Ambadas Danve | ठाकरे खरंच फडणवीसांना भेटले होते का? अंबादास दानवेंनी अखेर सांगितलंच…
महाराष्ट्रातील विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. अशात उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात मध्यरात्री भेट झाल्याची चर्चा रंगली आहे. एका ट्विटद्वारे या भेटीचा दावा समोर आला असून त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध अंदाज बांधले जात आहेत. यावर आता अंबादास दानवे यांनी मराठी वाक्यप्रचार सांगत स्पष्ट मत मांडलं.
महाराष्ट्रातील विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. अशात उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात मध्यरात्री भेट झाल्याची चर्चा रंगली आहे. एका ट्विटद्वारे या भेटीचा दावा समोर आला असून त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध अंदाज बांधले जात आहेत. यावर आता अंबादास दानवे यांनी मराठी वाक्यप्रचार सांगत स्पष्ट मत मांडलं. त्याशिवाय त्यांनी संजय जाधव पक्ष सोडणार आहेत का? या प्रश्नाचंही उत्तर दिलं.
नुकतीच अंबादास दानवे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी सांगितले की, उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांना चोरून लपून भेटण्याची गरज नाही. ठाकरे तर कधीच असं करणार नाहीत, असं अंबादास दानवे रोखून म्हणाले. पुढे त्यांनी सांगितले की, संजय जाधव बैठकीला आले नाही, ते त्यांनी मला फोन करून सांगितलं. संजय जाधव नातलगांच्या कार्यक्रमाला गेले होते. त्यामुळे पुन्हा पुन्हा सांगतो, ‘शितावरून भाताची परीक्षा करण्याची गरज नाही.’
Published on: Apr 26, 2026 04:20 PM
रेश्मा काळे नॉट रिचेबल नाहीत; उद्याच माघार घेणार? महाजनांचा मोठा काय?
गोंदियाला वादळी पावसाचा दणका! उकाड्यापासून दिलासा, पण धान उत्पादक.....
नेस्को ड्रग्ज प्रकरणात मोठा ट्विस्ट! आता आरोपींना हायकोर्टाकडून जामीन
वृद्धाला मारहाण करणाऱ्या कॅब चालकाच्या अडचणीत वाढ, परवाना होणार रद्द

