AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PAK vs NZ : पाकिस्तानची जबरदस्त बॅटिंग, ODI मध्ये चेस केलं 337 धावांच टार्गेट, एका बॅट्समनने चोपल्या 180 धावा

PAK vs NZ : पाकिस्तानच्या या बॅट्समनने भारतीय टीमचा कॅप्टन रोहित शर्माच्या रेकॉर्डची बरोबरी केली. पाकिस्तानसाठी 337 रन्सच टार्गेट कठीण होतं. पण अशक्य नक्कीच नव्हतं. मागच्याच वर्षी त्यांनी यापेक्षा मोठ्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग केला होता.

PAK vs NZ : पाकिस्तानची जबरदस्त बॅटिंग, ODI मध्ये चेस केलं 337 धावांच टार्गेट, एका बॅट्समनने चोपल्या 180 धावा
fakhar zamanImage Credit source: pcb twitter
| Updated on: Apr 30, 2023 | 1:00 PM
Share

लाहोर : भारतात सध्या IPL 2023 ची धूम आहे. त्याचवेळी शेजारच्या पाकिस्तानात वनडे सीरीज सुरु आहे. पाकिस्तान आणि न्यूझीलंडमध्ये सुरु असलेल्या वनडे सीरीजमध्ये धावांचा पाऊस पडतोय. 5 वनडे सामन्यांच्या सीरीजमध्ये पाकिस्तानी टीम 2-0 ने आघाडीवर आहे. दुसरा सामना पाकिस्तानने 7 विकेटने जिंकला.

पाकिस्तानने दुसऱ्या वनडेत डोंगराएवढ्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग केला. यात रोहित शर्माची बरोबरी करणाऱ्या फखर जमांची भूमिका महत्वाची होती.

कठीण होतं, पण अशक्य नक्कीच नव्हतं

न्यूझीलंडने पहिली बॅटिंग केली. डॅरेल मिचेलच्या शतकाच्या बळावर 50 ओव्हर्समध्ये 5 विकेट गमावून 336 धावा केल्या. डॅरेल मिचेलने 119 चेंडूत 129 धावा चोपल्या. टीमचा कॅप्टन टॉम लॅथमने 98 धावा केल्या. पाकिस्तानसाठी 337 रन्सच टार्गेट कठीण होतं. पण अशक्य नक्कीच नव्हतं. मागच्याच वर्षी त्यांनी यापेक्षा मोठ्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग केला होता.

किती फोर, सिक्स मारले?

यशस्वी रेन चेससाठी ज्या सुरुवातीची अपेक्षा होती, फखर जमांने तशी सुरुवात दिली. फखर जमांने न्यूझीलंड विरुद्ध डावाची सुरुवात केली. त्याने 144 चेंडूंचा सामना करताना नाबाद 180 धावा केल्या. या दरम्यान त्याने 17 चौकार आणि 6 सिक्स मारले. वनडेमध्ये फखर जमांच हे सलग तिसरं शतक आहे. वनडे करियरमधील 10 वी सेंच्युरी आहे.

रोहितच्या कुठल्या रेकॉर्डची बरोबरी?

फखर जमांने वनडे क्रिकेटमध्ये वेगाने 3000 धावा करणाऱ्या फलंदाजांच्या पंक्तीत स्थान मिळवलय. त्याशिवाय रोहित शर्माच्या एका रेकॉर्डची बरोबरी केली. रोहित सारखच वनडेमध्ये 180 किंवा त्यापेक्षा जास्त धावा 3 वेळा बनवणारा फलंदाज बनलाय.

पाकने कुठल्या टीम विरुद्ध सर्वात मोठ्या लक्ष्याच पाठलाग केलाय?

रोहितच्या रेकॉर्डची बरोबरी करणाऱ्या फखर जमांने दुसऱ्या वनडेत 4 चेंडू आधी पाकिस्तानला विजय मिळवून दिला. पाकिस्तानने 337 धावाचं टार्गेट 49.2ओव्हर्समध्ये गाठलं. वनडे क्रिकेटमधील पाकिस्तानच हे दुसरं मोठं रन चेस आहे. याआधी मागच्यावर्षी लाहोरमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तानने यापेक्षा मोठ्या लक्ष्याचा पाठलाग केला होता. न्यूझीलंडसाठी आता करो या मरो

5 वनडे सामन्यांच्या सीरीजमध्ये न्यूझीलंडसाठी आता पुढचा सामना करो या मरो असेल. पाकिस्तान वनडे सीरीज विनपासून फक्त एक पाऊल दूर आहे.

Follow Us
उद्या मुंबईच्या दिशेने निघणारच; पोलिसांनी आंदोलनाला पुन्हा परवानगी...
उद्या मुंबईच्या दिशेने निघणारच; पोलिसांनी आंदोलनाला पुन्हा परवानगी नाकारली तरी मनोज जरांगे ठाम
मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे विधान; मनोज जरांगेंना...
मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे विधान; मनोज जरांगेंना दिले महत्त्वाचे आवाहन
PM मोदींच्या बालमित्राची जमीन हडपली; भाजपमधीलच आमदाराच्या कंपनीवर आरोप
PM मोदींच्या बालमित्राची जमीन हडपली; भाजपमधीलच आमदाराच्या कंपनीवर आरोप
अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला, CM फडणवीस, DCM शिंदेही
Lalbag Cha Raja : अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला, CM फडणवीस, DCM शिंदेही उपस्थित
लालबागच्या राजाला विदेशी नोटांचा अनोखा हार, भाविकांमध्ये चर्चेला उधाण
लालबागच्या राजाला विदेशी नोटांचा अनोखा हार, भाविकांमध्ये चर्चेला उधाण
अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी..
अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी घेतले गणपती बाप्पांचे दर्शन
दिशा सानियान प्रकरणी FIR दाखल होताच... वकिल काय म्हणाले?
दिशा सानियान प्रकरणी FIR दाखल होताच... वकिल काय म्हणाले?
गणेशोत्सवात मुंबईत आंदोलन करणं म्हणजे... फडणवीसांचं मराठा आंदोनलनाबाबत
गणेशोत्सवात मुंबईत आंदोलन करणं म्हणजे... देवेंद्र फडणवीस यांचे मराठा आरक्षणावर मोठे विधान
राज्यातले सर्वात श्रीमंत आमदार पराग शहा एका दिवसासाठी बनले भिकारी
Parag Shah | गुरूंच्या आदेशाने राज्यातले सर्वात श्रीमंत आमदार पराग शहा एका दिवसासाठी बनले भिकारी
पुणेकारांनी कमालच केली! 21 हजार पाणीपुरीपासून साकारली 13 फुटांची सुबक
पुणेकारांनी कमालच केली! 21 हजार पाणीपुरीपासून साकारली 13 फुटांची सुबक गणेश मूर्ती