
बांगलादेशचा स्टार अनुभवी ऑलराउंडर आणि माजी कर्णधार शाकिब अल हसन याला संताप अनावर झाला. पाकिस्तान विरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातील पाचव्या आणि शेवटच्या दिवशी शाकिबने फलंदाजांच्या दिशेने रागात बॉल फेकला. सुदैवाने यात पाकिस्तानच्या फलंदाजाला काही झालं नाही. शाकिबने याआधी अनेकदा मैदानात असे प्रकार केले आहेत. मात्र पराभव दिसत असल्याने पाकिस्तानच्या फलंदाजाने वेळकाढूपणा करत असल्याने शाकिबने बॉल फेकल्याचं म्हटलं जात आहे. नक्की काय झालं? हे आपण जाणून घेऊयात.
पाकिस्तानचा फलंदाज मोहम्मद रिझवान बॅटिंग दरम्यान पुढील बॉल खेळण्यासाठी वेळकाढूपणा करत होता. मात्र शाकिबला ते काही पटलं नाही. शाकिबला आला राग आणि रिझवानच्या डोक्याच्या दिशेने बॉल फेकला. रिझवानने याआधीही अनेकदा असे प्रकार केले आहेत. रिझवानने या सामन्यातही तसंच काही करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याच्यासमोर शाकिब असल्याचा विसर रिझवानला पडला असावा.
हा सर्व प्रकार पाकिस्तानच्या दुसऱ्या डावातील बॅटिंग दरम्यान घडला. बांगलादेशला विजय दिसत होता. त्यामुळे बांगलादेश पाकिस्तानला झटपट गुंडाळण्याच्या प्रयत्नात होती. मात्र मोहम्मद रिझवानने एक बाजू लावून धरली होती. तसेच रिझवान वेळ वाया घालवत होता. शाकिब बॉल घेऊन तयार होता. मात्र रिझवान स्टंपसमोर येऊन बॅटिंगसाठी तयार होईना. त्यामुळे शाकिबच्या डोक्यात तिडीक गेली आणि दिला बॉल फेकून. शाकिबने फेकलेला बॉल रिझवानच्या डोक्यावरुन गेला. विकेटकीपरने हा बॉल पकडला. पाकिस्तानच्या डावातील 33 व्या ओव्हरमध्ये हा सर्व प्रकार घडला.
शाकिबची ही कृती अंपायरलाही पटली नाही. अंपायरने नाराजी व्यक्त करत शाकिबला सुनावलं. शाकिबने माफी मागितली. या सर्व प्रकाराचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
दरम्यान रिझवानने इतकं करुनही त्याला पाकिस्तानचा पराभव टाळता आला नाही. बांगलादेशने 10 विकेट्सने विजय मिळवलाच. बांगलादेशचा पाकिस्तान विरुद्धचा हा कसोटी क्रिकेटमधील पहिलावहिला विजय ठरला. पाकिस्तानने पहिला डाव 448 धावांवर घोषित केला. बांगलादेशने प्रत्युत्तरात 565 धावा करत 117ची आघाडी घेतली. त्यानंतर बांगलादेशने पाकिस्तानला 146 धावांवर गुंडाळलं. त्यामुळे बांगलादेशने विजयासाठी मिळालेलं 30 धावांचं आव्हान एकही विकेट न गमावता पूर्ण केलं.
शाकिबची सटकली
Mental state like Shakib Al Hasan
Academic performance like Babar Azam 💀pic.twitter.com/G3noKlmhzr— Dinda Academy (@academy_dinda) August 25, 2024
पाकिस्तान प्लेइंग ईलेव्हन : शान मसूद (कॅप्टन), अब्दुल्ला शफीक, सॅम अयुब, बाबर आझम, सौद शकील, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), आगा सलमान, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, खुर्रम शहजाद आणि मोहम्मद अली.
बांगलादेश प्लेइंग ईलेव्हन : नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), शादमान इस्लाम, झाकीर हसन, मोमिनुल हक, मुशफिकुर रहीम, शकीब अल हसन, लिटॉन दास (विकेटकीपर), मेहदी हसन मिराझ, शोरीफुल इस्लाम, हसन महमूद आणि नाहिद राणा.