PAK vs BAN: पाकिस्तान चौथ्या दिवसापर्यंत 94 धावांनी पिछाडीवर, सामना ड्रॉ होणार?

Pakistan vs Bangladesh 1st Test Day 4 Stumps: बांगलादेशने मुशफिकुर रहीम याच्या 191 धावांच्या खेळीच्या जोरावर पहिल्या डावात 117 धावांची आघाडी मिळाली. पाकिस्तानने चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 1 विकेट गमावून 23 धावा केल्या.

PAK vs BAN: पाकिस्तान चौथ्या दिवसापर्यंत 94 धावांनी पिछाडीवर, सामना ड्रॉ होणार?
pakistan batsman
Image Credit source: Pakistan Cricket X Account
| Updated on: Aug 24, 2024 | 10:50 PM

पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश यांच्यात रावळपिंडी येथे पहिला कसोटी सामना खेळवण्यात येत आहे. या सामन्यातील चौथ्या दिवसाचा खेळ संपला आहे. पाकिस्तनाने दुसऱ्या डावात 1 विकेट्स गमावून 23 धावा केल्या आहेत. पाकिस्तान अद्याप 94 धावांनी पिछाडीवर आहे. त्याआधी बांगलादेशने तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 5 विकेट्स गमावून 316 धावा केल्या. तर चौथ्या दिवशी बांगलादेश या धावसंख्येपासून खेळाला सुरुवात केली. बांगलादेशचा पहिला डाव हा 556 धावांवर आटोपला.

तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा मुशफिकुर रहमान 55 आणि लिटॉन दास 52 धावांवर नाबाद होते. बांगलादेशने लिटॉन दास याच्या रुपात चौथ्या दिवसातील पहिली विकेट गमावली. लिटॉन दासने 78 बॉलमध्ये 56 रन्स केल्या. नसीम शाहने दासला मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. त्यानंतर मुशफिकुर रहीम आऊट झाला. रहीमचं द्विशतक अवघ्या 9 धावांनी हुकलं. रहीमने 341 बॉलमध्ये 191 धावा केल्या. रहीमच्या या खेळीत 22 चौकार आणि 1 सिक्स ठोकला.

हसन महमूद याला 18 बॉल खेळूनही एक धावही करता आली नाही. मेहदी हसनने 77 धावांचं योगदान दिलं. शोरिफूल इस्लामने 22 धावा केल्या. तर नाहिद राणा 1 धाव करुन नाबाद राहिला. तर पाकिस्तानकडून नसीम शाह याने 3 विकेट्स घेतल्या आहे. शाहीन अफ्रिदी, खुर्रम शहजाद आणि मोहम्मद अली या त्रिकुटाने प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या. तर सॅम अय्युबला 1 विकेट मिळाली. तर पाकिस्तानने दुसऱ्या डावात 1 विकेट गमावून 23 धावा केल्या. पाकिस्तान अजून 94 धावांनी पिछाडीवर आहे. त्यामुळे पहिला सामना हा ड्रॉ होण्याची अधिक शक्यता आहे.

पाकिस्तान 94 धावांनी पिछाडीवर

पाकिस्तान प्लेइंग ईलेव्हन : शान मसूद (कॅप्टन), अब्दुल्ला शफीक, सॅम अयुब, बाबर आझम, सौद शकील, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), आगा सलमान, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, खुर्रम शहजाद आणि मोहम्मद अली.

बांगलादेश प्लेइंग ईलेव्हन : नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), शादमान इस्लाम, झाकीर हसन, मोमिनुल हक, मुशफिकुर रहीम, शकीब अल हसन, लिटॉन दास (विकेटकीपर), मेहदी हसन मिराझ, शोरीफुल इस्लाम, हसन महमूद आणि नाहिद राणा.

Follow Us