
ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात ऑगस्ट महिन्यात टी 20I आणि वनडे सीरिजचा थरार रंगला. ऑस्ट्रेलियाने 3 सामन्यांची टी 20I मालिका 2-1 अशा फरकाने जिंकली. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच घरात एकदिवसीय मालिकेत 2-1 ने पराभूत करत टी 20I मालिकेतील पराभवाची परतफेड केली. त्यानतंर आता ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार आहे. ऑस्ट्रेलिया या दौऱ्यात 1 ते 4 ऑक्टोबर दरम्यान 3 सामन्यांची टी 20I मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाने संघ जाहीर केला आहे.
ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाने टी 20I मालिकेसाठी 14 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. मिचेल मार्श याच्याकडे नेतृत्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच संघात 9 महिन्यांनंतर अनुभवी खेळाडूचं कमबॅक झालं आहे. ऑस्ट्रेलियाचा 36 वर्षीय ऑलराउंडर मार्क्स स्टोयनिस याचं संघात पुनरागमन झालं आहे. स्टोयनिसच्या कमबॅकमुळे ऑस्ट्रेलियाच्या बॅटिंगची ताकद वाढणार हे निश्चित आहे. तसेच स्टोयनिस आगामी टी 20 वर्ल्ड कप 2026 स्पर्धेच्या योजनेचा भाग असल्याचंही या निर्णयावरुन स्पष्ट झालंय, असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही.
स्टोयनिस ऑलराउंडर आहे. त्यामुळे स्टोयनिस ऑस्ट्रेलियासाठी एकाच वेळेस 2 खेळाडूंची भूमिका बजावतो. स्टोयनिस आतापर्यंत 340 टी 20 सामन्यांमध्ये 6 हजार 800 पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. तसेच स्टोयनिसने या दरम्यान 310 षटकार लगावले आहेत.
तसेच स्टोयनिसने 74 टी 20I सामन्यांमध्ये 1 हजार 245 धावा केल्या आहेत. स्टोयनिसने या दरम्यान 63 षटकार लगावले आहेत. तसेच स्टोयनिसने टी 20 क्रिकेटमध्ये 179 फलंदाजांना माघारी पाठवलं आहे. स्टोयनिस त्यापैकी 45 विकेट्स या आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये घेतल्या आहेत.
तसेच स्टोयनिस व्यतिरिक्त मॅथ्यू शॉर्ट याचंही संघात कमबॅक झालं आहे. तर चौघांचा पत्ता कट करण्यात आला आहे. या चौघांमध्ये नॅथन एलिस, एलेक्स कॅरी, आरोन हार्डी आणि कॅमरुन ग्रीन यांचा समावेश आहे.
पहिला सामना, बुधवार, 1 ऑक्टोबर, बे ओव्हल
दुसरा सामना, शुक्रवार, 3 ऑक्टोबर, बे ओव्हल
तिसरा सामना, शनिवार, 4 ऑक्टोबर, बे ओव्हल
न्यूझीलंड विरुद्धच्या टी 20I मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया टीम : मिचेल मार्श (कर्णधार), शॉन एबट, टीम डेविड, झेव्हीयर बार्टलेट, बेन ड्वारशुइस, जॉश हेझलवुड, ट्रेव्हीस हेड, जॉश इंग्लिस, मॅट कुन्हेमन, ग्लेन मैक्सवेल, मिचेल ओवन, मॅथ्यू शॉर्ट, मार्कस स्टोयनिस आणि एडम झॅम्पा.