क्रिकेटमध्ये नशीब म्हणजे काय असतं? त्यासाठी एकदा हा VIDEO बघा

| Updated on: Mar 26, 2023 | 12:06 PM

NZ vs SL : क्रिकेटमध्ये एखाद्या प्लेयरला नशिबाची साथ कशी मिळते? ते हा VIDEO बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका पहिल्या वनडे सामन्यात हे घडलं. सोशल मीडियावर या प्रसंगाचा व्हिडिओ वेगाने व्हायरल होतोय.

क्रिकेटमध्ये नशीब म्हणजे काय असतं? त्यासाठी एकदा हा VIDEO बघा
NZ vs SL
Image Credit source: sparksport
Follow us on

NZ vs SL : न्यूझीलंड विरुद्ध टेस्ट सीरीज गमावल्यानंतर श्रीलंकन टीम आता वनडे फॉर्मेटमध्ये आव्हान देतेय. तीन वनडे सामन्यांच्या सीरीजमधील पहिला सामना ऑकलंडमध्ये खेळला गेला. या मॅचमध्ये सुरुवातीला जे घडलं, त्याची सोशल मीडियावर चर्चा आहे. मॅचच्या सुरुवातीलाच फिन एलेन OUT असूनही बाद झाला नाही. सोशल मीडियावर मैदानात घडलेल्या त्या प्रसंगाचा व्हिडिओ वेगाने व्हायरल होतोय. मैदानावरील हे दृश्य पाहणाऱ्या प्रत्येकालाच आश्चर्याचा धक्का बसला.

ऑकलंड येथे सीरीजमधला पहिला सामना खेळला गेला. श्रीलंकेने टॉस जिंकून पहिला गोलंदाजीचा निर्णय घेतला. न्यूझीलंडची टीम प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरली होती. बोव्स आणि फिन एलेनची ओपनिंग जोडी मैदानात होती. एलेन शानदार फॉर्ममध्ये होता. पहिल्या दोन ओव्हरमध्येच एकही विकेट न गमावता त्याने 14 धावा केल्या. यात दोन चौकार होते.

असं मिळालं जीवनदान

ही घटना तिसऱ्या ओव्हरमधील आहे. ओव्हरच्या दुसऱ्या चेंडूवर बोव्सने चौकार मारला. पुढच्याच चेंडूवर तीन धावा आल्या. एलेन स्ट्राइकवर आला. ओव्हरच्या चौथ्या चेंडूवर एलेनने पुढे येऊन चेंडू मारण्याचा प्रयत्न केला. पण चेंडू बॅटच्या जवळून गेला व स्टम्पसवर लागला.


एलेन खरंतर बोल्ड झाला होता. पण असं झालं नाही. कारण चेंडू ऑफ स्टम्पला लागला. पण बेल्स पडल्या नाहीत. त्यामुळे एलेनला जीवनदान मिळालं. श्रीलंकन खेळाडू त्यामुळे निराश झाले. पण एलेनला सुद्धा आपल्या नशिबावर विश्वास बसत नव्हता.

T20 सीरीज कधी सुरु होणार?

15 व्या ओव्हरपर्यंत न्यूझीलंडने दोन विकेट गमावून 78 धावा केल्या होत्या. एलेन 39 चेंडूत 32 धावा करुन क्रीजवर होता. बोव्स 14 धावा करुन लाहिरी कुमाराच्या चेंडूवर आऊट झाला. विल यंगने 28 चेंडूत 26 धावा केल्या. सीरीजमधील दुसरा सामना ख्राइस्टचर्च आणि तिसरा सामना हॅमिल्टन येथे होईल. त्यानंतर तीन T20 सामन्यांची सीरीज दोन एप्रिलपासून सुरु होणार आहे.