NZ vs WI 5th T20I : न्यूझीलंडकडे मालिका जिंकण्याची संधी, विंडीज रोखणार का?

New Zealand vs West Indies 5th T20I Live Streaming and Preview : यजमान न्यूझीलंड या 5 सामन्यांच्या मालिकेत 2-1 ने आघाडीवर आहे. त्यामुळे न्यूझीलंडकडे शेवटचा सामना जिंकून मालिका विजयाची संधी आहे.

NZ vs WI 5th T20I : न्यूझीलंडकडे मालिका जिंकण्याची संधी, विंडीज रोखणार का?
NZ vs WI 5th T20i Preview
Image Credit source: Phil Walter/Getty Images and and Getty Images
| Updated on: Nov 13, 2025 | 12:24 AM

वेस्ट इंडिज क्रिकेट टीम सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. न्यूझीलंड विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यात सध्या टी 20I मालिका खेळवण्यात येत आहे. या मालिकेत आतापर्यंत 4 सामने खेळवण्यात आले आहेत. त्यापैकी 3 सामन्यांचा निकाल लागला आहे. तर 1 सामना हा पावसामुळे रद्द करावा लागला आहे. न्यूझीलंड या मालिकेत 2-1 ने आघाडीवर आहे. पाहुण्या वेस्ट इंडिजने या दौऱ्याची शानदार सुरुवात केली. विंडीजने 5 नोव्हेंबरला न्यूझीलंडचा 7 धावांनी धुव्वा उडवत विजयी सुरुवात केली होती.  मात्र त्यानंतर न्यूझीलंडने आपली सुपर पावर दाखवली. न्यूझीलंडने सलग 2 सामने जिंकले. न्यूझीलंडने यासह मालिका विजयाचा दावा मजबूत केला.  विंडीज सलग 2 पराभवांनंतर मालिकेत 1-2 ने पिछाडीवर होती. मात्र त्यानंतरही विंडीजकडे चौथ्या सामन्यात विजय मिळवून मालिकेत बरोबरी करण्याची संधी होती. तर न्यूझीलंडला मालिका विजय निश्चित करण्याची संधी होती. मात्र सोमवारी 10 नोव्हेंबरला पावसामुळे हा सामना रद्द करावा लागला. त्यामुळे आता पाचव्या आणि अंतिम सामन्यात मालिकेचा काय निकाल लागतो? याकडे क्रिकेट विश्वाचं लक्ष असणार आहे. हा पाचवा सामना कधी आणि कुठे होणार? हे सविस्तर जाणून घेऊयात.

न्यूझीलंड विरुद्ध वेस्ट इंडिज पाचवा सामना कधी?

न्यूझीलंड विरुद्ध वेस्ट इंडिज पाचवा सामना गुरुवारी 13 नोव्हेंबरला होणार आहे.

न्यूझीलंड विरुद्ध वेस्ट इंडिज पाचवा सामना कुठे?

न्यूझीलंड विरुद्ध वेस्ट इंडिज पाचवा सामना डुनेडिन येथील युनिव्हर्सिटी ओव्हल येथे होणार आहे.

न्यूझीलंड विरुद्ध वेस्ट इंडिज पाचव्या सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

न्यूझीलंड विरुद्ध वेस्ट इंडिज पाचव्या टी 20i सामन्याला भारतीय वेळेनुसार पहाटे 5 वाजून 45 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 5 वाजून 15 मिनिटांनी टॉस होईल.

न्यूझीलंड विरुद्ध वेस्ट इंडिज पाचवा सामना टीव्हीवर कुठे पाहायला मिळेल?

न्यूझीलंड विरुद्ध वेस्ट इंडिज पाचवा सामना टीव्हीवर सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल.

न्यूझीलंड विरुद्ध वेस्ट इंडिज पाचवा सामना मोबाईलवर कुठे पाहता येईल?

न्यूझीलंड विरुद्ध वेस्ट इंडिज पाचवा सामना मोबाईलवर सोनी लिव्ह एपद्वारे लाईव्ह पाहायला मिळेल.

न्यूझीलंड मालिका जिंकणार की विंडीज बरोबरी करणार?

दरम्यान मिचेल सँटनर पाचव्या सामन्यातही न्यूझीलंडचं नेतृत्व करणार आहे. तर शाई होपकडे विंडीजच्या कर्णधारपदाची जबाबदारी आहे. न्यूझीलंडला हा सामना जिंकून मालिका विजयाची संधी आहे. मात्र विंडीजच्या कामगिरीवर या मालिकेचा निर्णय अवलंबून आहे. विंडीजने हा क्रिकेट सामना जिंकला तर मालिका 2-2 ने बरोबरीत राहिल. तर विंडीजने न्यूझीलंडसमोर गुडघे टेकले तर त्यांना 1-3 ने मालिका गमवावी लागेल. अशात आता या पाचव्या सामन्यासह मालिकेचा काय निकाल लागतो? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.