
पाकिस्तान क्रिकेट टीमने मायदेशात श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय मालिकेत विजयी सुरुवात केली आहे. पाकिस्तानने श्रीलंकेवर रावळपिंडी क्रिकेट स्टेडियममध्ये पहिल्या एकदिवसीय सामन्यात 6 धावांनी मात केली आहे. पाकिस्तानने कॅप्टन सलमान आगा याच्या शतकी खेळीच्या जोरावर श्रीलंकेला विजयासाठी 300 धावांचं आव्हान दिलं होतं. श्रीलंकेनेही या धावांचा पाठलाग करताना चांगली झुंज दिली. मात्र श्रीलंकेचे प्रयत्न अपुरे पडले. श्रीलंकेला पाकिस्तानसमोर 50 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 293 धावाच करता आल्या. पाकिस्तानने अशाप्रकारे हा सामना जिंकला. पाकिस्तानने विजयासह 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.
श्रीलंकेच्या पराभवामुळे अर्धशतक करणाऱ्या वानिंदु हसरंगा याची खेळी वाया गेली. हसरंगा याने श्रीलंकेला विजयी करण्यासाठी पूर्ण प्रयत्न केले. मात्र पाकिस्तानच्या गोलंदाजांनी शेवटच्या काही षटकांमध्ये चिवट गोलंदाजी करत श्रीलंकेला विजयापासून यशस्वीरित्या रोखलं.
पाकिस्तानने 5 विकेट्स गमावून 299 धावा केल्या. तर प्रत्युत्तरात 300 धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेसाठी हसरंगा याने सर्वाधिक धावा केल्या. हसरंगा याने 59 बॉलमध्ये 7 फोरसह 59 रन्स केल्या. हसरंगा मैदानात असेपर्यंत विजयाची श्रीलंकेला विजयाची संधी होती. मात्र हसरंगा आऊट होताच विजयाची आशा धुसर झाली. तर पाकिस्तानच्या गोलंदाजांसमोर श्रीलंकेच्या इतर फलंदाजांना चांगल्या सुरुवातीनंतरही ठोस अशी खेळी करुन विजयी करता आलं नाही. पाकिस्तानसाठी हरीस रौफ याने सर्वाधिक 4 विकेट्स मिळवल्या. तर फहीम अश्रफ आणि नसीम शाह या दोघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स मिळवल्या.
श्रीलंकेने टॉस जिंकून पाकिस्तानला बॅटिंगसाठी भाग पाडलं. श्रीलंकेने पाकिस्तानला 4 झटके दिले. त्यामुळे पाकिस्तानची स्थिती 24 ओव्हरमध्ये 95 रन्सवर 4 आऊट अशी झाली होती. मात्र त्यानंतर कॅप्टन सलमान आघा याने पाकिस्तानच्या बाजूने गेम फिरवला.
श्रीलंकेची अखेरपर्यंत झुंज, पाकिस्तान अवघ्या 6 धावांनी विजय
A thrilling finish in Rawalpindi as Pakistan clinch the opening ODI against Sri Lanka 💪#PAKvSL 📝: https://t.co/EXyJRfYR8D pic.twitter.com/0pOJ82sr2c
— ICC (@ICC) November 11, 2025
आघाने 87 बॉलमध्ये 9 फोरसह नॉट आऊट 105 रन्स केल्या. आघा शेवटपर्यंत नॉट आऊट राहिला. तर हुसैन तलत याने 62 रन्स केल्या. सलमान आणि हुसैन या जोडीने पाचव्या विकेटसाठी निर्णायक अशी 138 धावांची भागीदारी केली. तर अखेरच्या काही षटकात सलमानला मोहम्मद नवाज याने चांगली साथ दिली. या दोघांनी सहाव्या विकेटसाठी 37 बॉलमध्ये 66 रन्स केल्या. नवाझने 23 बॉलमध्ये 5 फोर आणि 1 सिक्ससह नॉट आऊट 36 रन्स केल्या. श्रीलंकेकडून वानिंदु हसरंगा याने सर्वाधिक 3 विकेट्स मिळवल्या.