IND vs AUS | अशी हालत! पहिल्या पत्रकार परिषदेत समोरच दृश्य पाहून सूर्यकुमारला काय वाटलं असेल?
IND vs AUS | कॅप्टन म्हणून सूर्यकुमारच्या पहिल्या प्रेस कॉन्फरन्सला फक्त इतके पत्रकार उपस्थित. सूर्यकुमार यादवने सुद्धा अशी कल्पना केली नसेल. टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलियामध्ये आज पहिला T20 सामना होणार आहे. दोन्ही टीम्समध्ये पाच टी 20 सामन्यांची सीरीज होणार आहे.
IND vs AUS 1st T20 | वर्ल्ड कपमधील निराशाजनक पराभवानंतर आजपासून T20 सीरीज सुरु होत आहे. समोर पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियाच आव्हान आहे. नियमित कॅप्टन हार्दिक पांड्या आणि अन्य सीनियर खेळाडूंच्या अनुपस्थितीत सूर्यकुमार यादवकडे टीमच नेतृत्व दिलय. कॅप्टन म्हणून सूर्यकुमार यादवच खूपच उदासीन स्वागत झालं. परंपरेप्रमाण कुठल्याही सीरीजच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषद होते. कॅप्टन पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तर देतो. सूर्यकुमार यादव बुधवारी पहिल्या पीसीला सामोरा गेला. त्यावेळी समोरच दुश्य पाहून त्याचा भ्रमनिरास झाला असेल. त्याने सुद्धा अशी कल्पना केली नसेल. सूर्यकुमार यादव पत्रकार परिषदेसाठी आला, तेव्हा समोर फक्त 2 पत्रकार होते. विशाखापट्टनमध्ये भारत-ऑस्ट्रेलियामध्ये पहिला T20 सामना होणार आहे.
जुने, जाणते क्रीडा पत्रकार विमल कुमार यांनी X वरुन या पत्रकार परिषदेच वास्तव सांगितलं. “वर्ल्ड कप कव्हर करण्यासाठी 200 पत्रकार होते, तेच आता फक्त 2 पत्रकार आले. कॅप्टन म्हणून सूर्यकुमारने पहिल्या पत्रकार परिषदेत अशी कल्पना केली नसेल. भारतातील पत्रकार परिषदेला सर्वात कमी उपस्थितीचा हा रेकॉर्ड आहे का? मला असं वाटत” असं विमल कुमार म्हणाले.
‘तुम्ही उद्या सकाळी उठलात, विसरुन जाल अस नाहीय’
वर्ल्ड कप बद्दल सूर्यकुमार यादव व्यक्त झाला. “तुम्ही निराश होण स्वाभाविक आहे. शेवटी, तुम्ही मागे वळून प्रवासाकडे पाहता, तेव्हा वर्ल्ड कप उत्तम अभियान ठरल्याच दिसेल. फक्त सदस्यांनाच नाही, संपूर्ण भारताला आम्ही मैदानावरील जी कामगिरी दाखवली, त्याचा अभिमान आहे. हे सकारात्मक आहे. आम्हाला सुद्धा याचा अभिमान आहे” असं सूर्यकुमार यादव म्हणाला. “फायनलमधील पराभव विसरायला वेळ लागेल. तुम्ही उद्या सकाळी उठलात, विसरुन जाल अस नाहीय. ही मोठी टुर्नामेंट होती. आम्हाला जिंकायला आवडलं असतं. पण तुम्हाला हे विसरुन पुढे जाव लागेल” असं सूर्यकुमार यादव म्हणाला.
From 200 odd media people (during World Cup) to just two in press conference in India is staggering!
SKY wouldn’t have imagined this in his firstPC as captain.
Is this a record with fewest attendance in a press conference in India? I would imagine so. pic.twitter.com/O41WbIUKla
— Vimal कुमार (@Vimalwa) November 22, 2023
टीमला काय मंत्र दिला?
“बिनधास्त खेळा. टीमसाठी सेल्फलेस म्हणजे निस्वार्थी भावनेने खेळ दाखवा” जेणेकरुन टीमच्या विजयाला हातभार लागेल, असा सूर्याने पहिल्या T20 आधी टीमला मंत्र दिलाय. सूर्यकुमार यादव T20 मधील नंबर 1 फलंदाज आहे.