PAK vs WI : 6, 11, 5 आणि 8, टॉप ऑर्डरसह बाबरही ढेर, मात्र रिझवान आणि सौदने सावरलं
Pak vs Wi 1st Test Day 1 Highlights : पाकिस्तानने मुलतानमध्ये खेळवण्यात येत असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यातील पहिल्या दिवशी 4 विकेट्स गमावून 143 धावा केल्या आहेत. मोहम्मद रिझवान आणि सौद शकील ही जोडी नाबाद आहे.

पाकिस्तान क्रिकेट टीमला विंडीजविरुद्धच्या पहिल्या कसोटीतील पहिल्या दिवशी अपेक्षित खेळ करता आला नाही. विंडीजच्या गोलंदाजांसमोर पाकिस्तानच्या टॉप ऑर्डरमधील फलंदाज अपयशी ठरले. अनुभवी बाबर आझम यालाही मायदेशात मोठी खेळी करण्यात अपयश आलं. मात्र सौद शकील आणि विकेटकीपर मोहम्मद रिझवान या जोडीने चिवट भागीदारी करत पाकिस्तानचा डाव सावरला आणि वैयक्तिक अर्धशतक झळकावलं. त्यामुळे पाकिस्तानला दिवसअखेर 140 पार मजल मारता आली. आता पाकिस्तानला दुसऱ्या दिवशी या जोडीकडून मोठ्या भागीदारीची अपेक्षा असणार आहे.
पहिल्या दिवसाचा खेळ
पाकिस्तानने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. कॅप्टन शान मसूद आणि मुहम्मद हुरैरा ही सलामी जोडी मैदानात आली. मात्र विंडीजच्या 2 गोलंदाजांनी पाकिस्तानला ठराविक अंतराने धक्के दिले. पाकिस्तानने एक एक करुन 4 विकेट्स गमावल्या. मुहम्मद हुरैरा 6, शान मसूद 11 आणि कामरान घुलाम 5 धावांवर बाद झाला. त्यामुळे पाकिस्तानची 3 बाद 31 अशी स्थिती झाली. मैदानात बाबर आझम होता. त्यामुळे बाबरकडून चांगल्या खेळीची अपेक्षा होती. मात्र बाबरही इतर फलंदाजांप्रमाणे आऊट झाला आणि मैदानाबाहेर गेला. बाबरने 8 धावा केल्या. बाबर आऊट झाल्याने पाकिस्तानची 4 बाद 46 अशी नाजूक स्थिती झाली.
त्यानंतर सौद शकील आणि मोहम्मद रिझवान या जोडीने शानदारपणे बॅटिंग करत पाकिस्तानचा डाव सावरला. या दोघांनी खेळ संपेपर्यंत जबाबदारी खेळ केला आणि नाबाद परतले. या जोडीने पाचव्या विकेटसाठी 97 धावांची नाबाद भागीदारी केली. पाकिस्तानने 41.3 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 143 धावा केल्या. विंडीजकडून जेडन सील्स याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तर गुडाकेश मोटी याने 1 विकेट घेतली.
पहिल्या दिवसाचा ‘गेम ओव्हर’
Opening day honours belong to @saudshak and @iMRizwanPak 👏
Solid fifties from the duo take Pakistan to 143-4 at stumps 🏏#PAKvWI | #RedBallRumble pic.twitter.com/LBeNBGASuT
— Pakistan Cricket (@TheRealPCB) January 17, 2025
पाकिस्तान प्लेइंग ईलेव्हन : शान मसूद (कर्णधार), मुहम्मद हुरैरा, बाबर आझम, कामरान गुलाम, सौद शकील, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), सलमान आगा, साजिद खान, नोमान अली, खुर्रम शहजाद आणि अबरार अहमद
वेस्ट इंडीज प्लेइंग ईलेव्हन : क्रेग ब्रेथवेट (कर्णधार), मिकाईल लुईस, केसी कार्टी, कावेम हॉज, अॅलिक अथानाझे, जस्टिन ग्रीव्हज, टेविन इमलाच (विकेटकीपर), गुडाकेश मोटी, केविन सिंक्लेअर, जोमेल वॉरिकन आणि जेडेन सील्स.
