
पाकिस्तान क्रिकेट टीमने बांगलादेश विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या दिवशी पहिला डाव हा घोषित केला आहे. पाकिस्ताने 113 ओव्हरमध्ये 6 बाद 448 धावांवर डाव घोषित केला आहे. पाकिस्तानने दुसऱ्या दिवशी डाव घोषित करेपर्यंत एकूण 290 धावा केल्या. पाकिस्तानचा पहिल्या दिवसाचा खेळसंपेपर्यंत 4 आऊट 158 असा स्कोअर होता. पाकिस्तानसाठी मोहम्मद रिझवान याने सर्वाधिक धावा केल्या. रिझवान 171 धावांवर नाबाद राहिला. तर सऊद शकील याने 141 धावांची खेळी केली. तर इतर काही फलंदाजांनी चांगलं योगदान दिलं.
सऊद शकील आणि मोहम्मद रिझवान या दोघांनी दुसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात केली. सौद शकील याने 57 आणि रिझवानने नाबाद 24 धावांवर नाबाद होते. इथून दोघांनी फटकेबाजीची सुरुवात केली आणि शतक पूर्ण केलं. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी 240 धावांची भागीदारी केली. बांगलादेशसाठी डोकेदुखी ठरलेली ही जोडी मेहदी हसन मिराज याने फोडली. मेहदीने सऊद शकील याला विकेटकीपर लिटॉन दास याच्या हाती स्टंपिंग केलं. सऊदने 261 बॉलमध्ये 9 चौकारांच्या मदतीने 141 रन्स केल्या. त्यानंतर मोहम्मद रिझवान आणि आघा सलमान या जोडीने सहाव्या विकेटसाठी 44 धावा जोडल्या. आघा सलमानला शाकिब अल हसन याने मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. आघाने 19 धावा केल्या. त्यामुळे पाकिस्तानचा स्कोअर 6 बाद 398 असा झाला.
त्यानंतर रिझवान आणि शाहिन शाह अफ्रिदी या जोडीने सातव्या विकेटसाठी डाव घोषित करेपर्यंत 150 धावांची नाबाद भागीदारी केली. शाहिन शाह अफ्रिदी याने 24 बॉलमध्ये नॉट आऊट 29 रन्स केल्या. तर रिझवानच्या नाबाद 171 धावांच्या खेळीत 11 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश होता. बांगलादेशकडून शोरिफूल इस्लाम आणि हसन महमुद या दोघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या. तर मेहदी हसन आणि शाकिब अल हसन या दोघांनी 1-1 विकेट घेतली.
पाकिस्तानचा पहिला डाव घोषित
That is all from the first innings. Pakistan declare at 4️⃣4️⃣8️⃣-6️⃣ 🏏
Rizwan remains unbeaten at 1️⃣7️⃣1️⃣ 👏#PAKvBAN | #TestOnHai pic.twitter.com/cjVlwfMxbF
— Pakistan Cricket (@TheRealPCB) August 22, 2024
पाकिस्तान प्लेइंग ईलेव्हन : शान मसूद (कॅप्टन), अब्दुल्ला शफीक, सॅम अयुब, बाबर आझम, सौद शकील, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), आगा सलमान, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, खुर्रम शहजाद आणि मोहम्मद अली.
बांगलादेश प्लेइंग ईलेव्हन : नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), शादमान इस्लाम, झाकीर हसन, मोमिनुल हक, मुशफिकुर रहीम, शकीब अल हसन, लिटॉन दास (विकेटकीपर), मेहदी हसन मिराझ, शोरीफुल इस्लाम, हसन महमूद आणि नाहिद राणा.