तान विरुद्ध झालेल्या कसोटी सामन्यात 123 धावांच्या मोबदल्यात 7 विकेट्स घेतल्या होत्या. यासह सोमरविले याने न्यूझीलंडच्या विजयात मोलाची भूमिका वटवली होती. विशेष म्हणजे सोमरविले याचा हा पदार्पणातील सामना होता. या कामगिरीच्या जोरावर त्याला पुढील काही सामन्यात संधी मिळाली. मात्र सोमरविले या संधीचं सोनं करता आलं नाही.

हे सुद्धा वाचा

सोमरविले भावूक

निवृत्ती जाहीर करताना सोमरविले भावूक झाला होता. त्याने जड अंतकरणाने प्रतिक्रिया दिली. “मी वयाच्या 30 व्या वर्षी व्यावसायिक क्रिकेटर झाल्यानंतर विचार केला होता त्यापेक्षा अधिक पटीने यशस्वी झालोय. मी 9 हंगाम व्यावसायिक पद्धतीने खेळलोय. या दरम्यानच्या प्रत्येक क्षणावर मी प्रेम केलंय आणि जगलोय”, असं सोमरविले म्हणाला.

सोमरविले याची कारकीर्द

सोमरविले याने ऑस्ट्रेलियाला जाण्याआधी 2004-05 मध्ये ओटागोकडून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर 6 वर्षांनी 2014-15 आणि 2017-18 दरम्यान न्यू साऊथ वेल्सचं प्रतिनिधित्व केलं. सोमरविले याने बिग बॅश लीगमध्ये सिडनी सिक्सर्सचं प्रतिनिधित्व केलं होतं.

मायदेशी परतल्यावर 2018-19 मध्ये सोमरविले ऑकलँडमध्ये आला. यूएईमध्ये पाकिस्तान विरुद्धच्या मालिकेसाठी त्याची निवड करण्यात आली. त्यानंतर 2020 मध्ये एससीजी अर्थात सिडनी क्रिकेट ग्राउंडमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळण्याची संधी मिळाली. या टीममध्ये न्यू साऊथ वेल्स टीमच्या अनेक माजी सहकाऱ्यांचा समावेश होता. सोमरविले आपल्या कारकीर्दीतील अखेरचा कसोटी सामना हा 2021 मध्ये मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये खेळला होता. हा सामना टीम इंडिया विरुद्ध खेळवण्यात आला होता. दरम्याान सोमरविले पुढील एप्रिल महिन्यात नेल्सन इथे सेंट्रल स्टैग्स विरुद्ध प्रथम श्रेणीतील शेवटचा सामना खेळणार आहे.