AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ODI World Cup 2023 मध्ये इंडिया नाही, ‘या’ नावाने टीमने खेळाव? वीरेंद्र सेहवागची अजब डिमांड

ODI World Cup 2023 : टीमने 'इंडिया' नावाने नाही, मग कुठल्या नावाने खेळायचं?. आज वनडे वर्ल्ड कप 2023 साठी टीमची घोषणा झालीय. त्याचवेळी सेहवागच टि्वट सुद्धा चर्चेत आहे. यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटण स्वाभाविक आहे.

ODI World Cup 2023  मध्ये इंडिया नाही, 'या' नावाने टीमने खेळाव? वीरेंद्र सेहवागची अजब डिमांड
ODI World cup 2023Image Credit source: AFP/PTI
| Updated on: Sep 05, 2023 | 3:15 PM
Share

नवी दिल्ली : टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवाग याने बीसीसीआयकडे अजब मागणी केली आहे. विरेंद्रे सेहवागने बसीसीआय सचिव जय शाह यांच्याकडे अपील केलं आहे. पुढच्या महिन्यापासून सुरु होणाऱ्या वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाच नाव बदलण्याची मागणी विरेंद्र सेहवागने केली आहे. सेहवागने टि्वट करुन म्हटलय की, “मला नेहमीच असं वाटत आलय की, नाव असं हवं, ज्यामुळे आतमधून अभिमानाची भावना जागृत होईल. आपण भारतीय आहोत. इंडिया हे नाव इंग्रजांनी दिलय. त्यामुळे टीम इंडियाच नाव बदललं पाहिजे. सेहवागने टि्वटरवर जय शाह यांना टॅग केलय. वर्ल्ड कपमध्ये भारतीय खेळाडूंच्या जर्सीवर भारत नाव हवं, अशी त्याने मागणी केली आहे”

विरेंद्र सेहवागच्या टि्वटनंतर आता बातम्या सुरु झाल्या आहेत. लवकरच देशाच नाव बदलून अधिकृतपणे भारत केलं जाऊ शकतं. म्हणजे इंग्रजीमध्ये देशाच नाव भारताच लिहिलं जाईल. सेहवागने नेपाळ विरुद्ध सामन्याच्यावेळी इंडिया विरुद्ध नेपाळऐवजी भारत विरुद्ध नेपाळ हा हॅशटॅग वापरला होता. कुठल्या आंतरराष्ट्रीय टीमच नाव बदलण्याची ही पहिली वेळ नाहीय. याआधी नेदरलँड्स टीमच नाव बदलण्यात आलं होतं. याआधी ही टीम हॉलंड या नावाने ओळखली जात होती. पण एक जानेवारी 2020 पासून या देशाच अधिकृत नाव नेदरलँड्स झालं. सेहवागने नेदरलँड्सच उदहारण दिलय. 1996 च्या वनडे वर्ल्ड कपमध्ये नेदरलँड्सची टीम हॉलंड या नावाने खेळण्यासाठी आली होती. पण 2003 मध्ये ही टीम नेदरलँड्स या नावाने खेळली.

टीम इंडियाची घोषणा

आज सुद्धा ही टीम याच नावाने ओळखली जाते. बर्माने सुद्धा आपलं नाव बदलून म्यानमार केलं. जगातील अनेक देशांनी आपली नाव बदलली आहेत.

आयसीसी वर्ल्ड कप 2023 साठी टीम इंडिया |

रोहित शर्मा (कॅप्टन), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ईशान किशन, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकुर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि कुलदीप यादव.

नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!.
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार.
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर.
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा.
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?.
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर.