AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

World Cup 2023 | टीम इंडियाच्या सततच्या विजयात एका खेळाडूच अपयश झाकलं जातय

World Cup 2023 | टीम इंडिया यंदाच्या वनडे वर्ल्ड कप 2023 मध्ये स्वप्नवत कामगिरी करतेय. टीम इंडियाने विजयाचा धडका लावलाय. आतापर्यंत 6 पैकी 6 सामने जिंकलेत. विजयाची टक्केवारी 100 टक्के आहे. टीम इंडियाच्या विजयाचे एक नाही अनेक नायक, पण एका खेळाडूच अपयश या सगळ्यामध्ये झाकलं जातय.

World Cup 2023 | टीम इंडियाच्या सततच्या विजयात एका खेळाडूच अपयश झाकलं जातय
World Cup 2023 : टीम इंडियाचं उपांत्य फेरीचं गणित झालं सोपं, आता फक्त इतकं केलं की झालं
| Updated on: Oct 31, 2023 | 10:27 AM
Share

मुंबई : वर्ल्ड कप 2023 मध्ये टीम इंडिया आतापर्यंत अजिंक्य आहे. रोहित ब्रिगेडने टुर्नामेंटमध्ये आतापर्यंत सहा सामने खेळले असून या सहा सामन्यातही विजय मिळवलाय. 12 अंकांसह टीम इंडिया पॉइंट टेबलमध्ये टॉपवर आहे. टीम इंडियाने ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, न्यूझीलंड, इंग्लंड सारख्या मातब्बर टीम्सन नमवलय. टीम इंडियाच्या विजयाच वैशिष्ट्य म्हणजे ते कोणा एका प्लेयरवर अवलंबून नव्हते. प्रत्येक विजयाचा वेगवेगळा नायक होता. टीम इंडियाच्या या विजयात काही खेळाडूंच अपयश झाकलं जातय. यात स्टार ओपनर शुभमन गिल सुद्धा आहे. शुभमन गिलचा हा पहिला वर्ल्ड कप आहे. टुर्नामेंट सुरु होण्याआधी गिलला डेंग्यु झाला होता. त्यानंतर तो अफगाणिस्तान आणि ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळू शकला नाही.

टुर्नामेंट सुरु होण्याआधी गिल चागंल्या फॉर्ममध्ये होता. यावर्षी वनडेमध्ये त्याने सर्वाधिक धावा केल्या आहेत. त्याने 1200 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. आयसीसी वनडे रँकिंगध्ये तो दुसऱ्या नंबरवर आहे. पण वर्ल्ड कप सारख्या मोठ्या टुर्नामेंटमध्ये गिलने आतापर्यंत निराश केलय. शुभमन गिलने वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत 4 सामने खेळले आहेत. या चार सामन्यात त्याने 104 धावा केल्या आहेत. यात 53 हायेस्ट स्कोर आहे.

टीमच नाही, तर फॅन्सही निराश

बांग्लादेश विरुद्धच्या सामन्यात त्याने 53 धावा केल्या होत्या. आयसीसी टुर्नामेंटसमध्ये गिलची बॅट तशीच शांतच राहिलीय. 8 इनिगमध्ये त्याने फक्त 151 धावा केल्या आहेत. शुभमन गिल कॅप्टन रोहित शर्माचा ओपनिंग पार्टनर आहे. रोहित उत्तम फॉर्ममध्ये आहे. आक्रमक बॅटिंग करतोय. पण त्याचवेळी शुभमनने टीमलाच नाही, तर फॅन्सनाही निराश केलय. टीम इंडियाने सेमीफायनलध्ये प्रवेश केला आहे. लीग स्टेज संपेपर्यंत गिल एखादी मोठी खेळी करेल, अशी चाहत्यांना अपेक्षा आहे. टीम इंडियाचा पुढचा सामना किती तारखेला?

गिलचा वनडे करिअरमधील रेकॉर्ड शानदार आहे. त्याने 39 सामन्यात 62 च्या सरासरीने 2021 धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर सहा सेंच्युरी, एक द्विशतक आणि 10 हाफ सेंच्युरी आहेत. 208 त्याचा हायेस्ट स्कोर आहे. हे आकडे पाहूनच गिल क्लास क्रिकेटर असल्याच लक्षात येतं. तो स्वत: सुद्धा खराब फॉर्म विसरुन प्रतिस्पर्धी टीमवर वर्चस्व निर्माण करण्यासाठी उत्सुक असेल. टीम इंडियाचा पुढचा सामना 2 नोव्हेंबरला वानखेडे स्टेडियमवर श्रीलंकेविरुद्ध होईल. दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड विरुद्ध 5 आणि 12 नोव्हेंबरला मॅच होईल.

Follow Us
मोठी बातमी! धर्मेंद्र प्रधानांची पुन्हा कॅबिनेटमध्ये एन्ट्री?
मोठी बातमी! धर्मेंद्र प्रधानांची पुन्हा कॅबिनेटमध्ये एन्ट्री? मंत्रिमंडळ विस्ताराबाबत दिल्लीत...
सुप्रीम कोर्टातील सुनावणीआधी कानमंत्र; शिंदेकडून नेत्यांना सूचना
सुप्रीम कोर्टातील सुनावणीआधी कानमंत्र; शिंदेकडून नेत्यांना महत्त्वाच्या सूचना... मोठी अपडेट समोर
उदय सामंत: 'एमआयडीसीच्या समस्यांवर लक्ष, मराठी भाषेला प्राधान्य'
उदय सामंत: एमआयडीसीच्या समस्यांवर लक्ष, मराठी भाषेला प्राधान्य
मराठीची सक्ती नाही मराठीची भक्ती आहे
'मराठीची सक्ती नाही मराठीची भक्ती आहे', रिक्षाचालकांच्या मराठी सक्तीवरून शिंदेंची प्रतिक्रिया
मराठी न बोलल्यास परवाना रद्द करण्याच्या धमक्यांवरचा दुबेंचा इशारा
संजय दुबे यांचा प्रताप सरनाईक यांच्या मराठी भाषेच्या सक्तीला थेट विरोध
प्रवीण दरेकर यांचा नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्यावर हल्लाबोल
प्रवीण दरेकर यांचा नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्यावर हल्लाबोल:
शरद पवार एनडीएमध्ये जाणार नाहीत, विरोधातच राहणार
पवारांकडून एनडीएमध्ये जाण्याच्या चर्चा फेटाळल्या; पक्ष कार्यकर्त्यांना दिले स्पष्ट निर्देश
देशमुखांचं कारागृह महानिरीक्षकांना पत्र; गैरप्रकारांच्या चौकशीची मागणी
धनंजय देशमुखांचे बीड कारागृह महानिरीक्षकांना पत्र: गैरप्रकार चौकशी आणि आरोपी स्थलांतराची मागणी
भाजप-शिवसेनेतील सुप्त संघर्ष पुन्हा चव्हाट्यावर
भाजप-शिवसेनेतील सुप्त संघर्ष पुन्हा चव्हाट्यावर? ठाण्यातील कार्यक्रमात भाजप नेत्यांची अनुपस्थिती
बेस्ट कामगारांचा बेमुदत संप; प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक
बेस्ट कामगारांचा मंगळवारपासून बेमुदत संप: प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक