श्रीलंका विरुद्ध न्यूझीलँड दुसरा कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना किवी फलंदाजांनी गोलंदाजांचं कंबरडं मोडलं. केन विलियमसनन 215 धावांची खेळी करत काही विक्रम मोडीत काढले.
Mar 18, 2023 | 8:30 PM
न्यूझीलँड विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात केन विलियमसननं द्विशतक झळकावलं. या सामन्यात केननं 215 धावांची खेळी केली. यासह त्याने काही विक्रम आपल्या नावावर केले आहेत. (Photo - Twitter)
1 / 5
केन विलियमसनचं हे सहावं द्विशतक आहे. यासह त्याने सचिन तेंडुलकरच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. सचिनने 24 वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीत 6 द्विशतकं ठोकली आहेत. (Photo - Twitter)
2 / 5
केन विलियमसनन सलग तिसऱ्या कसोटीत शतक झळकावलं आहे. दुसऱ्यांदा त्याने अशी कामगिरी केली आहे. दोनदा शतकी हॅटट्रीक मारणारा पहिला किवी फलंदाज आहे. (Photo - Twitter)
3 / 5
केन विलियमसनचं कसोटीतील 28 वं शतक होतं. कोहलीने 183 डावात 28 शतकं ठोकली आहेत. तर विलियमसननं 164 डावात ही कामगिरी केली आहे. त्याचबरोबर 5000 धावा देखील पूर्ण केल्या आहेत. (Photo - Twitter)
4 / 5
केन विलियमसननं दहाव्यांदा 150 हून अधिक धावा केल्या आहेत. सहा वेळा द्विशतकी खेळी करण्यात यश आलं. (Photo - Twitter)