Cricket : पहिल्या सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हन जाहीर, कुणाचा पत्ता कट?

New Zealand vs England 1st T20I : इंग्लंडने सामन्याच्या 1-2 दिवसआधी प्लेइंग ईलेव्हन जाहीर करण्याची परंपरा न्यूझीलंड विरूद्धच्या टी 20i मालिकेतही कायम ठेवली आहे.

Cricket : पहिल्या सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हन जाहीर, कुणाचा पत्ता कट?
Jos Buttler Wicketkeepar
Image Credit source: Bcci
| Updated on: Oct 16, 2025 | 5:58 PM

ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेला 19 ऑक्टोबरपासून सुरुवात होत आहे. पॅट कमिन्स याच्या अनुपस्थितीत मिचेल मार्श हा ऑस्ट्रेलियाचं नेतृत्व करणार आहे. शुबमन गिल या मालिकेतून एकदिवसीय कर्णधार म्हणून नव्या इनिंगला सुरुवात करणार आहे. उभयसंघातील पहिला सामना हा 19 ऑक्टोबरला पर्थमध्ये होणार आहे. त्याआधी न्यूझीलंड विरुद्ध इंग्लंड यांच्यातील 3 मॅचच्या टी 20i सीरिजचा 18 ऑक्टोबरपासून थरार रंगणार आहे. इंग्लंडने मालिकेतील सलामीच्या सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हनची घोषणा केली आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन याबाबतची माहिती दिली आहे.

उभयसंघातील पहिला सामना ख्राईस्टचर्चमध्ये होणार आहे. या सामन्याला 2 दिवस बाकी आहेत. मात्र इंग्लंडने नेहमीप्रमाणे सामन्याच्या काही तासांआधीच प्लेइंग ईलेव्हनची घोषणा केली आहे.

इंग्लंडची प्लेइंग ईलेव्हन कशी?

इंग्लंडच्या प्लेइंग ईलेव्हनमध्ये 1-2 नाही तर तब्बल 4 विकेटकीपर असलेल्या खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. अनुभवी फलंदाज जोस बटलर हा इंग्लंडचा नियमित विकेटकीपर आहे. जोस या मालिकेतही विकेटकीपिंग करणार असल्याचं जवळपास निश्चित आहे. मात्र त्यानंतरही प्लेइंग ईलेव्हनमध्ये फिल सॉल्ट, टॉम बँटन आणि जॉर्डन कॉक्स या व्यतिरिक्त विकेटकीपर असलेल्यांना संधी देण्यात आली आहे. हॅरी ब्रूक इंग्लंडचं नेतृत्व करणार आहे. जोस बटलर याच्या नेतृत्वानतंर हॅरी ब्रूक याला वनडे आणि टी 20i संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली होती. हॅरी तसेच जेकेब बेथेल यांच्यासह अन्य खेळाडूंवर बॅटिंगची जबाबदारी असणार आहे.

आदिल रशीदवर फिरकीची जबाबदारी

ब्रायडन कार्स आणि सॅम करन यांचा समावेश करण्यात आला आहे. आदिल रशीद याच्यावर फिरकी गोलंदाजाची जबाबदारी असणार आहे. तसेच लियाम डॉसन आणि जेकब बेथेल हे दोघे गरज पडल्यास बॉलिंग करु शकतात. ल्यूक वूड वेगवान गोलंदाजीची जबाबदारी सांभाळणार आहे. सॉनी बेकर आणि ऑलराउंडर जेमी ओव्हरटन या दोघांना वगळण्यात आलं आहे.

इंग्लंडकडून प्लेइंग ईलेव्हनमध्ये कुणाला संधी?

न्यूझीलंड विरूद्धच्या पहिल्या टी 20I सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हन: फिल साल्ट, जोस बटलर, जेकब बेथेल, हॅरी ब्रूक, टॉम बँटन, सँम करन, जॉर्डन कॉक्स, ब्रायडन कार्स, लियाम डॉसन, आदिल राशिद आणि ल्यूक वुड.