PAK vs ENG : नोमान अली-साजीद खानकडून इंग्लंडचा खुर्दा, पाकिस्तान दुसऱ्या सामन्यात 152 धावांनी विजयी, मालिकेत 1-1 ने बरोबरी

Pakistan vs England 2nd Test Match Result : पहिल्या सामन्यात लाजीरवाणा पराभव स्वीकारल्यानंतर पाकिस्तानने दुसऱ्या कसोटीत धमाका केला आहे. पाकिस्तानने इंग्लंडचा चौथ्याच दिवशी 152 धावांनी विजय मिळवत मालिकेत 1-1 ने बरोबरी साधली आहे.

PAK vs ENG : नोमान अली-साजीद खानकडून इंग्लंडचा खुर्दा, पाकिस्तान दुसऱ्या सामन्यात 152 धावांनी विजयी, मालिकेत 1-1 ने बरोबरी
nomal ali and sajid khan
Image Credit source: Pakistan Cricket X Account
| Updated on: Oct 18, 2024 | 12:50 PM

पाकिस्तान क्रिकेट टीमने इंग्लंडवर मुलतानमधील दुसऱ्या कसोटी सामन्यातील चौथ्या दिवशी 152 धावांनी दणदणीत विजय मिळवला आहे. पाकिस्तानने न्यूझीलंडला विजयासाठी 297 धावांचं आव्हान दिलं होतं. इंग्लंडने या विजयी धावांचा पाठलाग करत तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 2 विकेट्स गमावून 36 धावा केल्या होत्या. त्यामुळे इंग्लंडला चौथ्या गिवशी 261 धावांची गरज होती. मात्र इंग्लंडला चौथ्या दिवशी 8 विकेट्सच्या मोबदल्यात 108 धावाच करता आल्या. इंग्लंडचा डाव अशाप्रकारे 33.3 ओव्हरमध्ये 144 धावांवर आटोपला. पाकिस्तानने या विजयासह 3 सामन्यांच्या मालिकेत 1-1 ने बरोबरी साधली आहे. त्यामुळे तिसरा आणि अंतिम सामना हा निर्णायक होणार आहे.

नोमान आणि साजीद जोडीचा धमाका

नोमान अली आणि साजीद खान ही जोडी पाकिस्तानच्या विजयाची शिल्पकार ठरली. साजीदने एकूण 9 तर नोमानने 11 विकेट्स घेतल्या. साजीदने पहिल्या डावात 7 तर दुसऱ्या डावात 2 विकेट्स घेतल्या. तर नोमानने पहिल्या डावात 3 आणि दुसऱ्या डावात 8 विकेट्स घेतल्या. यासह पाकिस्तानसाठी नोमान आणि साजीद या जोडीने इतिहास रचला. नोमान आणि साजीद पाकिस्तासाकडून 52 वर्षांनी 20 पैकी 20 विकेट्स घेणारी पहिली जोडी ठरली. याआधी पाकिस्तानकडून असा कारनामा हा 1972 साली तेव्हाच्या  जोडीने केला होता.

इंग्लंडची बॅटिंग

इंग्लंडकडून दुसऱ्या डावात एकालाही 40 पार मजल मारता आली नाही. इंग्लंडकडून 5 जणांनी दुहेरी आकडा गाठला. मात्र नोमानने त्या बॉलिंगसमोर एकालाही मोठी खेळी करु दिली नाही. इंग्लंडसाठी कॅप्टन बेन स्टोक्स याने सर्वाधिक 37 धावा केल्या.ब्रायडन कार्सने 27 धावांचं योगदान दिलं. ओली पोप 22 धावा करुन माघारी परतला. जो रुट याने 18 तर हॅरी ब्रूकने 16 धावा केल्या. दोघांना भोपळाही फोडता आला नाही. तिघांना 9 पेक्षा अधिक धावांच्या पुढे जाता आलं नाही. तर मॅथ्यू पॉट्स 9 धावांवर नाबाद परतला. नोमान अलीने 16.3 ओव्हरमध्ये 46 धावांच्या मोबदल्यात 8 विकेट्स घेतल्या. तर साजीद खान याने 2 विकेट्स देत नोमानला अप्रतिम साथ दिली.

पाकिस्तानचा अखेर मायदेशात विजय

पाकिस्तान प्लेइंग ईलेव्हन : शान मसूद (कर्णधार), सैम अयुब, अब्दुल्ला शफीक, कामरान गुलाम, सौद शकील, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), आगा सलमान, आमेर जमाल, नोमान अली, साजिद खान आणि जाहिद महमूद.

इंग्लंड प्लेइंग ईलेव्हन : बेन स्टोक्स (कर्णधार), झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ (विकेटकीपर), मॅथ्यू पॉट्स, ब्रायडन कार्स, जॅक लीच आणि शोएब बशीर.