रोहित नाही अन् राहुलही नाही, हा दिग्गज खेळाडू होणार कर्णधार? या मालिकेची धुरा सांभाळणार…

| Updated on: Sep 11, 2022 | 8:39 PM

भारतीय संघ या महिन्याच्या शेवटी आणि पुढील महिन्याच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 3 सामन्यांची T20 मालिका खेळणार आहे. या मालिकेत भारतीय संघ रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरेल. 

रोहित नाही अन् राहुलही नाही, हा दिग्गज खेळाडू होणार कर्णधार? या मालिकेची धुरा सांभाळणार...
रोहित नाही अन् राहुलही नाही, हा दिग्गज खेळाडू होणार कर्णधार?
Image Credit source: social
Follow us on

नवी दिल्ली :  T20 विश्वचषकापूर्वी (T20 World Cup) भारतीय संघ (Team India) या महिन्याच्या शेवटी आणि पुढील महिन्याच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 3 सामन्यांची T20 मालिका खेळणार आहे. या मालिकेत भारतीय संघ रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली मैदानात उतरेल आणि विश्वचषकाच्या तयारीला अंतिम रूप देईल. या दोन्ही मालिकेनंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकदिवसीय मालिकाही आयोजित केली जाणार असून यामध्ये धवन टीम इंडियाची धुरा सांभाळताना दिसणार आहे.आशिया चषक भारतीय क्रिकेट संघाच्या अपेक्षेनुसार झाला नसला तरी पुढील महिन्यात होणाऱ्या T20 विश्वचषकाबाबत भारतीय संघाला कमी लेखता येणार नाही. या स्पर्धेपूर्वी भारतीय संघ दोन महत्त्वाच्या टी-20 मालिका खेळणार आहे. यामुळे तयारी सुधारण्याची आणखी एक संधी मिळणार आहे. मात्र, विश्वचषकापूर्वी टीम इंडियाला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एक मालिका खेळायची आहे, ज्यामध्ये रोहित शर्मा आणि केएल राहुल यांच्या जागी अनुभवी सलामीवीर शिखर धवन खेळणार आहे.

काही खेळाडू बाहेर पडतील

T20 हंगामाच्या मध्यावर एकदिवसीय मालिका आयोजित केली जात आहे. अशा स्थितीत ही मालिका होणार असली तरी अपेक्षेप्रमाणे विश्वचषकाला जाणाऱ्या संघातील बहुतांश खेळाडू या मालिकेतून बाहेर पडतील. असं स्पोर्ट्स पोर्टल इनसाइडस्पोर्टनं बीसीसीआयच्या अधिकाऱ्याच्या हवाल्यानं म्हटलं आहे. T20 विश्वचषकापूर्वी एकदिवसीय मालिका खेळणे योग्य नाही. पण कधी कधी असंही होतं. रोहित-विराटसह विश्वचषकातील सर्व खेळाडूंना विश्रांती मिळणार आहे. ऑस्ट्रेलियाला जाण्यापूर्वी त्याला थोडा ब्रेक मिळणार आहे. शिखर संघाचे नेतृत्व करेल.

3 सामन्यांची एकदिवसीय मालिका

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात 6 ऑक्टोबर ते 11 ऑक्टोबर या कालावधीत 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका होणार असून धवन पुन्हा संघाचा प्रमुख बनणार आहे. धवननं गेल्या वर्षभरात वेगवेगळ्या प्रसंगी भारतीय संघाचं नेतृत्व केलंय. गेल्या वर्षी श्रीलंका दौऱ्यात तो एकदिवसीय आणि टी-20 संघांचा कर्णधार होता. त्यानंतर जुलैमध्ये त्यांनी वेस्ट इंडिज दौऱ्यावर एकदिवसीय मालिकेची जबाबदारी स्वीकारली. त्यानंतर ऑगस्टमध्ये झिम्बाब्वे दौऱ्यावरही त्याला कर्णधार बनवण्यात आले होते. पण केएल राहुलचा संघात समावेश केल्यानंतर धवनला पुन्हा कमान सोपवावी लागली.

हे सुद्धा वाचा

टीमची घोषणा कधी?

16 सप्टेंबरला टी-20 विश्वचषकाची घोषणा होणार आहे. विश्वचषक 16 ऑक्टोबर ते 13 नोव्हेंबरदरम्यान ऑस्ट्रेलियात खेळवलं जाणार आहे. दरम्यान, क्रीकेट चाहते आणि खेळाडूंना देखील या टीममध्ये कुणाचा समावेश होणार, टीम इंडियात कोणत्या खेळाडूंना डच्चू मिळणार, याची देखील चर्चा चांगलीच रंगली आहे.