AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Asia Cup 2025 : सूर्यकुमारने टॉसवेळी पाकिस्तानला जागा दाखवली, केलं असं की…

भारत पाकिस्तान सामन्याला सुरुवात झाली आहे. या सामन्यात पहिल्या दोन षटकातच भारताने पाकिस्तानवर दबाव टाकला आहे. दोन षटकात दोन महत्त्वाच्या विकेट काढल्या. असं असताना नाणेफेकीवेळी कर्णधार सूर्यकुमार यादवने हिसका दिला. काय केलं ते जाणून घ्या

Asia Cup 2025 : सूर्यकुमारने टॉसवेळी पाकिस्तानला जागा दाखवली, केलं असं की...
Asia Cup 2025 : सूर्यकुमारने टॉसवेळी पाकिस्तानला जागा दाखवली, केलं असं की... Image Credit source: Getty Images
| Updated on: Sep 14, 2025 | 8:29 PM
Share

भारत आणि पाकिस्तान हायव्होल्टेज सामना दुबईत होत आहे. या सामन्याकडे क्रीडाप्रेमींच्या नजरा लागून होत्या. सामना होईल की नाही इथपासून सुरुवात झाली होती. पण या सामन्याला सुरुवात झाली. नाणेफेकीचा कौल झाला आणि पाकिस्तानच्या बाजूने लागला. पाकिस्तानचा कर्णधार सलमान आघाने तात्काळ फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कारण या मैदानात धावांचा पाठलाग करणं खूप कठीण जातं. दुसरीकडे, भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादव याच्या मनासारखं झालं. त्याने नाणेफेक जिंकली असती तर प्रथम गोलंदाजी घेतली असती असं म्हंटलं. कारण दुसऱ्या डावात दव पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे गोलंदाजी करणं कठीण जाईल. असं सर्व घडत असताना सर्वांच्या सूर्यकुमारकडे लागून होत्या, सूर्यकुमार यादव पाकिस्तानी कर्णधाराशी बोलतो की नाही? पण सूर्यकुमार यादवने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. त्यामुळे त्याची नाणेफेकीवेळीच लायकी काढली.

सूर्कुमार यादवने नाणं वर उडवलं आणि पाकिस्तानचा कर्णधार सलमान आघाने प्रथम हेड असा कौल मागितला. कौल त्याच्या बाजूने लागला. त्याने फलंदाजी स्वीकारली पण यावेळी सूर्यकुमार हाताची घडी घालून होता. त्याने सलमान आघाकडे पाहिलं देखील नाही. सूर्यकुमार आणि टीम इंडियाच्या मनात पहलगाम दहशतवादी हल्ल्याची सळ कायम आहे. सूर्यकुमार यादवने पंचांकडे संघाची यादी सोपवली. इतकंच काय तर समालोचकांशीही बोलला. पण पाकिस्तानी कर्णधाराशी हस्तांदोलन केले नाही किंवा कोणतीही चर्चा केली नाही. या घटनेचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

आशिया कप स्पर्धेच्या सुरुवातीला सर्व संघांचे कर्णधार एकत्र पत्रकार परिषदेत सहभागी झाले होते. त्यानंतर सूर्यकुमार यादव आणि पाकिस्तानी कर्णधार सलमान अली आगा यांनी एकमेकांशी हस्तांदोलन केले होते. पण यावेळी सूर्याने तसे न करण्याचा निर्णय घेतला. आशिया कप असल्याने हा सामना खेळण्याचा निर्णय घेतला आहे. पण भारतीय संघाने पाकिस्तानसोबत द्विपक्षीय सामना खेळणं बंद केलं आहे. त्यामुळे दोन्ही संघ फक्त आशिया आणि आयसीसी स्पर्धेतच समोरासमोर येतात.

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.