Babar Azam ला शतकी खेळीनंतर मोठा झटका, आयसीसीकडून मोठी कारवाई, ती चूक नडली

Pakistan Babar Azam : बाबर आझम याच्यासाठी श्रीलंकेविरुद्धची एकदिवसीय मालिका अविस्मरणीय ठरली. मात्र बाबरने तिसऱ्या सामन्यात केलेली एक चूक त्याला चांगलीच महागात पडलीय. जाणून घ्या बाबरने काय केलं होतं?

Babar Azam ला शतकी खेळीनंतर मोठा झटका, आयसीसीकडून मोठी कारवाई, ती चूक नडली
Babar Azm Pakistan Cricketer
Image Credit source: PTI
Updated on: Nov 18, 2025 | 4:56 PM

पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि अनुभवी फलंदाज बाबर आझम याच्या शतकाची प्रतिक्षा तब्बल 83 डावांनंतर संपली. बाबरने मायदेशात श्रीलंकेविरुद्धच्या वनडे सीरिजमधील दुसऱ्या सामन्यात खणखणीत शतक झळकावलं. बाबरने शुक्रवारी 14 नोव्हेंबरला 289 धावांचा पाठलाग करताना नाबाद शतक करत पाकिस्तानला विजयी केलं. बाबरने नाबाद 102 धावांची खेळी केली. बाबरच्या या शतकी खेळीच्या जोरावर पाकिस्तानने एकूण आणि सलग दुसरा विजय साकारला. पाकिस्तानने या विजयासह मालिका आपल्या नावावर केली. पाकिस्तानने मालिकेत 2-0 ने आघाडी घेतली. त्यानंतर पाकिस्तानने रविवारी 16 नोव्हेंबरला सलग तिसरा सामना जिंकून विजयी हॅटट्रिक केली. बाबरने या सामन्यातही 34 धावा केल्या. पाकिस्तानने यासह श्रीलंकेचा 3-0 अशा फरकाने धुव्वा उडवला.

बाबरला या मालिकेआधी सातत्याने धावांसाठी संघर्ष करावा लागत होता. त्यामुळे बाबरवर टीका करण्यात येत होती. मात्र बाबरला या मालिकेतून सूर गवसला. बाबरसाठी ही मालिका निर्णायक ठरली. मात्र या मालिकेनंतर अवघ्या काही दिवसांनी बाबरला मोठा झटका लागला आहे. आयसीसीने बाबरवर कारवाई केली आहे. बाबरला या मालिकेत केलेली एक चूक चांगलीच महागात पडली आहे. बाबरने तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात आऊट झाल्यानंतर नको ते केलं. त्यामुळे आयसीसीने बाबरवर कारवाईचा चाबूक फिरवला आहे.

बाबर आझमला झटका, आयसीसीकडून कारवाई

बाबरने आयसीसीच्या नियमाचं उल्लंघन केलं. त्यामुळे आयसीसीने कायद्यानुसार कारवाई केली आहे. बाबर श्रीलंकेविरुद्ध तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात आऊट झाला. बाबरने आऊट झाल्यानंतर संतापात स्टंप्सवर बॅटने प्रहार केला. हा सर्व प्रकार 21 व्या ओव्हरमध्ये झाला. बाबरने अशाप्रकारे क्रिकेटच्या वस्तूंचं नुकसान करण्याचा प्रयत्न केला. बाबरने अशाप्रकारे आयसीसी संहितेच्या 2.2 नियमाचं उल्लंघन केलं.

बाबरच्या या कृतीमुळे त्याच्यावर सामनाधिकारी अर्थात मॅच रेफरी अली नक्वी यांनी कारवाई केली. बाबरला एका सामन्याच्या मानधनातील 10 टक्के रक्कम दंड म्हणून द्यावी लागणार आहे. तसेच बाबरला 1 डिमेरिट पॉइंट देण्यात आला आहे. बाबरने त्याच्याकडून झालेली चूक मान्य केली. त्यामुळे अधिकृत सुनावणीची गरज लागली नाही.

बाबरला एक चूक महागात

बाबरची वनडे सीरिजमधील कामगिरी

दरम्यान बाबर आझम श्रीलंकेविरुद्धच्या तिन्ही सामन्यात खेळला. बाबर आझम याने या 3 सामन्यांमध्ये 150 पेक्षा अधिक धावा केल्या. बाबरने 82.50 च्या सरासरीने 1 शतकासह 165 धावा केल्या.