PAK vs SL : बाबर आझमला सूर गवसला, श्रीलंकेविरुद्ध अर्धशतक, पाकिस्तानला जिंकवणार?
Babar Azam : बाबर आझम याला सातत्याने चेंडूंपेक्षा आव्हानांचा सामना करावा लागत आहे. मात्र बाबरने या टीकेदरम्यान श्रीलंकेविरुद्ध रावळपिंडीत दुसऱ्या एकदिवसीय साम्यात शतक झळकावलं आहे.

पाकिस्तानचा अनुभवी फलंदाज बाबर आझम याला गेल्या अनेक महिन्यांपासून सात्याने धावांसाठी संघर्ष करावा लागत आहे. बाबरला त्याच्या लौकीकाला साजेशी खेळी करता आलेली नाही. त्यामुळे बाबरला सातत्याने टीकेचा सामना करावा लागत आहे. पाकिस्तान सध्या मायदेशात श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळत आहे. बाबरने या मालिकेतील पहिल्या सामन्यात संथ खेळी केली होती. त्यामुळे बाबर पुन्हा एकदा नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आला होता. मात्र आता बाबरला सूर गवसला आहे. बाबरने श्रीलंकेविरुद्धच्या दुसर्या एकदिवसीय सामन्यात अर्धशतक झळकावलं आहे. बाबरने यासह टीकाकारांना उत्तर दिलं आहे.
बाबरची अर्धशतकी खेळी
बाबरने श्रीलंकेविरुद्ध रावळपिंडी क्रिकेट स्टेडियममध्ये अर्धशतक लगावलं आहे. बाबरने विजयी धावांचा पाठलाग करताना ही खेळी केली आहे. बाबरने 31 व्या ओव्हरमधील दुसर्या बॉलवर अर्धशतक पूर्ण केलं. बाबरने या खेळीत 3 चौकार लगावले. बाबरला हे अर्धशतक 100 च्या स्ट्राईक रेटनेही करता आलं नाही. बाबरने 73.53 च्या स्ट्राईक रेटने आणि 68 बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण केलं. बाबरच्या एकदिवसीय कारकीर्दीतील हे 38 वं अर्धशतक ठरलं.
बाबर आझम याची संथ खेळी
बाबरला श्रीलंकेविरुद्ध 11 नोव्हेंबरला पहिल्या वनडेतही अपेक्षित सुरुवात मिळाली होती. मात्र बाबरने प्रचंड संथ खेळी केली. बाबरने कसोटीपेक्षाही संथ खेळी केली. बाबरने 51 बॉलमध्ये 3 फोरसह 29 रन्स केल्या होत्या. त्यामुळे बाबर आझम पुन्हा एकदा ट्रोल झाला होता. मात्र बाबरने दुसऱ्या वनडेत अर्धशतक केलं आणि टीकाकारांना बॅटने उत्तर दिलं.
पाकिस्तानकडे मालिका विजयाची संधी
दरम्यान श्रीलंकेने पाकिस्तानसमोर 289 धावांचं आव्हान ठेवलं आहे. पाकिस्तानने पहिल्या सामन्यात श्रीलंकेवर 6 धावांनी मात केली होती. त्यामुळे पाकिस्तान या 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. त्यामुळे आता यजमान पाकिस्तान संघाकडे सलग दुसरा सामना जिंकण्यासह मालिका आपल्या नावावर करण्याची दुहेरी संधी आहे. मात्र त्यासाठी पाकिस्तानला 289 धावांचा यशस्वी पाठलाग करावा लागणार आहे.
श्रीलंकेसमोर दुहेरी आव्हान
तसेच दुसऱ्या बाजूला श्रीलंकेसमोर या सामन्यात विजय मिळवून पहिल्या पराभवाची परतफेड करण्यासह मालिकेत 1-1 ने बरोबरी साधण्याचं दुहेरी आव्हान आहे. त्यामुळे आता पाकिस्तान सामन्यासह मालिका जिंकणार की श्रीलंका हिशोब बरोबर करणार? हे निकालानंतर स्पष्ट होईल.
