AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PAK vs SL : बाबर आझमचं नाबाद शतक, पाकिस्तानने सामन्यासह मालिका जिंकली, श्रीलंकेचा 8 विकेट्सने धुव्वा

Pakistan vs Sri Lanka 2nd ODI Match Result : पाकिस्तानने श्रीलंकेचा सलग दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात धुव्वा उडवला आहे. पाकिस्तानने सामन्यासह मालिकाही आपल्या नावावर केली आहे.

PAK vs SL : बाबर आझमचं नाबाद शतक, पाकिस्तानने सामन्यासह मालिका जिंकली, श्रीलंकेचा 8 विकेट्सने धुव्वा
Babar Azam Pakistan BatterImage Credit source: PTI
| Updated on: Nov 15, 2025 | 1:20 AM
Share

पाकिस्तानचा स्टार फलंदाज आणि माजी कर्णधार बाबर आझम याने अखेर 2 वर्षांची प्रतिक्षा संपवली आहे.  स्वत: बाबर आणि त्याच्या चाहत्यांना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतकाची प्रतिक्षा होती. अखेर बाबरने 14 नोव्हेंबरला शतकाचा दुष्काळ संपवला. बाबरने रावळपिंडी क्रिकेट स्टेडियममध्ये श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात नाबाद शतक झळकावलं. बाबरने यासह पाकिस्तानला सलग दुसरा विजय मिळवून देण्यात प्रमुख भूमिका बजावली. बाबरने नाबाद 102 धावा केल्या. बाबरच्या या खेळीच्या जोरावर पाकिस्तानने श्रीलंकेवर तब्बल 8 विकेट्सने मात केली. श्रीलंकेने पाकिस्तानसमोर 289 धावांचं आव्हान ठेवलं होतं. पाकिस्तानने हे आव्हान 10 बॉलआधी 2 विकेट्स गमावून पूर्ण केलं. पाकिस्तानने 48.2 ओव्हरमध्ये विजयी धावा पूर्ण केल्या. पाकिस्तानने यासह मालिकाही जिंकली आहे. पाकिस्तानने 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी एकतर्फी आघाडी घेतली आहे.

पाकिस्तानला विजयी करण्यात बाबर व्यतिरिक्त सॅम अयुब, फखर झमान आणि मोहम्मद रिझवान या तिघांनी योगदान दिलं. फखर आणि रिझवानने अर्धशतक ठोकलं. पाकिस्तानसाठी फखर आणि सॅम या सलामी जोडीने 77 धावांची भागीदारी केली. त्यानंतर सॅम अयुब 33 धावांवर आऊट झाला. त्यानंतर फखर आणि बाबरने दुसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. या दोघांनी 127 बॉलमध्ये 100 रन्सची पार्टनरशीप केली. फखर जमानच्या रुपात पाकिस्तानने दुसरी विकेट गमावली. फखरने 93 बॉलमध्ये 78 रन्स केल्या.

तिसऱ्या विकेटसाठी नाबाद शतकी भागीदारी

फखर आऊट झाल्यानंतर मोहम्मद रिझवान आणि बाबर आझम या अनुभवी जोडीने तिसर्‍या विकेटसाठी नाबाद शतकी भागीदारी करत पाकिस्तानला जिंकवलं. बाबर आणि रिझवानने 105 बॉलमध्ये 112 रन्सची पार्टनरशीप केली. रिझवानने 54 बॉलमध्ये 51 रन्स केल्या. तर बाबरने 119 बॉलमध्ये 8 फोरसह 102 रन्स केल्या. श्रीलंकेसाठी दुश्मंथा चमीरा याने 2 विकेट्स मिळवल्या.

पहिल्या डावात काय झालं?

दरम्यान त्याआधी पाकिस्तानने टॉस जिंकून श्रीलंकेला बॅटिंगसाठी भाग पाडलं. श्रीलंकेने 50 ओव्हरमध्ये 8 विकेट्सच्या मोबदल्यात 288 रन्स केल्या. श्रीलंकेसाठी जनिथ लियानगे याने सर्वाधिक 54 रन्स केल्या. कामिंदु मेंडीस याने 44 तर सदीरा समरविक्रमा याने 42 धावा जोडल्या. तर वानिंदु हसरंगा याने अखेरच्या क्षणी नाबाद 37 धावा केल्या. या व्यतिरिक्त एकालाही 30 पार पोहचता आलं नाही. पाकिस्तानसाठी अब्रार अहमद आणि हरीस रौफ या दोघांनी प्रत्येकी 3-3 विकेट्स मिळवल्या. तर वसिमने 1 विकेट मिळवली.

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.