AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kane Williamson चा महारेकॉर्ड, वेगवान 32 शतकांसह सचिन-स्मिथला पछाडलं

Kane Williamson Century | न्यूझीलंडचा अनुभवी फलंदाज केन विलियमसन याने वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. केनने 32 व्या शतकासह सचिनसह इतर दिग्गजांना मागे टाकलं आहे.

Kane Williamson चा महारेकॉर्ड, वेगवान 32 शतकांसह सचिन-स्मिथला पछाडलं
| Updated on: Feb 16, 2024 | 1:03 PM
Share

हॅमिल्टन | न्यूझीलंड क्रिकेट टीमचा दिग्गज फलंदाज केन विलियमसन याने इतिहास रचला आहे. केनने दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात शतक ठोकत महारेकॉर्ड केला आहे. न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेवर 7 विकेट्सने विजय मिळवला. न्यूझीलंडने अशाप्रकारे दक्षिण आफ्रिकेचा 2-0 असा व्हाईटवॉश केला. केनने दक्षिण आफ्रिके विरुद्ध दुसऱ्या डावात खणखणीत शतकी खेळी केली. केनने 260 बॉलमध्ये नाबाद 133 धावांची विजयी खेळी केली.

केन विलियमनस याने कसोटी क्रिकेटमध्ये वेगवान 32 शतक ठोकण्याचा कारनामा केलाय. केनने यासह स्टीव्हन स्मिथ, रिकी पॉन्टिंग आणि सचिन तेंडुलकर यासारख्या दिग्गजांना मागे टाकलं. केनने 172 व्या डावात 32 वं कसोटी शतक पूर्ण केलं. तर स्टीव्हन स्मिथला 32 व्या शतकासाठी 174, रिकी पॉन्टिंग याला 176 आणि सचिन तेंडुलकरला 179 डावांपर्यंत प्रतिक्षा करावी लागली होती.

कसोटी क्रिकेटमध्ये वेगवान शतकं करणारे फलंदाज

यूनुस खान, पाकिस्तान, 193 डाव सचिन तेंडुलकर, टीम इंडिया, 179 डाव रिकी पाँटिंग, ऑस्ट्रेलिया, 176 डाव स्टीव्हन स्मिथ, ऑस्ट्रेलिया, 174 डाव केन विलियमसन, न्यूझीलंड, 172 डाव.

केनने न्यूझीलंडच्या विजयात सर्वात जास्त योगदान दिलं. तिसऱ्या क्रमांकावर बॅटिंगसाठी आलेल्या केनने अखेरपर्यंत नाबाद राहत टीमला विजयी केलं. केनने 260 बॉलमध्ये 51.15 च्या स्ट्राईक रेटने 2 सिक्स आणि 12 खणखणीत चौकारांच्या मदतीने 133 धावा केल्या. न्यूझीलंडने अशाप्रकारे दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या कसोटी मालिकेची सांगता ही विजयाने केली.

केनचं विक्रमी वेगवान 32 वं शतक

केनचं मालिकेतील तिसरं शतक

केनने दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील हे तिसरं शतक ठरलं. केनने या मालिकेत दक्षिण आफ्रिके विरुद्ध अनुक्रमे 118, 109, 43 आणि आता 133* अशा धावा केल्या. केनने केलेल्या या कामगिरीसाठी त्याला ‘मॅन ऑफ द सीरिज’ या पुरस्काराने गौरवण्यात आलं.

न्यूझीलंड प्लेईंग ईलेव्हन | टीम साऊथी (कॅप्टन), टॉम लॅथम, डेव्हॉन कॉनवे, केन विल्यमसन, रचिन रवींद्र, विल यंग, टॉम ब्लंडेल (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, मॅट हेन्री, नील वॅगनर आणि विल्यम ओरर्के.

दक्षिण आफ्रिका प्लेईंग ईलेव्हन | नील ब्रँड (कर्णधार), क्लाईड फोर्टुइन (विकेटकीपर), रेनार्ड व्हॅन टोंडर, झुबेर हमझा, डेव्हिड बेडिंगहॅम, कीगन पीटरसन, रुआन डी स्वार्ड, शॉन वॉन बर्ग, डेन पिएड, त्शेपो मोरेकी आणि डेन पॅटरसन.

कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट.
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं.
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?.
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?.
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?.
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?.
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?.
...तरी शिवतीर्थवरचा चाफा काही केल्या बोलेना...शेलारांचा ठाकरेंना टोला
...तरी शिवतीर्थवरचा चाफा काही केल्या बोलेना...शेलारांचा ठाकरेंना टोला.
कोकाटे यांची अटक अटळ? कायदेशीर अडचणी वाढल्या, सुनावणी पुढे ढकलली अन्..
कोकाटे यांची अटक अटळ? कायदेशीर अडचणी वाढल्या, सुनावणी पुढे ढकलली अन्...
पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे
पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे.