Video : पाकिस्तानची होती नव्हती ती सगळी लाज गेली, ‘जलेबी बेबी’ गाणं राष्ट्रगीतावेळी वाजलं

आशिया कप स्पर्धेत भारतीय संघाने 7 गडी राखून पाकिस्तानचा धुव्वा उडवला. पाकिस्तानने भारतासमोर विजयासाठी 128 धावांचं आव्हान ठेवलं होतं. पण भारताने हे आव्हान 3 गडी गमवून पूर्ण केलं. या सामन्यात पाकिस्तानची लाज सामना सुरु होण्याआधीच गेली.

Video : पाकिस्तानची होती नव्हती ती सगळी लाज गेली, जलेबी बेबी गाणं राष्ट्रगीतावेळी वाजलं
Video : पाकिस्तानची होती नव्हती ती सगळी लाज गेली, 'जलेबी बेबी' गाणं राष्ट्रगीतावेळी वाजलं
Image Credit source: X/video grab
| Updated on: Sep 14, 2025 | 11:32 PM

आशिया कप स्पर्धेतील हायव्होल्टेज सामन्यात भारताने पाकिस्तानला 7 गडी राखून पराभूत केलं. या सामन्यात भारताने पाकिस्तानला 127 धावांवर रोखलं होतं. तसेच विजयासाठी 128 धावांचं आव्हान मिळाल्यानंतर आक्रमक सुरुवात केली होती. सलामीला आलेल्या अभिषेक शर्माने पहिल्या चेंडूवर चौकार आणि दुसऱ्या चेंडूवर षटकार मारत शाहीन आफ्रिदीला अर्धा करून टाकलं होतं. त्यामुळे हा सामना भारताच्या पारड्यात झुकला होता. या विजयासह भारताने आशिया कप स्पर्धेच्या सुपर 4 फेरीत एन्ट्री मारली आहे. तर पाकिस्तानसाठी पुढचा सामना करो या मरोची लढाई ठरू शकतो. ओमान विरुद्ध युएई सामन्यावर लक्ष लागून आहे. कारण हा सामना युएईने जिंकला तर पाकिस्तानसाठी अवघड काम होऊन बसणार आहे. असं सर्व चित्र असताना पाकिस्तानचा भारताविरुद्ध सामना सुरु होण्यापूर्वीच मान खाली घालावी लागली. कारण राष्ट्रगीतासाठी मोठ्या दिमाखात उभे असताना जलेबी बेबी गाणं वाजलं. त्यामुळे पाकिस्तानी खेळाडूंना शरमेने मान खाली घालावी लागली.

भारत पाकिस्तान सामना दोन्ही देशांसाठी युद्धासारखा असतो. त्यामुळे देशाबाबत झालेली चूक चाहत्यांना आवडत नाही. अशा स्थिती असं होणं म्हणजे जागतिक पातळीवर लाज घालवण्यासारखं आहे. दोन्ही संघांचे खेळाडू मैदानावर पोहोचल्यानंतर प्रथम पाकिस्तानचे राष्ट्रगीत आणि नंतर भारताचे राष्ट्रगीत वाजवले जाईल अशी घोषणा करण्यात आली. पण डीजेने चुकून पाकिस्तानच्या राष्ट्रगीताऐवजी जलेबी बेबी हे गाणे वाजवले. त्यानंतर त्याला त्याची चूक लक्षात येताच त्याने लगेच पाकिस्तानचे राष्ट्रगीत वाजवले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

जलेबी बेबी गाणं वाजलं तेव्हा पाकिस्तानी खेळाडू राष्ट्रगीतासाठी तयार झाले होते. पण चुकून वेगळंच वाजल्याने संभ्रमात पडले. पण थोड्याच वेळात पाकिस्तानचं राष्ट्रगीत वाजलं. नेटकरी या व्हिडीओखाली प्रतिक्रिया नोंदवत पाकिस्तानची लाज काढत आहेत. पाकिस्तानचं राष्ट्रगीत आहे असं अनेकांनी प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान, भारत पाकिस्तान सामना पुन्हा सुपर 4 फेरीत होऊ शकतो. पण त्यासाठी गणित जुळून येणं आवश्यक आहे.