AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

NZ vs SL : विलियमसनच वादळ, Virat Kohli ला टाकलं मागे, क्लासिक प्लेयरची क्लासिक इनिंग, VIDEO

NZ vs SL : विलियमसनच्या तुफानी खेळीमुळे विराट कोहली मागे पडलाय. विलियमसनच्या वादळात श्रीलंकेची वाताहात. विलियमसनच्या शतकाच्या बळावर मोठ्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल सुरु आहे.

NZ vs SL : विलियमसनच वादळ, Virat Kohli ला टाकलं मागे, क्लासिक प्लेयरची क्लासिक इनिंग, VIDEO
Kane williamsonImage Credit source: social media
| Updated on: Mar 18, 2023 | 10:49 AM
Share

NZ vs SL Test Match : केन विलियमसनच्या बॅटची जादू कायम आहे. त्याने श्रीलंकेविरुद्ध दुसऱ्या टेस्ट मॅचमध्ये पुन्हा एकदा कमालीची बॅटिंग केली. त्याने श्रीलंकेविरुद्ध दुसरा कसोटी सामना खेळताना सलग तिसर शतक ठोकून रेकॉर्ड्सचा पाऊस पाडला. पहिली बॅटिंग करणाऱ्या न्यूझीलंड टीमची केन विलियमसनच्या शतकाच्या बळावर मोठ्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल सुरु आहे.

विलियमसनने 76 व्या ओव्हरच्या चौथ्या चेंडूवर शतक झळकवलं. 171 चेंडूत त्याने 28 व शतक झळकवलं. ही कामगिरी करताना त्याने विराट कोहलीला मागे टाकलं.

विराटला किती इनिंग लागल्या?

विलियमसनच्या टेस्ट क्रिकेटमध्ये 8 हजार धावा पूर्ण झाल्या आहेत. त्याची सरासरी 54 पेक्षा अधिक आहे. फॅब 4 मध्ये वेगवान 28 शतक ठोकणारा तो दुसरा फलंदाज बनलाय. त्याने विराट कोहलीला मागे टाकलं. विलियमसनने 164 इनिंगमध्ये 28 शतक ठोकली आहेत. तेच विराट कोहलीला टेस्टमध्ये 28 शतक झळकवण्यासाठी 183 इनिंग लागल्या.

822 बॉलमागे एक सिक्स

फॅब 4 मध्ये वेगवान 28 शतक झळकवण्याचा रेकॉर्ड स्टीव्ह स्मिथच्या नावावर आहे. त्याने 153 इनिंगमध्ये ही कमाल केलीय. विलियमसनने आपल्या शानदार इनिंग दरम्यान 2 चेंडूत सलग 2 सिक्स मारले. त्याने 15616 चेंडूंवर 19 सिक्स मारले. म्हणजे 822 बॉलमागे एक सिक्स. श्रीलंकेविरुद्ध या टेस्टमध्ये 2 चेंडूत त्याने 2 सिक्स मारेल. विलियमसनच सलग तिसर शतक

विलियमसन सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. या शतकाच्या आधी मागच्या टेस्ट मॅचमध्ये श्रीलंकेविरुद्ध नाबाद 121 धावा फटकावल्या. याआधी इंग्लंड विरुद्ध त्याने 132 धावांची इनिंग खेळली होती. विलियमसन सलग 3 शतक ठोकणारा न्यूझीलंडचा पहिला फलंदाज बनलाय.

महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.