AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PAK vs ENG Test: पाकिस्तानची इंग्लंडमध्ये नाचक्की, पहिल्या दिवशीच 171 धावांवर खेळ खल्लास!

इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात तीन सामन्यांची कसोटी मालिका होत आहे. या मालिकेतील पहिला सामना लीड्सच्या हेडिंग्ले मैदानात होत आहे. पण पहिल्याच दिवशी पाकिस्तानची पिसं निघाली. अवघ्या 171 धावांवर खेळ आटोपला.

PAK vs ENG Test: पाकिस्तानची इंग्लंडमध्ये नाचक्की, पहिल्या दिवशीच 171 धावांवर खेळ खल्लास!
PAK vs ENG Test: पाकिस्तानची इंग्लंडमध्ये नाचक्की, पहिल्या दिवशीच 171 धावांवर खेळ खल्लास!Image Credit source: Twitter
| Updated on: Aug 19, 2026 | 10:16 PM
Share

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027 स्पर्धेत इंग्लंड आणि पाकिस्तान मालिका होत आहे. खरं तर या दोन्ही संघांचं अंतिम फेरीचं स्वप्न भंगलं आहे. कसोटी क्रिकेटमधील वर्चस्व कायम ठेवण्यासाठी दोन्ही संघासाठी ही मालिका महत्त्वाची आहे. तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना लीड्सच्या हेडिंग्ले मैदानात होत आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल हा इंग्लंडच्या बाजूने लागला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. हा निर्णय योग्यच ठरला असं म्हणावं लागेल. कारण पहिल्या डावातील पहिल्याच दिवशी पाकिस्तानचा संपूर्ण संघ 171 धावांवर तंबूत परतला. इंग्लंडकडून ओली रॉबिनसन आणि जोश टंग या दोघांनी पाकिस्तानचा संघ तंबूत पाठवला. या दोघांनी प्रत्येकी 5-5 विकेट घेतल्या.

पाकिस्तानचा डाव 171 धावांवर आटोपला

कसोटी सामन्यात पाकिस्तानला पहिल्याच चेंडूवर धक्का बसला. अझान अवैसला खातंही खोलता आलं नाही. त्यानंतर आलेला शान मसूद काही खास करू शकला नाही. त्याचा खेळही 5 धावांवर आटोपला. दोन विकेट झटपट पडल्यानंतर इमाम उल हक आणि अब्दुल्ला शफीक यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 91 धावांची भागीदारी केली. पण भागीदारी मोडली आणि धडाधड विकेट पडल्या. इमाम उल हक 42, तर अब्दुल्ला शफीक 61 धावा करून बाद झाले. सउद शकील 5, सलमान अघा 21, मोहम्मद रिझवान 12, अली उस्मान 0, खुर्रम उस्मान 14, मोहम्मद अब्बास 2 धावा करून बाद झाले.

पाकिस्तानची इंग्लंडमधील निराशाजनक कामगिरी

2020 मध्ये साउथहॅम्प्टन येथे अँडरसनने घेतलेल्या 56 धावांवर 5 विकेटच्या कामगिरीनंतर पाकिस्तानविरुद्ध वेगवान गोलंदाजाने घेतलेले इंग्लंडचे हे पहिले पाच बळी आहेत. इतकंच काय तर ऑली रॉबिन्सनआणि जोश टंग ही पाकिस्तानविरुद्ध एकाच डावात पाच बळी घेणारी इंग्लंडची पहिली वेगवान गोलंदाजांची जोडी ठरली आहे. एकाच डावात दोन वेगवान गोलंदाजांनी पाच बळी घेण्याची इंग्लंडची ही 11 वी वेळ होती आणि 1998 नंतरची पहिलीच वेळ आहे. पाकिस्तानविरुद्ध अशी काम करण्याची ही चौथी वेळ असून 2006 नंतर पहिल्यांदाच घडलं आहे. इतकंच काय तर 2000 या वर्षापासून पाकिस्तानची इंग्लंडविरुदध पहिल्या डावातील ही पाचवी कमी धावसंख्या आहे. यापूर्वी 2010 मध्ये बर्मिंघममध्ये 72, 2010 मध्ये लॉर्ड्सवर 74, 2012 मध्ये दुबईत 99, 2006 मध्ये मँचेस्टरमध्ये 119 आणि आता लीड्सवर 171 धावांवर खेळ आटोपला .

Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ